Lok Sabha Election : निकाल लागण्याआधीच भाजपचा 'हा' उमेदवार विजयी!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Surat Lok sabha 2024 : सध्या देशभरात लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha 2024) ची रणधुमाळी सुरू आहे. यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून भारतीय जनता पक्षासाठी (BJP) आनंदाची बातमी आली आहे. सुरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यानंतर उर्वरित 8 उमेदवारांनीही आपली नावे मागे घेतली असून, त्यानंतर भाजपचा बिनविरोध विजय झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे पहिले खाते उघडले आहे. मुकेश दलाल (Mukesh Dalal) येथून भाजपचे उमेदवार आहेत. यावर काँग्रेसने (Congress) प्रश्न उपस्थित करत हे मॅच फिक्सिंग असल्याचे म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024 BJP's first candidate from Surat won even before the results were announced)

सुरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी हे त्यांच्या तीन अनुमोदकांपैकी एकही अनुमोदक निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आणू शकले नाहीत, त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला. कुंभानी यांच्या फॉर्ममध्ये तीन अनुमोदकांच्या स्वाक्षरीबाबत भाजपने प्रश्न उपस्थित केले होते.

'मॅच फिक्सिंग' म्हणत काँग्रेसचा भाजपवर निशाणा

'काँग्रेसने भाजप सरकारवर उमेदवारी नाकारल्याचा आरोपही केला आहे. सरकारच्या धमकीपुढे सगळेच घाबरले आहेत, असं देखील काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेस नेते आणि अॅडव्होकेट बाबू मांगुकिया म्हणाले की, 'आमच्या तीन अनुमोदकांचे अपहरण झाले आहे, निवडणूक अधिकाऱ्यांनी आता फॉर्मवर स्वाक्षरी झाली आहे की नाही याची नाही तर, अपहरणाची चौकशी करावी. अनुमोदकांच्या सह्या खऱ्या आहेत की चुकीच्या याची तपासणी न करता अर्ज रद्द करणे चुकीचे आहे.' असंही ते म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याला मॅच फिक्स म्हटलं आहे. त्यांनी ट्वीटरवर लिहिलं की, "लोकशाही धोक्यात आली आहे. तुम्ही घटनाक्रम समजून घ्या. 

  • सुरतच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तीन अनुमोदकांच्या पडताळणीत तफावत असल्यामुळे सूरत लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज नाकारला.
  • त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही अर्ज नाकारला. काँग्रेस पक्ष आता उमेदवारविना उरला आहे.
  • भाजपचे उमेदवार मुकेश दलाल वगळता इतर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
  • 7 मे 2024 रोजी मतदानाच्या जवळपास दोन आठवडे आधीच 22 एप्रिल 2024 रोजी सुरत लोकसभा जागेवरून भाजप उमेदवार "बिनविरोध निवडून आले" म्हणून घोषित करण्यात आले. 

मोदींच्या अन्याय काळात MSME मालक आणि व्यावसायिकांना, संकट आणि रागाला सामोरे जावं लागत आहे ज्यामुळे भाजप इतके घाबरले आहे की त्यांनी सुरत लोकसभेत मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केला. जी त्यांनी 1984 च्या लोकसभा निवडणुकीपासून सातत्याने जिंकली आहे." असं जयराम रमेश यांनी ट्वीट करत लिहिलं आहे.

ADVERTISEMENT

'आमच्या स्वाक्षऱ्या नाहीत', अनुमोदकांचे निवडणूक अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र 

नीलेश कुंभानी यांच्या अनुमोदकांमध्ये त्यांचा मेहुणा, पुतण्या आणि भागीदारच्या स्वाक्षऱ्या असल्याचा दावा केला होता, मात्र तिन्ही अनुमोदकांनी काल निवडणूक अधिकाऱ्यांसमोर प्रतिज्ञापत्र देऊन निलेश कुंभानी यांच्या फॉर्मवर त्यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचे सांगितले, त्यानंतर ते तिघंही बेपत्ता झाले आहेत.

ADVERTISEMENT

निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांचे अनुमोदक असलेले त्यांचे मेहुणे जगदीश सावलिया, त्यांचा पुतण्या ध्रुविन ढमेलिया आणि भागीदार रमेश पोलारा यांच्या निवेदनाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील केले होते. अनुमोदकांच्या दाव्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांना उत्तर देण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली होती. निवडणूक अधिकाऱ्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभणी आपल्या वकिलासह आले होते, मात्र तीनपैकी एकही अनुमोदक तिथे उपस्थित नव्हते. देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई गुजरातच्या सुरत लोकसभा मतदारसंघातून 5 वेळा खासदार होते, परंतु सुरत लोकसभा मतदारसंघ 1989 पासून भाजपच्या ताब्यात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT