लाइव्ह

Lok Sabha election Live : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, 10 उमेदवारांच्या नावाची घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

वंचितच्या 10 उमेदवारांची घोषणा
वंचितच्या 10 उमेदवारांची घोषणा
social share
google news

Lok Sabha election 2024 Maharashtra Latest Update : लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील प्रचाराचा पारा चढू लागला आहे. दुसरीकडे अजूनही लोकसभेच्या जागावाटपाचा घोळ सुटलेला नाही. या संदर्भातील सर्व माहिती आणि घडामोडींचे अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी... (Maharashtra Politics Lok Sabha election 2024 Live News)

ADVERTISEMENT

 

 

ADVERTISEMENT

  • 09:24 PM • 11 Apr 2024

    वंचित बहुजन आघाडीची नवी यादी जाहीर, 10 उमेदवारांच्या नावाची घोषणा

    वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक 2024 साठी आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी 10 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. 

    1. रायगड - कुमुदिनी चव्हाण
    2. उस्मानाबाद - भाऊसाहेब आंधळकर 
    3. नंदूरबार - हनुमंत सूर्यवंशी 
    4. जळगाव - प्रफुल लोढा
    5. दिंडोरी - गुलाब बार्डे
    6. पालघर - विजया म्हात्रे
    7. भिवंडी - निलेश सांबरे
    8. मुंबई उत्तर - बीना सिंह
    9. मुंबई उतर-पश्चिम - संजीवकुमार कलकोरी
    10. मुंबई दक्षिण-मध्य - अबुल हसन खान

     

  • 04:15 PM • 11 Apr 2024

    Madha lok Sabha Election 2024 : धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या घरी

     

    माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. 

    पुण्यातील पवारांच्या घरी मोहिते पाटील चार वाजता आले. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले, पण यश आले नाही. त्यानंतर आता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

    पवारांकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. असे झाल्यास माढ्याबरोबर सोलापूरमधील गणितंही बदलणार आहेत. 

  • 03:51 PM • 11 Apr 2024

    Lok Sabha election 2024 : महायुतीने सहा नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

    लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात समन्वय राहावा, यासाठी तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोन नेत्यांची समिती नेमली आहे. 

    यात भाजपाकडून गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, शिवसेनेकडून शंभुराजे देसाई, उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे, अनिल पाटील यांचा समावेश आहे.

    Mahayuti appointed Co ordination committee for lok sabha campaign.
    महायुतीकडून सहा नेत्यांची एक समिती नेमण्यात आली आहे.

     

  • 02:15 PM • 11 Apr 2024

    Lok Sabha election 2024 : काँग्रेसच्या दोन जिल्हाध्यक्षांचे राजीनामे, कारण...

    काँग्रेसने धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते नाराज झाले आहेत. यात दोन जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. 

    धुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी गुरुवारी (१० एप्रिल) सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नेत्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. 

    शाम सनेर हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र ऐनवेळी काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली. 

    सनेर यांच्याबरोबरच नाशिक काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष तुषार शेवाळे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. बच्छाव यांच्या उमेदवारीला पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे.

     

     

  • ADVERTISEMENT

  • 12:18 PM • 11 Apr 2024

    Dhule Lok Sabha : शोभा बच्छाव यांना उमेदवारी देताच काँग्रेसला गळती

    धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे. त्याची घोषणा बुधवारी (१० एप्रिल) करण्यात आली. त्यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. यातच काँग्रेसचे नाशिक ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षांनी पदाचा राजीनामा दिला आहे. 

    नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मतदारसंघात गळतीची सुरूवात झाल्याचे म्हटले जात आहे. 

    Congress leader tushar shewale resigned from his post.
    नाशिक ग्रामीणचे कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांचा राजीनामा.
  • 10:47 AM • 11 Apr 2024

    Nashik Lok Sabha election 2024 : छगन भुजबळ भाजपच्या चिन्हावर लढवणार लोकसभा?

    नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाणार, पण त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा भाजपचा प्रस्ताव असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या चर्चेला मात्र भुजबळांनी पूर्णविराम दिला आहे. 

    नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "ही चुकीची बातमी आहे. अतिशय चुकीची बातमी आहे. त्याला कशाचाही आधार नाही. पण, एवढंच सांगतो की, या ठिकाणी अजित पवारांनी ही जागा मागितली. अजित पवार, प्रफुल पटेल यांचं म्हणणं असं आहे की, वरून सांगण्यात आलं की, ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि तर घ्या. परंतु छगन भुजबळांनाच इथं उभं करा. असं त्यांनी मला सांगितलं. यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही. चिन्हाबद्दल माझ्याकडे कुणीही विचारणा केलेली नाही", अशी माहिती भुजबळ यांनी दिली. 

  • ADVERTISEMENT

  • 09:58 AM • 11 Apr 2024

    Lok Sabha election 2024 : "पक्ष फुटलेला असला तरी...", जयंत पाटलांची सरकारवर टीकास्त्र

    हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे मविआ उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ शिराळा येथे सभा झाली. या सभेत बोलताना जयंत पाटलांनी केंद्रावर निशाणा साधला. वाचा ते काय काय म्हणाले?

    "बाबासाहेब पाटील सरूडकर साहेबांना मी गेल्या ४० वर्षांपासून पाहत आलो आहे. सहकार क्षेत्र असो की विधिमंडळ त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली. नम्रता हा त्यांच्यातील सर्वात मोठा गुण आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सत्यजित आबा यांनी लोकांशी नाळ जोडली. लोकांचा खासदार म्हणून सत्यजित आबा आपल्या सर्वांना योग्य न्याय देतील."

    "राज्यातील वीज क्षेत्र बुडण्याच्या मार्गावर आहे. धनिकांच्या वीज कंपन्या चढ्या भावाने महाराष्ट्रात वीज विकत आहेत. त्यामुळे विजेचे दर प्रचंड प्रमाणात वाढवून सर्वसामान्यांना नाहक त्रास दिला जातो आहे."

    "देशातील महागाई, बेरोजगारी, स्त्रियांवरील अत्याचार, दडपशाही शिगेला पोहोचली आहे. हे केंद्राचे प्रशासकीय अपयश आहे. आघाडीद्वारे काँग्रेस पक्षाने घोषित केलेला जाहीरनामा हा सर्वसमावेशक आहे. अंगणवाडी सेविकांना दुप्पट पगार, पदवीधर तरुणांना नोकरी, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी स्वतंत्र आयोग, आरक्षणासाठी विशेष तरतूद अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देण्याची तरतूद नमूद केली आहे."

    "पक्ष फुटलेला असला तरी माणसं फुटलेली नाहीत हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. येणाऱ्या दिवसात गावागावात सर्व पक्षांनी मिळून प्रचाराचा नियोजन करा. जबाबदाऱ्या वाटून घ्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकजुटीने कार्य करायचे आहे."

  • 09:52 AM • 11 Apr 2024

    Maharashtra Marathi news : अमित शाहांची महाराष्ट्रात आज पहिली सभा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता अमित शाह महाराष्ट्रात आज पहिली सभा घेणार आहेत. नांदेडचे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे. 

    नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी येथे ही सभा सायंकाळी चार वाजता होणार आहे. या सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह भाजपाचे मंत्री नेते हजर असणार आहेत. 

  • 09:18 AM • 11 Apr 2024

    Lok Sabha election 2024 : माढ्यात गणित बदलणार? धैर्यशील पाटील घेणार पवारांची भेट

    गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती बदलताना दिसत आहे. 

    भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने धैर्यशील पाटील नाराज आहेत. मोहिते पाटील परिवाराची ही नाराजी भाजपचं टेन्शन वाढवताना दिसत आहे. कारण, धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आज धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांची भेट घेणार आहे. 

    माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असा एक अंदाज आहे. त्यामुळे मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. आज होणाऱ्या भेटीनंतर याबद्दलची अधिक स्पष्टता येईल.

    दुसरीकडे भाजपकडूनही मोहिते पाटील यांची नाराजी दूर करून मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. मोहिते पाटलांनी तुतारी फुंकली, तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांसमोर मोठं आव्हान निर्माण होईल. त्याचबरोबर शेजारी असलेल्या इतर मतदारसंघातील गणितंही बदलतील. त्यामुळेच भाजपचं टेन्शन वाढताना दिसत आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT