Maharashtra Lok Sabha Election Live : ''लोकसभेनंतर ठाकरे बंधु भाजपसोबत असतील''
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्प्यातील प्रचारतोफा आज थांबणार आहेत. या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 जागांसह देशातील एकूण 49 जागांवर मतदान होणार आहे. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवार विविध पद्धतीने प्रचार करत आहेत.
ADVERTISEMENT
Maharashtra News Live Updates : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार आहे. राज्यातील 13 जागांसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नाशिक, नंदूरबारमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने महायुती, मविआकडून प्रचाराला जोर लावला आहे. रॅली, सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 07:30 PM • 18 May 2024
''लोकसभेनंतर ठाकरे बंधु भाजपसोबत असतील''
लोकसभा संपल्यानंतर तुम्ही भाजपसोबत समझोता करणार का? मुस्लिम इंटेलेक्च्युअलने त्यांना हा सवाल केला होता. त्यावर उत्तर न देता त्यांनी (ठाकरे) मोदींवर टीका केली. हा फक्त दिखावा आहे. एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे. राज ठाकरे त्यांचे सर्वप्रमुख झाले तर आश्चर्य वाटू नये. भापजने दोन्ही भावंडांमध्ये एक स्पर्धा रंगली आहे. पण हे दोन्ही भावंड लोकसभेनंतर भाजपसोबत असतील, असा मोठा दावा वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
- 02:06 PM • 18 May 2024
Nashik News Update : प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन
नाशिकच्या सातपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन. प्रकाश आंबेडकर जनतेला स्वतः संबोधित करणार आहेत.
- 01:47 PM • 18 May 2024
'फडतूणवीस...', उद्धव ठाकरेंची खोचक टीका
गणपत गायकवाडने फडतूणवीस...फडतूस काय शब्द..माझी जीभ अडकतेय..फडतूणवीस..फडणवीस.तुम्ही टाळ्या वाजवू नका. मला करेक्ट करा… फडतूणवीस… फडणवीस यांच्याकडे गणपत गायकवाड यांनी तक्रार केली होती. पण त्यांचं ऐकलं नाही. त्यामुळे त्यांनी गोळीबार केला, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
- 11:17 AM • 18 May 2024
संजय राऊत यांचा महायुतीवर हल्लाबोल
भारतीय जनता पार्टी पक्ष मिंधे गट अजित पवारांचा गट त्यांचा मुख्य हत्यार या लोकशाहीत पैसे वाटणे आणि धमक्या देणे हेच सुरु असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. अजित पवारांनी बारामतीमध्ये कसे पैसे वाटले हे बघितलं आणि 12 वाजेपर्यंत बँका चालू ठेवल्या, असंही ते म्हणाले.
- 10:45 AM • 18 May 2024
Uddhav Thackeray : महाराष्ट्राचं वैभव दुप्पटीनं परत आणू- उद्धव ठाकरे
आज (18 मे) मुंबईतील ग्रँड हयात येथे इंडिया आघाडीची पत्रकार परिषद पार पडत आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'महाराष्ट्राची लूट केली जातेय. बदनाम केलं जात आहे. शासकीय यंत्रणांचा दुरूपयोग होतोय. भाजपकडून भ्रष्टाचाऱ्यांचा सन्मान होतोय, आता 4 जूनपासून देशातलं जुमला पर्व संपेल आणि अच्छे दिन सुरू होणार आहेत. महाराष्ट्राचं वैभव दुप्पटीनं परत आणूयात. ' असं ते स्पष्ट शब्दात बोलले.
- 10:36 AM • 18 May 2024
INDIA Alliance : 'महाराष्ट्रात आम्ही 46 जागा जिंकणार' खर्गे यांचा मोठा दावा
'महाराष्ट्रात बेकायदेशीर महायुती सरकार बनलं, त्याच समर्थन खुद्द पंतप्रधान करत आहेत. त्यांच्या बऱ्याच सभा महाराष्ट्रात होत आहेत. पंतप्रधान मोदी जिथे जातील तिथे लोकांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. समाज तोडण्याची भाषा वापरतात,' अशी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत केली.तसंच, 'महाराष्ट्रात 48 पैकी आम्हाला कमीत कमी 46 जागा मिळतील', असा दावाही खर्गे यांनी केला.
- 09:10 AM • 18 May 2024
Maharashtra News : बोरवली नॅशनल पार्कात मॉर्निंग वॉकवेळी पीयूष गोयल यांनी साधला लोकांशी संवाद
केंद्रीय मंत्री आणि मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पीयूष गोयल यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मॉर्निंग वॉक करत लोकांशी संवाद साधला. उत्तर मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे.
- 09:06 AM • 18 May 2024
Maharashtra News : परभणीत अवकाळी पावसाचा फटका
परभणीत अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा फटका शेती पिकांना बसत आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याचा पाहायला मिळते. 25 ते 30 किलोने विक्री होणाऱ्या भाज्या 50 ते 70 ने विक्री होत आहे. तर कोथिंबीर 150 किलो ने विक्री होत आहे. भाजीपाल्याच्या दरांमध्ये वाढ झाल्याने गृहणींचा बजेट कोलमडलाय.
- 09:06 AM • 18 May 2024
Maharashtra News : विदर्भात दोन दिवस यलो अलर्ट
विदर्भात मे महिन्यात पावसाचे सावट कायम आहे. आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात यलो अलर्ट दिला आहे. विदर्भात वादळी पावसाची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मे महिन्याचा पंधरवडा लोटूनही विदर्भात उन्हाळ्याच्या तीव्रतेऐवजी सातत्याने वादळीवाऱ्यासह गारपीट अनुभवायला येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT