बुलढाणा: सेल्फी काढायला थांबली अन् घात, नातेवाईकासमोर 8 जणांचा महिलेवर गँगरेप
सेल्फी घेण्यासाठी थांबलेल्या एका महिलेवर तब्बल 8 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक अशी घटना बुलढाणामध्ये घडली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.
ADVERTISEMENT

जका खान, बुलढाणा: बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एक अत्यंत भयंकर आणि अवघ्या महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी अशी घटना घडल्याचं समोर आलं आहे. आपल्या नातेवाईकांसोबत सेल्फी (Selfie) काढण्यासाठी एका निर्जनस्थळी थांबलेल्या एका महिलेवर तब्बल 8 जणांनी सामूहिक बलात्कार (gang rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (very shocking incident buldhana woman stopped to take a selfie gang raped by 8 people crime news)
नेमकी घटना काय?
बुलढाणा जिल्ह्यातील राजूर घाट परिसर हा सध्या हिरवाईने नटला असून प्रचंड असा आकर्षक बनला आहे. याच मार्गावर एक मंदिर देखील आहे. जिथून अतिशय नयनरम्य असं दृश्य पाहायला मिळातं. त्यामुळे या मार्गावरून जाणारे अनेक नागरिक देवीच्या मंदिरात थांबून सेल्फी घेतात.
काल (13 जुलै) दुपारी 2 वाजेच्या सुमारास राजूर घाट येथे एक महिला तिच्या नातेवाईकासोबत सेल्फी काढत होती. पण तिथे अचानक 8 जण आले. खरं तर हा संपूर्ण परिसर तास निर्जन आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन पीडित महिलेला आणि तिच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकाला आरोपींनी चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर सर्व आरोपींनी महिलेच्या गळ्यावर चाकू लावत तिला जवळच्याच दरीत नेलं. यानंतर त्यांनी आळी-पाळीने तिच्या नातेवाईकसमोर पाशवी बलात्कार केला. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडील 45 हजार रुपये देखील काढून घेत त्यांनी इथून पळ काढला.
हे ही वाचा>> आईला शेजाऱ्यासोबत पाहिलं नग्नावस्थेत, अन् मुलासोबत घडली थरकाप उडवणारी घटना
दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच बुलढाण्याचे शिवसेना आमदार (शिंदे गट) त्यांनी थेट बोराखेडी पोलीस ठाणे गाठले. ज्यानंतर रात्रीच बोराखेडी पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या 8 आरोपींपैकी एक आरोपीची ओळख पटली असून त्याचं नाव राहुल गायकवाड असल्याचं समजतं आहे.
दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज (14 जुलै) सकाळी जिल्ह्याच्या एसपींनी घटनास्थळाची पाहणी केली. एसपी सुनील कडासणे यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्ला
दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. पाहा त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे.
हे ही वाचा>> Crime : ‘या’ अॅपमुळे कुटुंबच संपलं! मुलांना दिलं विष अन् पत्नीसह घेतला गळफास
बुलढाणा येथे सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. 8 नराधमांनी एका महिलेसोबत हे दुष्कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे.पोलिसांनी गुन्हा नोंद करताना अक्षम्य दिरंगाई केली असून,सत्ताधारी गटाचा आमदार तेथे गेल्यावर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
त्याचवेळी उरळी कांचन येथे…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 14, 2023
‘बुलढाणा येथे सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. 8 नराधमांनी एका महिलेसोबत हे दुष्कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करताना अक्षम्य दिरंगाई केली असून,सत्ताधारी गटाचा आमदार तेथे गेल्यावर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्याचवेळी उरळी कांचन येथे देखील बलात्काराची घटना समोर येते आहे. राज्यात महिला भगिनी सुरक्षित नसल्याचे हे द्योतक आहे.एकीकडे महिलांवरील अत्याचार वाढले असताना राज्य सरकार मात्र खाते वाटपाच्या गोंधळात दिल्लीसमोर मुजरे घालत आहे.’ अशी टीका आव्हाडांनी शिंदे सरकारवर केली आहे.