Maharashtra : शिंदेच्या आमदाराचा महायुतीलाच घरचा आहेर

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

eknath shinde mla oppose dharavi project rehabilitation in kurla mangesh kudalkar mahayuti
धारावी पुनर्वसनाच्या या निर्णयाविरोधात आमदार मंगेश कुडाळकर हे थेट आता आंदोलनात उतरणात आहेत.
social share
google news

Eknath shinde mla oppose dharavi project : 

ADVERTISEMENT

आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुर्नविकास होणार आहे. या पुर्नविकासासाठी धारावीकरांचे कुर्ल्यात स्थलांतर केले जाणार आहे. मात्र आता कुर्ल्यातील स्थलांतरला आता एकनाथ शिंदे यांच्या आमदाराने विरोध केला आहे. धारावीकरांचे स्थलांतर कुर्ल्यात नको त्याच ठिकाणी व्हावे , असे शिंदे गटाच्या आमदाराने म्हटले आहे. त्यामुळे महायुतीला शिंदे गटाच्या आमदाराने घरचा आहेर दिला आहे. ( eknath shinde mla oppose dharavi project rehabilitation in kurla mangesh kudalkar mahayuti) 

धारावीतील हजारो प्रकल्पबाधितांना कुर्ल्याच्या 8 एकर जागेवर पुनर्वसन करण्यासंदर्भात जीआर निघाला आहे. या जीआरनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी कुर्ल्यातील स्थलांतराला विरोध केला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'तुम्ही दळिद्रीपणा करणार का?', फडणवीसांबद्दल बोलताना केतकीची घसरली जीभ

 धारावीत होणाऱ्या प्रकल्पासाठी रहिवाशांचे पुनर्वसन कुर्ल्यात करण्यासाठीचा जीआर निघाला. या जीआरचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे कुर्लेकर यासाठी उपस्थित झालो आहोत. आमची सर्वांची मागणी आहे. धारावीकरांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी झाली पाहिजे. इतर ठिकाणी नको, असे विधान करून  सत्ताधारी आमदार मंगेश कुडाळकर यांनी धारावीकरांच्या कुर्ल्यातील स्थलांतराला विरोध केला आहे. त्यामुळे आमदार मंगेश कुडाळकर यांनी महायुतीलाच घरचा आहेर दिला आहे. 
 
 विशेष म्हणजे धारावी पुनर्वसनाच्या या निर्णयाविरोधात आमदार मंगेश कुडाळकर हे थेट आता आंदोलनात उतरणात आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा आधीपासूनच या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. आता मंगेश कुडाळकर यांनी विरोध केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा : "विधानसभेला 288 जागांवर उमेदवार पाडणार", जरांगेंचा महायुतीविरोधात एल्गार

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT