Lok Sabha Exit Polls LIVE Streaming: मुंबई Tak सोबत कसा पाहू शकाल एक्झिट पोल?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Lok Sabha Exit Polls LIVE Streaming: मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान हे शनिवारी, 1 जून रोजी पार पडणार आहे. या टप्प्यातील देशातील 8 राज्यांमधील एकूण 57 जागांवर मतदान होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर, महाराष्ट्रातील सर्व 48 जागांसह आणि देशभरातील सर्व 542 (एकच उमेदवार असल्याने सूरतमधील खासदाराची आधीच निवड झाली आहे) लोकसभेच्या जागांसाठी एक्झिट पोल जारी केले जातील.

ADVERTISEMENT

Lok Sabha Election 2024 Exit poll लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहाल?

1 जून रोजी सायंकाळी 6 वाजल्यानंतर प्रत्येकाला अचूक एक्झिट पोलची उत्सुकता असणार आहे. पण त्यासाठी इतर कुठेही जाण्याची आपल्याला गरज नाही. तुम्ही मुंबई Tak ची वेबसाइट mumbaitak.in वर एक्झिट पोलचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. येथे तुम्हाला इंडिया टुडे ग्रुप आणि ॲक्सिस माय इंडियाचे एक्झिट पोल पाहता येईल, जे याआधी देखील अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे.

हे ही वाचा>> "निकालानंतर एकनाथ शिंदे, अजित पवार कुठे आहेत, हे शोधावं लागेल"

शनिवारी सांयकाळी 6 वाजेनंतर एक्झिट पोल 2024 चे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे-कुठे पाहता येईल?

  • YouTube: मुंबई Tak च्या वेबसाइट व्यतिरिक्त, तुम्ही आमचं अधिकृत YouTube चॅनेल https://www.youtube.com/@MumbaiTak वर  देखील पाहू शकता.

 

हे वाचलं का?

  • Facebook: याशिवाय, एक्झिट पोल तुम्ही आमच्या अधिकृत फेसबुक पेज https://www.facebook.com/mumbaitak/ वर देखील पाहू शकता

 

  • X (Twitter): https://x.com/mumbaitak वर देखील लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

हे ही वाचा>> भाजपची उडेल झोप, काँग्रेसचं काय? सट्टा बाजाराचे खळबळ उडवणारे अंदाज

एक्झिट पोल म्हणजे काय? (What are Exit Polls?)

निवडणुकीत मतदान केल्यानंतर लगेच मतदारांसोबत केलेल्या सर्वेक्षणाला एक्झिट पोल म्हणतात. मतदारांना प्रभावित होण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी निवडणूक आयोगाने एक्झिट पोलशी संबंधित नियम आणि कायदे केले आहेत. निवडणूक अखंडता राखण्यासाठी, भारताचा निवडणूक आयोग (EC) एक्झिट पोलवर कठोर नियम लागू करतो. या अंतर्गत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यातील मतदान संपेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियासह सर्व माध्यमांना लागू आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT