Maharashtra Lok Sabha : पूनम महाजनांचं तिकीट कापलं, कारण...फडणवीसांनीच सांगितलं काय घडलं?
Devendra Fadnavis Poonam Mahajan : पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांना तिकीट न देण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगितलं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पूनम महाजन यांना का दिलं गेलं नाही तिकीट?
पूनम महाजन विधानसभा निवडणूक लढवणार?
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis on Poonam Mahajan : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या खासदार राहिलेल्या पूनम महाजन यांचा पत्ता यावेळी कट करण्यात आला. प्रमोद महाजन यांच्या कन्या असलेल्या पूनम महाजन तिकीट न दिल्याची चर्चा अजूनही थांबलेली नाही. त्यांना तिकीट का नाकारलं गेलं, याबद्दल आता देवेंद्र फडणवीस यांनीच खुलासा केला आहे. महत्त्वाचे म्हणजे पूनम महाजन विधानसभा निवडणूक लढवणार, याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. (Why did bjp not nominated to Poonam Mahajan in lok sabha election)
ADVERTISEMENT
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने पूनम महाजन यांना उमेदवारी न देता प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट दिले आहे. पूनम महाजन यांना उमेदवारी न दिल्याची चर्चा अजूनही सुरू आहे.
पूनम महाजनांना का दिलं नाही तिकीट, फडणवीस यांनी सांगितलं कारण
राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना पूनम महाजन यांच्या उमेदवारीविषयी विचारलं गेलं. त्यावेळी त्यांनी वेगळंच कारण सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे पूनम महाजन यांना राज्यात आणण्याचा पक्षाचा विचार असल्याचे संकेतही त्यांनी दिलेत.
हे वाचलं का?
'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी पूनम महाजनांच्या उमेदवारीबद्दल भाष्य केले.
फडणवीस म्हणाले, "पूनम महाजन यांचा मुद्दा आहे, तर तुम्ही बघितलं असेल अनेक राज्यात जे खासदार आहेत, ते विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. जे आमदार आहेत, ते खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे असा मुद्दा उपस्थित झाला की, काही खासदारांना आपण राज्यामध्ये पाठवलं पाहिजे, कारण लवकरच तिथे निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हा निर्णय झाला आहे. कुणाचेही तिकीट कापण्यात आलेले नाही."
हेही वाचा >> पुण्यात पोर्शे कारने तरुण-तरुणीला चिरडले! थरकाप उडवणारी घटना
पूनम महाजन यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले जाणार आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, हे माझ्या हातात नाही. पण, पूनम महाजनांना पक्ष रिकाम ठेवणार नाही, असे ते म्हणाले.
ADVERTISEMENT
पूनम महाजन राहिल्यात दोन वेळा खासदार
भाजपच्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. त्या प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. २००६ मध्ये प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यानंतर त्या भाजपमध्ये सक्रिय झाल्या.
ADVERTISEMENT
२००९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण, त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
हेही वाचा >> "मला संध्याकाळीच पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला असता"
२०१४ मध्ये भाजपने त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. प्रिया दत्त यांचा पराभव करत त्या लोकसभेत पोहोचल्या. २०१९ मध्ये पूनम महाजन यांनी दुसऱ्यांदा प्रिया दत्त यांचा पराभव केला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT