लाइव्ह

Maharashtra Lok Sabha Election Live : महाविकास आघाडी, महायुतीची मुंबईत सभा.. PM मोदीही हजर

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीची जाहीर सभा
मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीची जाहीर सभा
social share
google news

Lok Sabha Election 2024 Maharashtra Live News : महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यासाठी, तर देशात पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे पाचव्या टप्प्यात समावेश असलेल्या लोकसभा मतदारसंघातील वातावरण प्रचाराच्या धुरळ्याने ढवळून निगाले आहे. 

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघाचा समावेश पाचव्या टप्प्यात आहेत. यात मुंबईतील सहा लोकसभा, तर राज्यातील सात लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 

महायुती आणि महाविकास आघाडीसाठी हे १३ लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचे असून, दोन्ही बाजूंनी जोरात प्रचार केला जात आहे. महायुतीबरोबरच महाविकास आघाडीने मुंबईतही घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. त्याच बरोबर राष्ट्रीय नेतेही महाराष्ट्रात सभा घेताना दिसत आहेत. 

महाराष्ट्र आणि देशातील लोकसभा निवडणूक, त्याचबरोबर राज्यातील महत्त्वाच्या घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स...

 

ADVERTISEMENT

  • 08:10 PM • 17 May 2024

    Maharashtra Lok Sabha Election 2024 : राज ठाकरे यांच्या मोदींकडे सहा मागण्या

    1) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा.
    2) देशाच्या अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जावा.
    3) शिवछत्रपतींचे गडकिल्ले हीच खरी स्मारके. या गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी. 
    4) मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर करावा.
    5) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कधीही धक्का लावणार नाही, हे सांगा. आणि मूठभर मुस्लीम विरोधात, पण इतर सगळे आपल्यासोबत आहेत. मूठभर मुस्लिमांचे अड्डे तपासा, तिथे सैन्य घुसवा आणि देश कायमचा सुरक्षित करून टाका. 
    6) मुंबईतील लोकल रेल्वे व्यवस्थित कशी होईल, हे पहावं.

  • 06:51 PM • 17 May 2024

    Maharashtra Lok Sabha Election Live: मुंबईत महाविकास आघाडीची जाहीर सभा

    Lok Sabha Election 2024: काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा...पाहा LIVE

     

  • 06:47 PM • 17 May 2024

    Maharashtra Lok Sabha Election Live: मुंबईत महायुतीची जाहीर सभा

     

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र घेणार जाहीर सभा... पाहा LIVE

     

  • 03:47 PM • 17 May 2024

    NCP Maharashtra: अनिल देशमुखांचं वक्तव्य खोटेपणाचा कळस- सुनील तटकरे 

    अनिल देशमुख यांनी वक्तव्य केलं होतं की, 4 जूननंतर राष्ट्रवादीमधले अनेक नेते आमच्याकडे येतील पण आम्ही त्यांना घेणार नाही. आता यावर सुनील तटकरे पत्रकार परिषद घेत बोलले आहेत. ते म्हणाले, 'पराभव दिसत असल्यानं देशमुख असे विधान करत आहेत. अनिल देशमुख स्वत: आमच्यासोबत येणार होते. त्यांना मंत्रिपद हवं होतं. त्यांचं वक्तव्य खोटेपणाचं कळस आहे. विरोधकांकडून आता संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.' त्याचबरोबर भुजबळांबद्दल बोलताना ते म्हणाले, 'छगन भुजबळ महायुतीचं काम जोरात करतायेत. ते नाराज नाहीत.'  

  • ADVERTISEMENT

  • 02:32 PM • 17 May 2024

    maharashtra news : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

    मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. परंतु आज अचानक जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत. यासंबधीचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

     

     

  • 02:30 PM • 17 May 2024

    Ayodhya Poul : 'माझ्यावर हल्ला केला', अयोध्या पौळ यांचा दावा

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा केला आहे. यामिनी जाधव यांच्या महिला कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असा दावा त्यांनी केला. पौळ या ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक आहेत.

  • ADVERTISEMENT

  • 02:05 PM • 17 May 2024

    Maharashtra Live News : गिरीश महाजनांची भुजबळांसोबत दीड तास चर्चा! म्हणाले...

    गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. महायुतीकडून होणाऱ्या प्रचारसभांमध्येही त्यांची उपस्थिती नसते. या पार्श्वभूमीवर भुजबळ फार्मवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी छगन भुजबळांची भेट घेतली. त्यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली, यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला. अनिल देशमुख यांनी वक्तव्य केलं की, 4 जूननंतर राष्ट्रवादीमधले अनेक नेते आमच्याकडे येतील पण आम्ही त्यांना घेणार नाही असा प्रश्न विचारला असता यावर भुजबळ म्हणाले, 'त्यांना म्हणा तुम्ही तुमचं सांभाळा आमच्याकडेच लोक यायला मागतायेत त्यामुळे इकडून कोणी जाण्याचा प्रश्न येत नाही.', भुजबळ साहेबांची नाराजी नाही आहे असं तुम्ही म्हणता मात्र एक ते दीड तास तुम्ही त्यांच्याशी चर्चा करता ही चर्चा नेमकी काय होती? असा प्रश्न महाजनांना विचारला असता ते म्हणाले, 'चर्चा अशी काही विशेष नाही. जिल्ह्यातले काही लोक आहेत, प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही फोनवर चर्चा करत होतो. काही सूचना देत होतो. तसंच अनिल देशमुखांनी तटकरेंची चिंता करू नये. कोण कुठे जातंय हे तुम्हाला 4 जूननंतर कळेल. '


     

  • 01:36 PM • 17 May 2024

    Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

    Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आज (17 मे) अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यात आलं आहे. जिथे त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत. मराठा आरक्षणासाठी वारंवार उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर सातत्याने गंभीर परिणाम होत असल्याचं आतापर्यंत अनेकदा दिसून आलं आहे. आज पुन्हा एकदा अचानक त्यांची प्रकृती बिघडली असल्याचं आता समजतं आहे.

  • 11:33 AM • 17 May 2024

    Maharashtra Lok Sabha election : निवडणूक तोंडावर असतानाच शिंदेंची 'या' नेत्याने सोडली साथ

    कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान २० मे रोजी होत असून, त्यापूर्वीच महत्त्वाच्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साथ सोडली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण-मुरबाडचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

    अरविंद मोरे यांच्या नाराजीच्या कारणाचाही चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदींची कल्याणमध्ये सभा झाली. त्या सभेत व्यासपीठावर स्थान न दिल्याने मोरे नाराज झाले.

    अरविंद मोरे यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे की, "पंतप्रधान मोदी यांनी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याणमध्ये प्रचार सभा घेतली. या सभेत व्यासपीठावर आपल्याला मान दिला नाही."

    "माझी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती आहे. माझ्या हाताखाली आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह पदाधिकारी काम करतात. त्यांना व्यासपीठावर जागा देण्यात आली. मात्र, आम्ही काम करून सुद्धा व्यासपीठावर जागा देण्यात आली नाही. मग, या पदाचा काय फायदा?", असा सवाल मोरेंनी केला आहे. 

    कल्याण आणि ठाण्यातील लोकसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या प्रतिष्ठेची बनली आहे. कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे हेच मैदानात आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने येथून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. 

    या मतदारसंघात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात म्हणजे २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच जिल्हाप्रमुखाने राजीनामा दिला आहे. त्याचा परिणाम मतदानावरही होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.

  • 10:02 AM • 17 May 2024

    Maharashtra News : उद्धव ठाकरेंवर भाजपची टीका

    उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वजाचा उल्लेख फडके असा केला. त्यावरून भाजपने टीकास्त्र डागलं आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरेंना लक्ष्ये केले.

    केशव उपाध्ये काय म्हणाले वाचा...

    "संघाच्या ध्वजाला फडके म्हणण्यापर्यंत जनाब उध्दव ठाकरे यांची मजल गेली, अर्थात जेव्हापासून उबाठा मविआमध्ये गेले तेव्हापासून एकाच वेळेला विचार, आचार आणि संस्कार गहाण टाकण्याचा अत्यंत खराब विश्वविक्रम नकली शिवसेना आणि वैचारिकदृष्ट्या वारसा सोडलेल्या उद्धव ठाकरे यांनी केला आहे."

    "एकीकडे अख्ख्या पाकिस्तानाला धडकी भरवणारे आपले वं. बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे घेऊन फिरणारे उबाठा." 

    "शिवसेना म्हटले की 'खान की बाण' अशा निवडणुका महाराष्ट्रात आपण पाहिल्या आहेत. पण आज उबाठा ना विचारायचं आहे तुम्ही सेक्युलर हिंदुत्वाची गोष्ट करताय. पण मुळात आता तुमच्यासोबत असणारे किती दिग्गज वं. बाळासाहेबांच्या "हिंदुत्वाला" मानणारे आहेत हे एकदा तपासा कारण तुम्ही सेक्युलर हिंदुत्वाची गोष्ट फक्त आता मुस्लिम समाजाला केंद्र स्थानी ठेऊन करताना दिसताय."

    "भूमिका घेताना त्यांनी थेट भूमिका घेतली, ताकाला जाऊन भांड लपवायचं काम केले नाही, आता तुम्ही भांडे लपवता, ताकाच्या ऐवजी शिरखुर्मा आणता आणि अंगावर बुरखा घेऊन लपता सुद्धा, वर म्हणता आम्ही ना हिंदुत्व सोडलय ना बाळासाहेबांचे विचार. जरा तरी बाळगा."

    "तुम्ही लांगुलचालन आणि मतासाठी पाय धरण्याची वृत्ती जेव्हा स्वीकारली तेव्हाच तुम्ही हिंदुत्व आणि स्वाभिमान दोन्हीही सोडले."

    "जे शरद पवार १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर एक जास्त स्फोट झाल्याचे सांगत खोटं बोलले, त्यातल्या आरोपींना सुध्दा तुम्ही तुमच्या प्रचार रॅली मध्ये फिरवता !! अशा  लोकांशी हात मिळवणी  करून तुम्ही कदाचित विसरून गेले की, १९९३ साली शिवसेना भवनासमोर देखील बॉम्ब ठेवला गेला होता पण जनता विसरली नाही."

    "नुसतंच 'माझा बाप चोरला' म्हणण्यापेक्षा वडिलांना त्यांच्या विचाराने जपले असते तर ही वेळ तुमच्यावर मुळीच आली नसती.. जरा विचार करा, पक्षासाठी नाही निदान कालातीत असलेल्या हिंदू धर्मासाठी तरी थोडी… बाळगा.. भगवा ध्वज हा त्याच हिंदुत्वाचे प्रतिक आहे.. जरा त्याचा मान ठेवायला शिका !!"

  • 08:43 AM • 17 May 2024

    Maharashtra Lok Sabha election : अजित पवारांच्या आजाराची चर्चा... पण, झालंय काय?

    चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अजित पवार प्रचारातून गायब झाल्याचे दिसले. त्याची चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षाच्या प्रवक्त्यांकडून याबद्दल खुलासा करण्यात आला. 

    अजित पवार आजारी असल्याने प्रचारापासून दूर असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

    अजित पवारांना घशाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले होते. डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे अजित पवार प्रचारापासून दूर होते, अशी माहिती प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली. 

    अजित पवार महायुतीच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. शेवटच्या टप्प्यातील प्रचार सुरू असून, आता दोन दिवसच शिल्लक राहिले आहेत. 

    पंतप्रधान मोदी यांच्या राज्यातील दौऱ्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हजर होते, पण अजित पवार अनुपस्थित होते. त्यामुळे याची चर्चा सुरू झाली होती. 

    अजित पवारांनी संपूर्ण निवडणुकीत जास्त लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघात केल्याचे दिसले. पंतप्रधान मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरला, तिथेही अजित पवार हजर नव्हते. ही बाबही राजकीय वर्तुळात चर्चेत राहिली. 
     

follow whatsapp

ADVERTISEMENT