Lok Sabha Election 2024: अखेर वसंत मोरेंना मिळालं तिकीट, 'या' पक्षाने जाहीर केली उमेदवारी...

मुंबई तक

ADVERTISEMENT

वसंत मोरेंना वंचित बहुजन आघाडीकडून मिळाली उमेदवारी
वसंत मोरेंना वंचित बहुजन आघाडीकडून मिळाली उमेदवारी
social share
google news

Vasant More got the ticket for Lok Sabha Election from VBA: पुणे: लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला रामराम केलेल्या वसंत मोरे यांना अखेर आता निवडणुकीचं तिकीट मिळालं आहे. पुण्यातून मनसेचा खासदार होऊ शकतो असा दावा करणाऱ्या वसंत मोरे हे सातत्याने करत होते. मात्र, पक्ष नेतृत्वाने आपली फारशी दखल घेतली नाही त्यामुळे आपण मनसे सोडत असल्याचं वसंत मोरेंनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं. त्यानंतर वसंत मोरेंनी शरद पवारांसह राज्यातील दिग्गज नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते नेमकं कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर आज (2 एप्रिल) त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर करण्यात आलं. (lok sabha election 2024 finally vasant more got the ticket vanchit bahujan aghadi party announced its candidature)


वसंत मोरेंनी का निवडला वंचितचा पर्याय?

मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे हे नेमकं कोणत्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अशी चर्चा होती की, वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवू शकतात. मात्र, पुण्याची जागा ही काँग्रेसची होती. त्यामुळे त्यांनी तिथून रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी दिली. तर भाजपने मुरलीधर मोहोळांना उमेदवारी दिली. त्यामुळे वसंत मोरेंकडे एकच पर्याय उरला होता. तो म्हणजे वंचितचा... आणि हाच पर्याय आता त्यांना निवडणुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवार जाहीर केल्यानंतर वसंत मोरेंनी वंचित बहुज आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्याचवेळी ते वंचितकडून निवडणूक लढतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मोरे म्हणालेले की, "पुणे लोकसभेची निवडणूक शंभर टक्के लढणार आहे. मला प्रकाश आंबेडकरांनी बोलावलं आणि मला वेळ दिला. आमची चर्चा झाली आहे. आणखी चर्चा व्हायची आहे. पुण्याची चौथ्या टप्प्यात निवडणूक आहे. खूप लांब आहे... सकारात्मक चर्चा झाली आहे. पुढचे मार्गक्रमण कसे असेल, हे पुढील दोन-तीन दिवसांत कळेल. सकारात्मक चर्चा झाली आहे." असं मोरे यावेळी म्हणाले होते.

2019 मध्ये वंचितने कुणाला दिलेली उमेदवारी?

वंचित बहुजन आघाडीने 2019 मध्येही पुणे लोकसभा मतदारसंघातून अनिल जाधव यांना उमेदवारी दिली होती. त्याच अनिल जाधव यांची वसंत मोरेंनी भेटही घेतली होती. 2019 लोकसभा निवडणुकीत अनिल जाधव यांना 64 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट हे सहा लाखांहून अधिक मतं घेऊन विजयी झाले होते, तर काँग्रेसच्या मोहन जोशी यांना तीन लाखांपेक्षा जास्त मतं मिळालेली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT