लाइव्ह

Maharashtra Live Updates : 'नाराज होणाऱ्यांपैकी मी नाही'- भावना गवळी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Marathi News LIVE Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (ता. १३) अचानक कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यात राजकीय उलथापालट होण्याची शक्यता आहे. ते सायंकाळी लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

लाइव्हब्लॉग बंद

  • 04:58 PM • 13 Apr 2024

    'नाराज होणाऱ्यांपैकी मी नाही'- भावना गवळी

    '25 वर्षांपासून यवतमाळ -वाशिमचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यवतमाळ-वाशिम संघात अनेक कामं केलीत. रेल्वे यवतमाळपर्यंत पोहोचली आहे त्यासाठी काम केलं आहे. यवतमाळ मतदारसंघात हायवे आणि रेल्वेचं जाळं विनलं. नाराज होणाऱ्यांपैकी मी नाही.' असं म्हणत भावना गवळींनी यवतमाळमधील विकासकामांचा पाढा वाचला.

  • 02:48 PM • 13 Apr 2024

    'मराठवाड्यात शिवसेनेचे ४ ही उमेदवार निवडून येतील'- संजय राऊत

    'मराठवाड्यात शिवसेनेचे ४ ही उमेदवार निवडून येतील, जालना लातूर मध्ये बदल होईल.बीड मध्ये पंकजा यांना अवघड जाईल.राज्यात लोकशाही धोक्यात आहे अशा परिस्थिती आंबेडकर सोबत असायला हवे. मोदींचं नाणं चालतं म्हणता, मात्र कोणतीही नोट आता बाजारात चालत नाही, भाजपचे उमेदवार हे पराभूत होणार म्हणून मोदी बोलत आहे. इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात हा प्रचाराचा मुद्दा असू शकतो का? प्रचाराचा स्थर खाली आणला आहे.मात्र बिफ तयार करणाऱ्या कंपनीकडून देणगी स्वरुपात कोटी रुपये घेतले नरेंद्र मोदी म्हणता रिकाम्या जागा भरू नोकऱ्या देऊ भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं बरं. लोकांना हा चेहेरा नको,गब्बर नंतर कोणाला लोक घाबरत असेल तर हा चेहेरा आहे. दहा वर्ष राज्य केल्यानंतर मटण खातात असे मुद्दे प्रचारात असेल तर काय होईल यांच्याकडे विकासचे मुद्दे नाहीत.' असं संजय राऊत म्हणाले.

  • 02:42 PM • 13 Apr 2024

    "लोकांना लुटण्याशिवाय काँग्रेसनं काय केलंय?"; कंगना रणौतची जहरी टीका

    "लोकांना लुटण्याशिवाय काँग्रेस इथे आणखी काय केलं आहे? आज मला त्यांना विचारायचे आहे, त्यांनी सांगितले की, ते सर्व बहिणी आणि मातांना 1,500 रुपये देतील. त्या पैशाचे काय झाले, ते म्हणाले होते, 5 लाख लोकांना नोकऱ्या देणार, कुठे आहेत त्या नोकऱ्या? खोटी आश्वासने देऊन असे राजकारण कधी चालणार?' असं म्हणत मंडीतील भाजप उमेदवार कंगना रनौतने जहरी टीका केली आहे.

  • 02:21 PM • 13 Apr 2024

    डॉ. हिना गावित यांनी केली मोठी मागणी

    अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या प्रचंड नुकसान या नुकसानाची पाहणी भाजप उमेदवार डॉ. हिना गावित यांनी केली. अवकाळी पावसाचा फटका केळी, पपई, या पिकांचे नुकसान झालेल्या नुकसानाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे मागणी केली.

  • ADVERTISEMENT

  • 12:27 PM • 13 Apr 2024

    'कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं', राज ठाकरेंचा विरोधकांना टोला! 

    'मी भूमिका बदलली नाही, धोरणांवर कायम आहे. गेल्या 5 वर्षात परिस्थिती बदलली आहे. महायुतीला पाठिंबा देण्याचं सविस्तर कारण सभेत सांगितलं आहे. भूमिका बदलणं माझ्यासाठी आवश्यक होतं. गेल्या 5 वर्षांमध्ये राम मंदिर, कलम 370 सारख्या गोष्टी घडल्या. मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं. मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्यावा, पक्षानं ठरवलंय. आमच्या काही मागण्या त्यांच्याकडे आहेत. सर्व राज्यांकडे मोदींनी लक्ष द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं.' असंही म्हणत राज ठाकरेंनी विरोधकांवर टोला लगावला.

  • 12:04 PM • 13 Apr 2024

    'संजय राऊत खरे नाचे', संजय शिरसाटांचा हल्लाबोल!

    'संजय राऊतांसह ठाकरे गटाचं संतुलन बिघडलं आहे. राऊत खरे नाचे आहेत. त्यांच्यासारख्या लोकांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यावं लागतं. राऊतांना खालच्या भाषेशिवाय दुसरी भाषा कलत नाही. खालच्या भाषेत बोलून राऊत स्वत:ची पत घालवत आहेत.' अशा जहरी शब्दात संजय राऊतांवर शिरसाटांनी हल्लाबोल केला आहे.

  • ADVERTISEMENT

  • 10:50 AM • 13 Apr 2024

    'उत्तर-मध्य मुंबईतून पूनम महाजन यांनाच उमेदवारी...'- अ‍ॅड. आशिष शेलार

     

    'मुंबईत भाजपाकडून दोन मुंबईकर उमेदवार देण्यात आले आहेत. उत्तर मध्य मुंबईचा उमेदवारही लवकरच जाहीर होईल. उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांनाच उमेदवारी दिली जावी, असे महायुतीकडून केंद्राला कळविले आहे.', असे भाजप नेते अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले.

  • 10:47 AM • 13 Apr 2024

    उत्तर-पश्चिम मतदारसंघात रविंद्र वायकरांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध?

    उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात रविंद्र वायकरांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध असल्याच्या चर्चा आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत रविंद्र वायकर यांना उमेदवारी देण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. घोटाळ्याचे आरोप असलेल्या रविंद्र वायकरांना उमेदवारी देऊ नका अशी चर्चा आहे. 
     

  • 09:03 AM • 13 Apr 2024

    माढ्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठी फुट!

    माढा लोकसभा मतदारसंघ गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. कधी महायुतीमधील नाराजीच्या चर्चांनी तर कधी मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर घराण्याच्या उमेदवारीवरुन मात्र सध्या माढा लोकसभेत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील फुटीमुळं हा मतदारसंघ गाजतोय. शरद पवार यांचे आत्यंत विश्वासु समजले जाणारे अभय जगताप यांना उमेदवारी न देता आता या ठिकाणी दुस-या पक्षातुन आलेल्या धैर्यशिल मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात येण्याची कुणकुण लागल्या नंतर आता अभय जगताप आणि त्यांचे कार्यकर्ते चांगलेच संतापले असून काही झालं तरी आता माघार नाही या भूमिकेत पाहायला मिळतायेत. याविषयी अभय जगताप यांनी माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे कार्यकर्त्यांची मोठी बैठक बोलावली या बैठकीत कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या या बैठकीत सर्वांनी एकमुखी अपक्ष उमेदवारी लढवण्याची मागणी केलीय. या बैठकीत अभय जगताप यांनी अजुन ही शरद पवारांनी माझ्या उनेदवारीबाबत  योग्य विचार न केल्यास अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. अभय जगतापांच वजन माढ्यात चांगलं आहे  यामुळं आता माढा मतदारसंघात हे बंड क्षमवलं जातं का हे पाहाणं महत्वाचं‌ असेल.

  • 08:50 AM • 13 Apr 2024

    विदर्भ-मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा!

    यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून अवकाळी  पावसाने हैराण करून सोडले. त्यातच रात्री दोन वाजता पासून  सुरू असलेल्या चौफेर पावसाने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  हातातोंडाशी आलेले पपई, केळी आणि आंब्याचे  पीक शेतकऱ्याच्या डोळ्या देखत निस्त नभुत झाले. काही शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन पीक बाजूला सारून फळबागे ची लागवड केली . केळी आणि पपई च्या पिकापासून  लाखो रू चे उत्पन्न होणार अशी  शेतकऱ्यांची अपेक्षा होती मात्र अवकाळी पावसाने केळी , पपई पीक उद्धवस्त करून टाकले. परिणामी या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले.  येकांदरित शेतकरी पुरता हादरला असून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्या जात आहे. सलग चौथ्या दिवशी विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. नागपुरातही सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे.

  • 08:46 AM • 13 Apr 2024

    रत्नागिरीत आजपासून भाजपच्या नमो संवाद सभा

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मतदारांशी संवाद साधण्याकरिता आजपासून (ता. १३) नमो संवाद सभा प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आयोजित केल्या आहेत. यासाठी मतदार, बूथ अध्यक्ष, कार्यकर्ते आदींना निमंत्रित केले आहे. दररोज किमान पाच बैठकांचे नियोजन केले आहे. २७ एप्रिलपर्यंत होणाऱ्या या सभांमध्ये सुमारे २० हजार मतदारांशी संवाद साधला जाईल, अशी माहिती विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा लोकसभा सहप्रभारी बाळ माने यांनी दिली.

follow whatsapp

ADVERTISEMENT