लाइव्ह

Lok Sabha election Maharashtra Live : 'कुवतीपेक्षा जास्त झेपत नसेल तर...', श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shrikant shinde, eknath shinde
आपल्या कुवतीपेक्षा जास्त वक्तव्य झेपत नसतील तर करू नका
social share
google news

Lok Sabha election 2024 Maharashtra live News Update : लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील प्रचाराचा पारा चांगलाच चढला आहे. दुसरीकडे अजूनही लोकसभेच्या काही जागांबद्दलचा तिढा सुटलेला नाही. तर एकनाथ खडसे यांनी भाजपत घरवापसी करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. या संदर्भातील सर्व माहिती आणि घडामोडींचे अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी... (Maharashtra Political Live News)

ADVERTISEMENT

 

 

ADVERTISEMENT

  • 06:27 PM • 07 Apr 2024

    Lok Sabha election 2024 : महायुतीला धक्का! भाजपच्या विधानसभा निवडणूक प्रमुखांचा राजीनामा

    शिरूर लोकसभा मतदारसंघात युतीला मोठा धक्का बसला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खेड-आळंदी विधानसभा निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांनी पक्षाचा राजीनामा दिला.

    समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आपला राजीनामा पाठवला. देशमुख यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत राजीनामा दिल्याने भाजपबरोबर महायुतीसाठी हा धक्का असल्याची चर्चा या मतदारसंघात सुरू आहे. 

    Atul deshmukh, assembly election chief of khed alandi quits bjp
    अतुल देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेला राजीनामा.


    अतुल देशमुख हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे अमोल कोल्हेंना बळ मिळले, तर शिवाजीराव आढळराव पाटलांचे टेन्शन वाढू शकतं.

  • 04:58 PM • 07 Apr 2024

    'वंचित'चा पाठिंबा आंबेडकरांनी स्वीकारला; अमरावतीत समीकरण बदललं

    अमरावती लोकसभा मतदारसंघात राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलले आहे. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीने दिलेला पाठिंबा नाकारला होता. त्याचबरोबर निवडणुकीतून माघार घेतली होती. पण, आता त्यांनी भूमिका बदलली आहे. 

    महत्त्वाचं म्हणजे आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबाही स्वीकारला आहे. आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. 

    वंचितचा पाठिंबा घेण्याबद्दल आनंदराज आंबेडकर म्हणाले, "हो, मला मान्य आहे. वंचितचा पाठिंबा हा आंबडेकरी विचारांचा पाठिंबा आहे, असं मी मानतो. आंबेडकरी विचार जिथे एक होतो, तो विचार जपणं आणि या देशाचे संविधान जपणं हे मी माझं प्रथम कर्तव्य समजतो", असे आनंदराज आंबडेकर म्हणाले. 

    आनंदराज आंबेडकर हे अमरावतीतून निवडणूक लढणार असल्याने ही निवडणूक आणखी रंगतदार होताना दिसत आहे. त्यामुळे चौरंगी लढतीत कोण गुलाल उधळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. 

    आनंदराज आंबेडकरांनी काय मांडली भूमिका... पहा व्हिडीओ 

     

  • 04:06 PM • 07 Apr 2024

    ''एकनाथ खडसे राज्यपाल होणार?''

    मी एक महिन्यापूर्वी हे बोलले …. खडसे पुन्हा भाजपा मधे जाणार.
    कळस म्हणजे त्यांना राज्यपाल बनवणार ? म्हणजे सगळ्या भ्रष्टाचाराच्या केस संपल्या ? 
    का लढावं भ्रष्टाचाराविरुद्ध ? सगळ्या केसचे, का तर क्लोसर, का तर अशी इम्युनिटी मिळणार असेल  तर ? 
    लयाला जातोय आपला देश


     

  • 02:12 PM • 07 Apr 2024

    Maharashtra News live : "खडसेंना ब्लॅकमेल...", रोहित पवारांचे भाजपकडे बोट

    भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार आहेत. त्यांच्याकडूनच याला दुजोरा दिला गेल आहे. खडसे यांच्या भाजपतील प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, "मी त्यांच्या बद्दल बोलणार नाही. त्यांच्या अडचणी खूप आहेत. भाजप खोट्या फाईल काढून त्यांच्यावर कारवाई करू शकते. खडसे साहेबांची तब्येत खूप खराब आहे; अशा तब्येतीत त्यांना भाजप जेलमध्ये देखील टाकू शकते."

    रोहित पवार पुढे म्हणाले की, "भाजपने असे खोटे आरोप करून अनेक नेत्यांची ताकद कमी केली. नेत्यांना भीती दाखवली जात आहे. खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं. खोट्या फाईल काढून जसं केजरीवाल यांना आत टाकलं तसा त्यांचा प्लॅन असेल", असे मोठे विधान पवारांनी केलं. 

    "फडणवीस साहेब आता वैतागले आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते असून देखील विनोद तावडे साहेबांकडे महाराष्ट्र राज्याचे सगळे अधिकार जात आहेत. राज्यातील सगळे मोठे निर्णय ते घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय वजन कमी होत असल्यामुळे अशी विधाने करत आहेत. फडणवीस आणि त्यांचे नेते घाबरले आहेत", असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

     

  • ADVERTISEMENT

  • 12:39 PM • 07 Apr 2024

    Beed Lok Sabha 2024 : पंकजा मुंडेंविरोधात प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केला उमेदवार

    वंचित बहुजन आघाडीने बीड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. मराठा आरक्षण आंदोलनाचे सर्वाधिक पडसाद उमटलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात कुणबी मराठा व्यक्तीला उमदेवारी देण्यात आली आहे. 

    वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बीड लोकसभा निवडणूक तिरंगी होताना दिसत आहे. भाजपने महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बजरंग सोनवणे यांनी तिकीट दिले आहे.

    2019 मध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे या विजयी झाल्या होत्या. त्यांना ६ लाख ७८ हजार १७५ मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना ५ लाख ९ हजार ८०७ मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. वंचितचे विष्णू जाधव यांना तब्बल ९२ हजार १३९ मते मिळाली होती म्हणजे लाखभर मते वंचितने घेतली होती. 

     

  • 12:25 PM • 07 Apr 2024

    Lok Sabha election 2024 : "लोकसभा निवडणुकीत...", मनोज जरांगेंचा मराठा समाजाला 'मेसेज'

    मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल भूमिका मांडतांना मराठा समाजाला आवाहन केले. "लोकसभेत आमचा कोणाला पाठिंबा नाही. आम्ही कोणतेही उमेदवार उभे केलेले नाहीत. काही जण समाजाच्या नावाखाली उभं राहतायेत, ते माझ्या फोटोचा वापर करतायेत; अशांनी समाजाला गालबोट लागेल, आंदोलन चिरडेल अशी भूमिका घेऊ नये. यातून जर त्या उमेदवाराला मते कमी पडली तर समाजाची बदनामी होईल. समाज हरला असा संदेश त्यातून जाईल. त्यापेक्षा उमेदवारांना पाडणारे बना, तोच आपला मोठा विजय असेल", असे मनोज जरांगे म्हणाले.

  • ADVERTISEMENT

  • 10:58 AM • 07 Apr 2024

    Baramati Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंचा प्रचारप्रमुखच अजित पवारांनी फोडला?

    इंदापुरातील सुप्रिया सुळे यांचे प्रचारप्रमुख प्रवीण माने हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहेत. त्याला अजित पवारांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, "तो माझाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे प्रवेश करण्याचा प्रश्न येतच नाही. आम्ही सगळे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याबद्दल निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्णय दिलेला आहे. न्यायालयामध्ये याबद्दलची केस सुरू आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून मिसळून काम करत आलो आहे. त्यांनी काय निर्णय घेतला याबद्दल मला माहिती नाही. पण, सकाळी ऐकायला मिळालं की, आज त्यांची पत्रकार परिषद आहे. 
     

  • 10:37 AM • 07 Apr 2024

    Lok Sabha election 2024 : बच्चू कडूंनी महायुतीचं वाढवलं टेन्शन

    अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात बच्चू कडूंनी बंडाची भूमिका घेतली आहे. बच्चू कडूंनी प्रहारकडून दिनेश बूब यांना लोकसभा उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे. त्यापाठोपाठ आता बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेंच्या मतदारसंघात महायुतीला झटका दिला आहे. 

    बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 

    बच्चू कडू हे महायुतीमध्ये आहेत. सरकारलाही त्यांचा पाठिंबा आहे, पण लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. एका मतदारसंघात त्यांनी भाजपच्या उमेदवारांविरोधात उमेदवार उतरवला आहे. दुसरीकडे शिंदेंच्या उमेदवाराविरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू हे महायुतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

    bacchu kadu prahar extended support to congress candidate shyamkumar barve in ramtek lok sabha constituency.
    श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा देत असल्याचे प्रहारचे नागपूरच्या जिल्हाध्यक्षांचे पत्र.
follow whatsapp

ADVERTISEMENT