Amit Shah: अजित पवारांची कथित सिंचन घोटाळ्याची केस, शाहांच्या 'त्या' विधानाने मोठी खळबळ!

मुंबई तक

ADVERTISEMENT

अमित शाहांच्या 'त्या' विधानाने मोठी खळबळ!
अमित शाहांच्या 'त्या' विधानाने मोठी खळबळ!
social share
google news

Amit Shah big Statement on Ajit Pawar irrigation Scam Case: नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज (19 एप्रिल) इंडिया टुडेला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कथित सिंचन घोटाळ्याच्या केसबाबत एक अत्यंत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (ajit pawar alleged rs 70 thousand crore irrigation scam case has not been closed union home minister amit shah statement will raise eyebrows)

ADVERTISEMENT

इंडिया टुडेचे वृत्त संचालक आणि वरिष्ठ संपादक राहुल कनवाल यांना दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अमित शाह यांनी अजित पवारांच्या कथित सिंचन घोटाळ्याची केसबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे आता पुन्हा नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. 

अजित पवार यांनी 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला असा आरोप त्यांच्यावर केला गेला होता. मात्र, ते जेव्हा तुमच्या सरकारमध्ये आले तेव्हा त्यांची कोणतीही चौकशी आता केली जात नाही. असा सवाल जेव्हा अमित शाह यांना विचारण्यात आला.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> धैर्यशील पाटलांची लढाई पवारांनी केली सोपी; रात्रीत बदललं समीकरण

याच प्रश्नावर अमित शाह यांनी उत्तर देताना स्पष्टपणे म्हटलं की, 'हे बघा.. मी पुन्हा एकदा ही गोष्ट रेकॉर्डवर सांगू इच्छितो की, आम्ही एकही केस बंद केलेली नाही. कोणाचीही..' असं शाह म्हणाले. 

पाहा अजित पवारांच्या कथित सिंचन घोटाळ्याबाबत अमित शाह नेमकं काय म्हणाले..

प्रश्न: आरोप हा देखील लावला जातो की, तपास यंत्रणांचा सरकार वापर करतंय.. जेव्हा कोणी विरोधात असतं तेव्हा म्हटलं जातं की, 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला अजित पवारांनी.. पण ते जेव्हा तुमच्या सरकारमध्ये येतात तेव्हा त्यांची कोणती चौकशीही होत नाही.. 

ADVERTISEMENT

अमित शाह: हे बघा.. मी पुन्हा एकदा ही गोष्ट रेकॉर्डवर सांगू इच्छितो की, आम्ही एकही केस बंद केलेली नाही. कोणाचीही.. 

प्रश्न: इंडियन एक्सप्रेसमध्ये रिपोर्ट आला होता की, 25 जे नेते विरोधी पक्षात होते.. ते तुमच्यासोबत आल्यानंतर त्यांच्यापैकी 23 जणांच्या केसेस बंद झाल्या.

ADVERTISEMENT

अमित शाह: तुम्ही शोध पत्रकारिता करतात. तुम्ही याचा शोध घ्या. मी तुम्हाला माझी प्रतिक्रिया देतोय.. एकही केस आम्ही बंद केलेली नाही. 

प्रश्न: सर, पण त्या पद्धतीने तुम्ही पाठपुरावा देखील तर केला नाही ना.. 

अमित शाह: आता असं आहे की, चार्जशीट ही कोर्टासमोर आहे. कोर्टाला आता केस चालवायची आहे. पाठपुरावा काय करायचा.. कोर्ट काय आमच्या म्हणण्यानुसार चालत नाही. 

प्रश्न: पण तपास यंत्रणा आता त्या जोशाने लढत नाही ना.. जेव्हा हे नेते विरोधात होते.. तेव्हा त्यांना समन्स वर समन्स पाठवले जात होते.. 

अमित शाह: असं आपण मानतात.. राहुल आणि सोनिया गांधी यांच्यावर ज्या केसेस आहेत त्या तरी कुठे सुरू आहेत. चिदंबरम साहेबांवर केस आहे ती तरी कुठे सुरू आहे? ते काय आमच्यामध्ये आले का? 

9 वर्ष झाले राहुल आणि सोनिया गांधींवर केस झालेली.. ती त्यांची कोणती ट्रस्ट होती.. नॅशनल हेराल्डवाली ट्रस्ट.. चिदंबरम साहेबांवर केस होऊन किती वर्ष झाली.. कोर्टात पडली आहे अजून.. आम्ही आमचं काम केलं आहे. 

तुम्ही म्हणत असाल तर या केसेस वेगाने चालवायला सांगू.. कोर्टाला विनंती करून. पण पुन्हा म्हटलं जाईल आम्ही दबाव आणतो. तुम्ही नागरिक म्हणून विनंती करा कोर्टाला..

हे ही वाचा>> "अमित शाह शिंदेंना म्हणाले, नाशिकमधून भुजबळच लढतील"

असं आहे की, सामान्य माणसांच्या केसेसही महत्त्वाच्या आहेत. आमच्या सोबत नाही आले त्यांच्या केसेसही याच स्पीडने चालू आहेत. पण गोष्टी सनसनाटी पद्धतीने पेश करणं आणि ते देखील निवडणुकीच्या वेळेस.. हे ठीक नाही. 

असं उत्तर अमित शाह यांनी यावेळी दिलं. त्यामुळे अजित पवार यांच्याविरोधात असलेली कोणतीही केस आपल्या सरकारने बंद केलेली नाही असं शाहांनी यावेळी सांगितलं. 

आता अमित शाह यांच्या या विधानाचा महाराष्ट्रातील राजकारणावर नेमका काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण अमित शाह यांच्या वक्तव्याचा विचार केल्यास अजित पवार यांच्यावर कायदेशीर बाबींची टांगती तलवार ही अद्यापही कायम आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT