Bhiwandi Lok Sabha: 'डोळे फुटलेत का तुझे भ&@#', BJP च्या कपिल पाटलांची मतदान केंद्रावर पोलिसांना अरेरावी

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra lok sabha 2024 kapil patil use abusive language viral video bhiwandi lok sabha
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या अरेरावीचा व्हिडिओ समोर आला आहे.
social share
google news

Kapil Patil Viral Video: विक्रांत चव्हाण, भिवंडी :  महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यात सकाळी शांततेत सुरु असलेल्या मतदानाने मुंबई आणि इतर मतदारसंघात संध्याकाळपर्यंत बराच गदारोळ पाहायला मिळाला मिळाला. त्यातच आता भिवंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या अरेरावीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत कपिल पाटील (Kapil Patil) पोलीस अधिकाऱ्यांना अपशब्द वापरताना दिसत आहेत. त्यामुळे आता कपिल पाटलांवर जोरदार टीका होत आहे.  (maharashtra lok sabha 2024 kapil patil use abusive language viral video bhiwandi lok sabha)

भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील हे खंडूपाडा बाला कंपाऊड मिल्लत नगर येथील अल्पसंख्याक बहुल असलेल्या मतदान केंद्रावर दाखल झाले होते. या मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला होता. याच घटनेवरून कपिल पाटील प्रचंड चिडले होते आणि त्यांनी मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. 

हे ही वाचा : "तावडेंना तिकीट दिलं होतं, पण...", फडणवीसांनी सांगितली सगळी स्टोरी

दरम्यान, कपिल पाटील यावेळी दमदाटी करत असताना त्यांच्या तोंडून अपशब्द देखील बाहेर पडले होते. व्हायरल व्हिडिओत मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांच्या गराड्यात असताना इतर ठिकाणी का गर्दी आहे? असा दम देत, तेथील आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना दादागिरीच्या भाषेत 'डोळे फुटलेत का तुझे भ&@# तिकडे काय &@#** मारतो का?' असे बेताल वक्तव्य करताना दिसत व्हिडिओमध्ये दिसत आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एक जबाबदार लोकप्रतिनिधी आणि केंद्रीय मंत्री असलेले कपिल पाटील हे जर पोलिसांशी अशा भाषेत बोलत असतील आणि सार्वजनिकरित्या अशा प्रकारचं वर्तन केल्याने भिवंडीमधील अनेक नागरिकांनी त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. 

हे ही वाचा : पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या आरोपीला 'निबंध' लिहीण्याच्या शिक्षेसह कोणत्या अटींवर जामीन?

दरम्यान, कपिल पाटील यांचा हा अरेरावीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत आहे. ज्यामुळे कपिल पाटील हे सध्या बरेच अडचणीत सापडले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT