Lok Sabha Election 2024: 'पवारांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेले...', आढळरावांचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

'पवारांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेले...'
'पवारांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेले...'
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांबाबत मोठं विधान

point

आढळराव-पाटील नेमकं काय म्हणाले

point

शिरूरमध्ये प्रचाराला सुरुवात

Shivajirao Adhalrao vs Sharad Pawar: स्मिता शिंदे, जुन्नर: "शरद पवार साहेबाच्या नावाने मते मागण्याचे दिवस आता राहिले नाहीत. पवार साहेब त्यांच्या जागेवर आहेत आपण मात्र कुठेच नाही" असा टोमणा शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना लगावला आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पंचायत समिती गटातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आढळराव बोलत होते. त्यावेळी कोल्हे यांच्या चंदेरी दुनियेची सुद्धा आढळराव यांनी खिल्ली उडवली.. पाहा यावेळी आढळराव-पाटील नेमकं काय म्हणाले. (lok sabha election 2024 gone are the days of asking for votes in the name of sharad pawar shivajirao adhalrao patil big statement shirur lok sabha)

ADVERTISEMENT

'शरद पवारांच्या नावे मतं मागण्याचे दिवस गेले..', आढळरावांचं 'ते' भाषण जसंच्या तसं

'माझ्या गावात गटार योजना झाली पाहिजे, शाळेची कामं झाली पाहिजे.. आरोग्याची कामं झाली पाहिजे. ही लोकांची अपेक्षा आहे. खरं म्हणजे या गोष्टी बाजूला सारून आम्ही कुठे तरी चंदेरी दुनियामध्ये लोकांना न्यायचं.. खोटी आश्वासनं दाखवायची, खोटी स्वप्नं दाखवायची. पण लोकं आता सुज्ञ झाली आहेत. ग्रामीण भागातील अडाणी माणूस सुद्धा समजून गेलाय की, माझ्या गावासाठी काही तरी पाहिजे. निष्ठा वैगरे ठीक आहे.. त्या नंतरच्या गोष्टी..'

हे ही वाचा>> Ajit Pawar NCP : ''असतील दाजी, तरच लावू जीवाची बाजी...!''

'आदरणीय पवार साहेबांचं नाव घेऊनच प्रचार सुरू आहे सध्या. शरद पवार यांचं नाव प्रत्येक वाक्यात असतं. पवार साहेबांबद्दल बोलायचं झालं आम्हाला सुद्धा तेवढाच आदर आहे. आज आपले नेते दिलीप वळसे यांना सुद्धा पूर्वीसारखाच आता पण मनात आदर आहे. आम्ही त्यांना नक्कीच विसरू शकत नाही. पण याचा अर्थ तुमच्याकडे दुसरं काहीच भांडवल नाहीए.' 

हे वाचलं का?

'त्यांना वाटतं की, निष्ठा.. निष्ठा.. निष्ठा आणि पवार साहेबांच्या बरोबर आहे. लोकं पवार साहेबांच्या नावाने मतं मागणारी असतील तर पवार साहेबांची गोष्ट वेगळी आहे, आपली गोष्ट वेगळी आहे. त्यांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेलेले आहेत.' 

'पवार साहेब... पवार साहेबांच्या जागी आहेत. आणि आपण कुठेच नाही आहोत. हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.'

'कार्यकर्त्यांमध्ये कुठे तरी एकजूटपणा दिसला पाहिजे. आपण लढायला जातोय.. आपल्याला युद्ध जिंकायचंय.. आपल्याला प्रचार करायला जायचं आहे. प्रचार करताना हेवेदावे.. मला नाही बोलावलं, माझं नाव नाही टाकलं.. याचा फोटो नाही, त्याचा फोटो आहे.. या गोष्टी या निवडणुकीसाठी मनातून काढू टाका. यावेळेला सगळ्यांची इज्जत पणाला लागली आहे.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> भाजपला झटका! 'हा' विद्यमान खासदार ठाकरेंच्या सेनेत करणार प्रवेश?

'अजितदादांनी आव्हान केलं आहे. अजितदादांच्या प्रतिष्ठेसाठी, वळसे-पाटील यांच्या प्रतिष्ठेसाठी ही जागा आपल्याला बहुमताने जिंकायची आहे.' असं विधान आढळराव-पाटील यांनी यावेळी केलं आहे.

ADVERTISEMENT

अमोल कोल्हेंनी दिलं प्रत्युत्तर... 

दरम्यान, शिवाजीराव आढळराव यांनी केलेल्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'राज्यात शरद पवारांबाबत आदर वाढत असल्याने आता विरोधकांना धडकी भरलीय.. म्हणून अशी विधानं होत आहेत.' असं म्हणत कोल्हेंनी आढळरावांना प्रतिउत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT