Madha Lok Sabha : धैर्यशील पाटलांची लढाई पवारांनी केली सोपी; रात्रीत बदललं समीकरण

मुंबई तक

ADVERTISEMENT

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना अनिकेत देशमुख यांनी पाठिंबा जाहीर केला.
शरद पवार, धैर्यशील पाटील, जयंत पाटील.
social share
google news

Sharad Pawar, Madha Lok Sabha election Latest News : धैर्यशील पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आणि माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात दंड थोपटले. त्यांच्यासाठी आता शरद पवारांनी काम सुरू केलं आहे. एका रात्रीत पवारांनी देशमुखांचं बंड शमवत त्यांचं वजन मोहिते पाटलांच्या पारड्यात टाकलं आहे. (Aniket Deshmukh extend support to dhairyashil mohite patil from Madha Lok Sabha)

सांगोल्याचे माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवणार असा निर्णय घेतला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवणार, अशी भूमिका घेतली होती. पण, शरद पवारांनी बारामतीत बोलवून देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला. 

धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा

डॉ. अनिकेत देशमुख यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून पाठिंबाही जाहीर केला आहे. अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या देशमुखांचं बंड शरद पवारांमुळे शमलं आणि मोहिते पाटलांची ताकद वाढली, अशी चर्चा स्थानिक राजकारणात सुरू झाली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बारामतीत मध्यरात्री झाली बैठक

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी अनिकेत देशमुख यांना बारामती येथे भेटीसाठी बोलावले होते. त्यांच्यासोबत धैर्यशील मोहिते पाटील हेही बैठकीला हजर होते. तिघांमध्ये चर्चा झाल्यानंतर देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतली.

हेही वाचा >> 'माझी बदनामी नको असेल, तर...'; चव्हाणांची भावनिक साद 

भेटीत झालेल्या चर्चेबद्दल बोलताना अनिकेत देशमुख म्हणाले की, "सामाजिक आणि राजकीय अडचणी शरद पवार यांना सांगितल्या. त्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत सांगोल्यासाठी पुढील पाच वर्षात काय करणार याबाबत चर्चा झाली. मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. महाविकास आघाडीचा प्रचार करणार आहे", अशी माहिती देशमुख यांनी दिली.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

महादेव जानकर निसटले, उत्तम जानकर थांबले

धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचं टेन्शन वाढलं आहे. चंद्रकांत पाटील यांनीच माढाची निवडणूक थोडी जास्त कठीण केली गेली असल्याचे सांगितले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीच या मतदारसंघात लक्ष घातलं आहे.

हेही वाचा >> नागपूर ते गडचिरोली... 2019 मध्ये पाच मतदारसंघात काय होती स्थिती? 

दुसरीकडे शरद पवार यांनीही माढा लोकसभा जिंकण्यासाठी आणि बारामती, सोलापूरमधील समीकरणं बदलण्यास सुरुवात केली आहे. माळशिरस येथील धनगर नेते उत्तमराव जानकर यांना भाजपकडून आश्वासन दिले गेले, पण ते महाविकास आघाडीसोबतच राहणार आहेत. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे जातीय समीकरणही पवार जुळवून आणताना दिसत आहे. याचा थेट फायदा महाविकास आघाडीला तीन लोकसभा मतदारसंघात होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT