Veena Kapoor म्हणाल्या मी जिवंत! मला माझ्या मुलाने ठार केलं नाही..

वाचा सविस्तर बातमी, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
Veteran tv actress veena kapoor is alive says my son has not killed me who is veena kapoor
Veteran tv actress veena kapoor is alive says my son has not killed me who is veena kapoor

अभिनेत्री वीणा कपूर यांना त्यांच्या मुलाने ठेचून मारल्याची बातमी समोर आली होती. मात्र आता वीणा कपूर यांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. वीणा कपूर या जिवंत आहेत. वीणा कपूर यांचा खून झाल्याची बातमी समोर आली होती. त्यांचा फोटोही व्हायरल झाला होता. ज्यानंतर आता त्या समोर आल्या आहेत. त्यामुळे मृत्यू कुणाचा झाला? हा प्रश्नही उपस्थित होतो आहे.

वीणा कपूर यांच्या मृत्यूबाबत गोंधळ

मुंबईतल्या जुहू भागात अभिनेत्री वीणा कपूर यांचं घर आहे. त्यांचा खून करण्यात आल्याची तो खून त्यांच्या मुलानेच केल्याची बातमी समोर आली आहे. वीणा कपूर या जिवंत आहेत. हा नवा ट्विस्ट या प्रकरणात समोर आला आहे. वीणा कपूर या गेल्या आहेत हे समजून लोक श्रद्धांजली वाहात आहेत.

वीणा कपूर यांच्याविषयी नेमकं काय घडलं?

वीणा कपूर या जुहूमध्ये राहणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला हे वास्तव आहे. मात्र त्या अभिनेत्री वीणा कपूर नाही. त्यांचा फोटो या महिलेऐवजी व्हायरल केला गेला त्यामुळे वीणा कपूर यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. अॅक्ट्रेसला काम मिळणंही बंद झालं आहे.

फेक बातम्यांमुळे अॅक्ट्रेस वीणा कपूर हैराण झाल्या आहेत. वीणा कपूर दिंडोशी पोलीस ठाण्यात पोहचल्या. तिथे त्यांनी पोलिसांना आपल्याला जो काही त्रास सहन करावा लागला ते सांगितलं.

वीणा कपूर यांच्या हत्येनंतर गोंधळ का झाला?

वीणा कपूर यांच्या हत्येनंतर गोंधळ झाला याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जुहूमध्ये राहणाऱ्या ज्या वीणा कपूर यांची हत्या झाली त्या वीणा कपूरही अभिनेत्री होत्या. अभिनेत्री वीणा कपूर यांनीच ही माहिती दिंडोशी पोलिसांना दिली. आम्ही दोघींनीही पंजाबी सीरिअलमध्ये काम केलं आहे. हे खरं आहे की वीणा कपूर यांचा मृत्यू झाला पण ती वीणा कपूर म्हणजे मी नाही असं वीणा कपूर यांनी पोलिसांना सांगितलं. ही हत्या झाल्यानंतर फोटो ज्यांची हत्या झाली नाही त्या वीणा कपूर यांचा झाला त्यामुळे मला त्रास सहन करावा लागतो आहे. मी गोरेगावमध्ये माझ्या मुलासोबत राहते असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ज्यांची हत्या झाली त्या वीणा कपूर कोण?

मुंबईत ज्या वीणा कपूर यांची हत्या झाल्याची बातमी समोर आली त्या पंजाबी अभिनेत्री होत्या. प्रॉपर्टीच्या वादातून त्यांची हत्या झाली. त्यांच्या मुलानेच त्यांची हत्या केल्याची बातमी समोर आली. या वीणा कपूर यांचा दुसरा मुलगा विदेशात राहतो. त्याने जेव्हा आईला फोन केला तेव्हा आईने फोन घेतला नाही. त्यावेळी लहान मुलाला संशय आला त्याने बिल्डिंगच्या वॉचमनला घरी पाठवलं त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती या लहान मुलाला समजली. याचाच अर्थ हा की वीणा कपूर नावाच्या दोन अभिनेत्री आहेत. यातल्या जुहू मध्ये राहणाऱ्या अभिनेत्री वीणा कपूर यांचा मृत्यू झाला. लोकांचा गोंधळ उडाल्याने त्यांनी भलत्याच वीणा कपूरना आदरांजली वाहिली.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in