Devendra Fadnavis : "तावडेंना तिकीट दिलं होतं, पण...", फडणवीसांनी सांगितली सगळी स्टोरी

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे.
विनोद तावडे यांच्या उमेदवारीबद्दल देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा

point

विनोद तावडे यांना का दिले गेले नाही तिकीट?

point

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय घडले होते?

Devendra Fadnavis on Vinod Tawde : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपमधील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना उमेदवारी दिली गेली नाही. यात एकनाथ खडसेंपासून ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत काही नेत्यांचा समावेश होता. एक नाव होतं विनोद तावडे यांचं. २०१९ मध्ये विनोद तावडे यांचं तिकीट कापल्याची प्रचंड चर्चा झाली. याबद्दलचं जवळपास साडेचार वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. तावडे यांच्या उमेदवारीची सगळी गोष्टी फडणवीसांनी सांगून टाकली. (Vinod Tawde was given ticket in 2029, but BJP stopped him. Devendra Fadnavis Revealed the full story.)

ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर द लल्लनटॉपला मुलाखत दिली. 

'असं म्हटलं गेलं की, 2019 मध्ये विनोद तावडे यांचे तिकीट कापण्यात आले. जसे एकनाथ खडसेंचं कापलं. नंतर राज्याच्या राजकारणातून ते जावेत म्हणून खबरदारी घेतली गेली. तावडेजी राष्ट्रीय नेते तर झाले आहेत. पण, ज्या महाराष्ट्रात त्यांचे मन लागते, तिथे ते सक्रिय नाहीत', असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. 

या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिले?

फडणवीस म्हणाले की, "नाही, असं नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी २०१९ चे तिकिटे फायनल झाले. महाराष्ट्रातून एकमताने विनोद तावडे यांचे नाव पाठवण्यात आले होते. संसदीय मंडळालाही आम्ही एकमताने विनोद तावडेजींचं नाव दिले होते. दुसरे नाव दिले नव्हते. ते मान्यही झाले होते."

हे वाचलं का?

हेही वाचा >> पूनम महाजनांचं तिकीट कापलं, कारण...फडणवीसांनीच सांगितलं काय घडलं?

"त्यानंतर पक्षाचा असा निर्णय झाला की, काही लोकांना थांबवण्यात यावे आणि पक्षाचे काम दिले जावे. त्यात तावडेजी होते. त्यामुळे त्यांना रोखण्यात आले. त्यावेळचेही माझे विधान बघून घ्या. मी त्यावेळीही सांगितले होते की, तावडेजींना पक्षाच्या कामासाठी थांबवण्यात आले आहे. त्यांचे तिकीट कापलेले नाही. त्यावेळी मुख्यमंत्री असताना ते विधान केले होते", असेही फडणवीस या मुलाखतीत म्हणाले.

हेही वाचा >> फडणवीसांचा उपमुख्यमंत्री होण्यास नकार, मग मोदींनी केला फोन! Inside Story 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "तावडेजींना स्वतःलाच केंद्रात जायचे होते. माझ्याशी आणि चंद्रकांत पाटलांसोबत तावडेजी बोलले की, 'मला भाजपच्या केंद्रीय पातळीवर काम करायचे आहे.' त्यानंतर आम्ही दोघांनी जाऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला ही विनंती केली की, महाराष्ट्राच्या कोट्यातून तुम्ही जे सचिव किंवा महासचिव घेता; त्यात तावडेजींना घ्या. आमच्याकडून नावे मागितली जातात, आम्ही तावडे यांचे नाव दिले होते."

ADVERTISEMENT

त्यानंतर पक्षाचे अध्यक्षपदच आहे -फडणवीस

"भाजपने त्यांना सचिव बनवले. नंतर त्यांनी चांगले काम केले, त्यामुळे त्यांना महासचिव बनवले. मला असं वाटतं की, भाजपमध्ये पक्षाचा महासचिव होणे, हे खूप मोठे पद आहे. पक्षात यापेक्षा मोठे पद काय असू शकते. नंतर अध्यक्षपदच आहे. त्यामुळे मला नाही वाटत की, त्यांनी महाराष्ट्रात काम करू नये म्हणून... आणि महासचिव म्हणून महाराष्ट्रात त्यांची भूमिका असायला हवी, तो तर आहेच", असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT