मुंबईची खबर: BMC करणार मोठी भरती, मुंबईत वाढणार सफाई कर्मचारी!

मुंबई तक

मुंबई शहरातील कचऱ्याचं संकलन आणि योग्य विल्हेवाट याचा आढावा घेऊन पालिकेकडून सफाई कामगारांची संख्या वाढवण्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार केला जाणार आहे.

ADVERTISEMENT

BMC करणार मोठी भरती, मुंबईत वाढणार सफाई कर्मचारी!
BMC करणार मोठी भरती, मुंबईत वाढणार सफाई कर्मचारी! (प्रातिनिधिक फोटो)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महापालिकेचा मोठा प्रस्ताव

point

शहरातील सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार

Mumbai News: सध्या शहरातील वाढत्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने पालिकेकडून लवकरच प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्यामुळे कचऱ्याच्या व्यवस्थापनावर त्याचा परिणाम होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे कचऱ्याचं संकलन आणि योग्य विल्हेवाट याचा आढावा घेऊन पालिकेकडून सफाई कामगारांची संख्या वाढवण्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार केला जाणार आहे.

सफाई कामगार संघटनेची मागणी 

दिवसेंदिवस मुंबई शहराच्या लोकसंख्येत भर पडत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या मुंबईची लोकसंख्या सव्वा दोन कोटींच्या घरात पोहचली आहे. लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली असूनसुद्धा सफाई कर्मचाऱ्यांची संख्या तितकीच असल्याने सफाई कामगार संघटनेने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. खरंतर, या प्रश्नावरुन सफाई कामगार संघटनेने आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता. मात्र, महापालिकेच्या प्रशासनाने दिलेल्या आश्वासनामुळे संघटनेने आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला. 

हे ही वाचा: पिंपरी चिंचवड महापालिका मालमाल! फक्त 3 महिन्यात 522 कोटींचा कर जमा, रेकॉर्डब्रेक कलेक्शन

सफाई खात्यातील रिक्त पदे

घन कचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता प्रशांत पवार याच्या दालनात सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत बैठक पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सफाई खात्यातील कर्मचाऱ्यांची संख्या 31,617 इतकीच आहे. तसेच यामधून 28,036 कर्मचारीच कार्यरच असून 3581 रिक्त आहेत. ही रिक्त पदे तातडीनं भरण्यात यावीत, त्याचबरोबर लोकसंख्येच्या प्रमाणात किमान 30 हजार सफाई कर्मचाऱ्यांची पदे वाढवावी, अशी म्यूनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने मागणी केली होती. 

हे ही वाचा: मोठं कांड! बायको निघाली मास्टरमाईंड, प्रियकरासाठी केला पती आणि सासूचा खून, कारण ऐकून हादरून जाल?

सफाई कर्मचाऱ्यांसाठी नव्या सोयी

घनकचरा व्यवस्थापन खात्यातील पर्यवेक्षक संवर्गातील कनिष्ठ पर्यवेक्षकाची 105, सहाय्यक मुख्य पर्यवेक्षकाची 20 आणि उपमुख्य पर्यवेक्षकांची 04 पदे तात्काळ भरण्याचे आश्वासनही पालिक प्रशासनाने दिले आहे. याव्यतिरिक्त, प्रशासनाकडून सफाई खात्यातील 400 चौक्यांचे नूतनीकरण करण्यात येणार असून प्रत्येक चौकीवर सफाई कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय, स्वतंत्र चेजिंग रूमची सोय करण्यात येणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp