Lok Sabha Election 2024: Exit Poll मध्ये शरद पवारांचा 'आकडा' ठरला खरा!
Lok Sabha Election 2024 Exit Poll: मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जागांबाबत जो अंदाज वर्तवला होता तो एक्झिट पोलमध्ये तरी खरा होताना दिसतोय.
ADVERTISEMENT
Sharad Pawar: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी संपूर्ण मतदान अखेर आज (1 जून) पार पडलं आहे. ज्यानंतर आता वेगवेगळ्या चॅनल्सचे एक्झिट पोल हे समोर येत आहे. महाराष्ट्राबाबत जवळजवळ सर्वच एक्झिट पोलचा सरासरी अंदाज आपण काढला तर राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांना जवळजवळ समसमान जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच राज्यात महाविकास आघाडीला 50 टक्के जागा मिळत असल्याचा अंदाज आहे. (lok sabha election 2024 exit poll mumbai tak exclusive interview sharad pawar number is true at least in the exit polls)
ADVERTISEMENT
खरं तर अशाप्रकारचा अंदाज हा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत वर्तवला होता. जो अनेक एक्झिट पोलमध्ये तरी खरा होताना दिसतोय.
हे ही वाचा>> Maharashtra Exit Poll : भाजपचं स्वप्न धुळीस? सर्व एक्झिट पोलने उडवली महायुतीची झोप
सगळ्यात आधी आपण महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसंबंधीचे सर्व एक्झिट पोलचे आकडे पाहूयात
1. एबीपी सी व्होटर एक्झिट पोल
हे वाचलं का?
- महायुती - 22 ते 26 जागा
- महाविकास आघाडी - 23 ते 25 जागा
2. टाइम्स नाऊ-ईटीजी एक्झिट पोल
- महायुती - 26 जागा
- महाविकास आघाडी - 22 जागा
3. टीव्ही 9-पोलस्ट्रॅट एक्झिट पोल
ADVERTISEMENT
- महायुती - 22 जागा
- महाविकास आघाडी - 25 जागा
4. इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोल
ADVERTISEMENT
- महायुती - 24 ते 32 जागा
- महाविकास आघाडी - 17 ते 24 जागा
5. चाणक्य एक्झिट पोल
- महायुती - 28 ते 38 जागा
- महाविकास आघाडी - 10 ते 20 जागा
6. न्यूज 18 एक्झिट पोल
- महायुती - 32 ते 35 जागा
- महाविकास आघाडी - 15 ते 18 जागा
हे ही वाचा>> India Today- Axis My India Exit Poll: ठाकरे-शिंदेंची उडणार झोप! खळबळ उडवणारा पोल
शरद पवारांनी काय सांगितला होता महाराष्ट्रातील जागांचा आकडा?
मुंबई Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी दावा केला होता की, 'राज्यात 50 टक्के जागा या महाविकास आघाडीला मिळाल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही.' म्हणजेच शरद पवार यांनी म्हटलं होतं की, महाविकास आघाडीला राज्यात 24 जागा मिळू शकतात..
'मागच्या निवडणुकीत आम्हा सगळ्यांना मिळून 6 जागा मिळाल्या होत्या. आम्हाला 5 आणि काँग्रेसला 1 आणि 1 अपक्ष.. आज त्याच्यामध्ये तिप्पट तरी वाढ होईल. मला आश्चर्य वाटणार नाही की, आम्हाला 50 टक्के जागा मिळाल्या तर.. मिळाल्याचं आश्चर्य वाटणार नाही.. बारामती तर आहेच..' असा दावा शरद पवार यांनी केला होता. जो काही एक्झिट पोलमध्ये खरा होताना दिसतोय.
मात्र, शरद पवारांचा हाच आकडा निकालाच्या दिवशी खरा ठरणार का? याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT