लाइव्ह

Maharashtra Lok Sabha Election Live : ठाकरे गटाला मोठा झटका, नेत्याचा भाजपला जाहीर पाठिंबा

मुंबई तक

ADVERTISEMENT

udhhav thackeray, loksabha election 2024
सुरेश जैन यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
social share
google news

Maharashtra Live News Updates : साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामांवर दहा दिवसांत हातोडा चालवण्यात येणार आहे. या रिसॉर्टचा दुसरा मजला येत्या 10 दिवसांत पाडण्यात येणार आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात हमी दिली आहे. दिलेल्या मुदतीत पाडकाम केले नसल्याने कोर्टाची माफी मागितली. दहा दिवसांच्या मुदतीत साई रिसॉर्टचा अनधिकृत दुसरा मजला पाडणार असून सदानंद कदम यांनी प्रतिज्ञापत्रातून न्यायालयाला लेखी हमी दिली. जूनमध्ये या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

  • 09:00 PM • 11 May 2024

    ठाकरे गटाला मोठा झटका, नेत्याचा भाजपला जाहीर पाठिंबा

    शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री सुरेश जैन यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाची विकासावर विश्वास ठेवून भाजपला पाठिंबा जाहीर देत असल्याचे सुरेश जैन यांनी स्पष्ट केले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांना आपले बहुमूल्य मत देऊन मोदीजींचे हात बळकट करणार असल्याचे सुरेश जैन यांनी म्हटले आहे. 
     

  • 05:27 PM • 11 May 2024

    Maharashtra News Live : भाजप पक्षप्रवेशाबाबत एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?

    एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षप्रवेशाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'पक्षप्रवेश हा निश्चित आहे असं मला विनोद तावडे यांनी सांगितला आहे. निवडणुका होईपर्यंत मी थांबलोय. माझ्या भाजप पक्षप्रवेशाबाबत काही जणांनी माझ्या प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुका संपल्यावर वरिष्ठांकडून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर माझ्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल.' असं खडसे म्हणाले आहेत.

     

  • 02:07 PM • 11 May 2024

    Marathi News Live : 'पंकजाला खासदार केलं नाही तर राजीनामा देऊन...'- उदयनराजे भोसले

    'पंकजाला साताऱ्यातून निवडून आणेन. माझे वडील वारल्यानंतप मुंडे साहेबांनी माझं बोट धरलं. आता पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तीला साताऱ्यातून निवडून आणेन. खासदार म्हणून त्या निवडून आल्या की त्यांच्या मंत्रिपदासाठी मोदींकडे शिफारस करणार. ' असं उदयनराजे भोसले बीडमधील प्रचार सभेत म्हणाले. 

  • 01:27 PM • 11 May 2024

    Maharashtra News : ठाकरे गट-महायुतीत राडा, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

    संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहे. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे.

     

     

  • ADVERTISEMENT

  • 01:08 PM • 11 May 2024

    Marathi News Live : काँग्रेसने बाबासाहेबांना बिनविरोध का निवडून दिलं नाही?- अजित पवार 

    'काँग्रेसने कधी संविधान दिन साजरा करण्याचा विचार केला नाही. काँग्रेसने बाबासाहेबांना बिनविरोध का निवडून दिलं नाही? काहीजण राजकीय पोळी भाजण्यासाठी म्हणतात आम्ही 96 कुळी. ते 96 कुळी मग आम्ही काय 92 कुळी आहोत का?' असा वक्तव्य अजित पवारांनी बीडमधील सभेत केलं. 

  • 12:04 PM • 11 May 2024

    Rahul Gandhi : 'काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या आहेत...'- राहुल गांधी

    काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या असून येत्या काळात आपल्या राजकीय धोरणात बदल करावे लागणार असल्याचं म्हटलं आहे. इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये झालेल्या राष्ट्रीय संविधान परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, "सत्य हे आहे की काँग्रेस पक्षाला आगामी काळात आपलं राजकारण बदलावं लागेल. काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या आहेत, मी काँग्रेसचा असूनही हे सांगत आहे."  याआधी राहुल यांनी दावा केला होता की, भाजपा 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही.

    पुढे ते म्हणाले की, मी एका गोष्टीची गॅरंटी देतो की, आता होणाऱ्या निवडणुकीत नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार नाहीत. तुमची इच्छा असेल तर मी सही करून देईन. मोदींची रणनीती ही भावाला भावासोबत लढायला भाग पाडण्याची आहे आणि या निवडणुकीत हे काम करत नाही. जर यामध्ये चीटिंग केली तर हरकत नाही, पण त्यांचा पक्ष 180 (जागा) च्या पुढे जाणार नाही."

  • ADVERTISEMENT

  • 11:50 AM • 11 May 2024

    Maharashtra News : अमोल कोल्हे महागद्दार, नाटकं करणारे- आढळराव आणि फडणवीसांचा हल्लाबोल

    पिंपरी- चिंचवड: भोसरी येथील सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिरूर महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 'अमोल कोल्हे एक निष्ठ असल्याचं वारंवार सांगतायत, पण त्यांच्यासारखा महागद्दार पाहिला नाही, पाच पक्ष बदलून ते आता शरद पवार गटात गेलेत', असं म्हणत आढळराव यांनी कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. अमोल कोल्हे हे एक चांगले कलाकार, नाटकार आहेत. कोल्हे हे कलाकारच राहिले खासदार होऊ शकले नाहीत. पाच वर्षांचा चित्रपट फ्लॉप झालाय, आता त्यांना नागरिक संधी देणार नाहीत', असा टोला लगावला.

  • 11:29 AM • 11 May 2024

    Maharashtra News : भारती कामाडींच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे पालघरमध्ये साधणार संवाद

    पालघर लोकसभा महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामाडी यांच्या प्रचार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पालघर मध्ये येणार आहेत. जिल्ह्यातील वादग्रस्त वाढवणं बंदर, मच्छिमार, कोळी, वकील, डॉक्टर, संघटना, विविध सामाजिक संघटना, यांच्या शिष्टमंडळा सोबत चर्चा करून सवांद साधणार आहेत.

  • 11:26 AM • 11 May 2024

    Marathi News Live Updates: माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आले- नरहरी झिरवळ

    महाविकास आघाडीचे उमेदवार यांच ज्या गावात प्रचार सुरू होता त्या गावात मला पूजा करण्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. हनुमान मंदिराच्या पूजेसाठी मी तिसगाव या गावात गेलो होतो. माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आले असा आरोप नरहरी झिरवाळ यांनी केला.

     

     

  • 10:24 AM • 11 May 2024

    Sanjay Raut : 'काही पक्षांची दखल घ्यावी अशी परिस्थिती नाही', संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

    केजरीवाल यांना झालेली अटक राजकीय होती. 17 मे रोजी मविआची मुंबईत सांगता सभा होईल. मविआच्या मुंबईतील सांगता सभेचं केजरीवालांना निमंत्रण दिलंय. काही पक्षांची दखल घ्यावी अशी परिस्थिती नाही, असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावला. तसंच पुढे म्हणाले की, 'राज ठाकरे देशद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. नकली शिवसेना आणि राष्ट्रवादीचा भाजपला फायदा होणार नाही. फायदा होणार नसल्यानं मोदी मुंबईसह राज्यभर सभा घेत आहेत.' असा टोला त्यांनी मोदींना लगावला. 'मविआ राज्यात 35 हून अधिक जागा जिंकणार,' असं ठाम मतही त्यांनी मांडलं.

  • 10:07 AM • 11 May 2024

    NCP : MVA च्या प्रचारातील व्हायरल फोटोवर नरहरी झिरवाळ काय म्हणाले?

    फोटो व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा ज्या गावात प्रचार सुरू होता, त्या गावात मला पूजा करण्यासाठी देण्यात आले होते आमंत्रण. लोकांच्या आग्रह खातर मी खुर्चीवर बसलो. काही मिनिटातच महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे पदाधिकारी तिथून निघून गेले असं स्पष्टीकरण नरहरी झिरवाळ यांनी दिलं.

  • 09:03 AM • 11 May 2024

    Mumbai Live Updates : रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

    देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांकरिता उद्या (12 मे) मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

    • हार्बर रेल्वे – कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर 11 ते 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
    • मध्य रेल्वे – रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मध्यरेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन मार्गाच्या जलद मार्गावर मेगबॉल्क असेल
    • पश्चिम रेल्वे –  सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार. अप आणि डाऊन च्या धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक असेल
  • 09:01 AM • 11 May 2024

    Maval Lok Sabha: बारणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्राचा आज पिंपरी-चिंचवड येथे रोड शो

    मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे-आरपीआय- रासप-मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शनिवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपरी- चिंचवड शहरात महा रोड शो होणार आहे. त्यानंतर महायुतीचे मावळ मतदारसंघातील अधिकृत उमेदवार बारणे यांच्या प्रचाराची सांगता होईल.

     

follow whatsapp

ADVERTISEMENT