लाइव्ह

Maharashtra Lok Sabha 2024 Live : एक्झिट पोलला उरले फक्त काही तास, वाचा प्रत्येक अपडेट!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Lok Sabha Election Live Update : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज 1 जून रोजी पार पडणार आहे. हा टप्पा पार पडताच लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपेल. आज मतदान पार पडल्यावर संध्याकाळी 5 नंतर एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. या पोलमधून देशाचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचं चित्र काय असेल याचा साधारण अंदाज येणार आहे. तसंच  पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचे लाईव्ह अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी...

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:50 PM • 01 Jun 2024

    Lok Sabha Election 2024 : इंडिया आघाडीच्या 295 जागा येणार, मल्लिकार्जून खर्गेंचा ठाम विश्वास!

    लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील म्हणजेच अखेरच्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही मिनिटांत संपेल.त्यानंतर एक्झिट पोलला सुरूवात होणार आहे. यंदा देशात महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार? कुणाचं पारडं जड होणार? याचा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवला जाईल. पण यापूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. 

  • 04:08 PM • 01 Jun 2024

    Maharashtra Live : एक्झिट पोलआधी INDIA आघाडीची बैठक, दिग्गज नेत्यांची हजेरी!

    आजच्या बैठकीला INDIA आघाडीचे अनेक नेते उपस्थित आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, सपा प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, जितेंद्र आव्हाड, आपचे नेते अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, संजय सिंह, राघव चढ्ढा, द्रमुकचे टी.आर. बालू, आरजेडीकडून तेजस्वी यादव आणि संजय यादव, जेएमएमकडून चंपाई सोरेन आणि कल्पना सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सकडून फारुख अब्दुल्ला, सीपीआयकडून डी. राजा, सीपीआय (एम) कडून सीताराम येचुरी, शिवसेनेकडून अनिल देसाई (उद्धव ठाकरे गट), अनिल देसाई या बैठकीला सीपीआय (एमएल) कडून दीपंकर भट्टाचार्य आणि बिहारच्या व्हीआयपी पार्टीचे मुकेश साहनी उपस्थित आहेत.

  • 03:52 PM • 01 Jun 2024

    Maharashtra News : शिवानी अग्रवालची चौकशी सुरु

    कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिची पोलीस चौकशी सुरू आहे.पुणे पोलीस अधिकारी ही चौकशी करत आहेत. ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात आज पुणे पोलिसांनी तिला अटक केली आहे.

     

  • 02:05 PM • 01 Jun 2024

    Beed News : जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी घेतला स्ट्रॉंग रूमचा आढावा

    बीड लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली तर 4 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. बीड शहरातील बाजार समिती भागात स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आणि याच ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दरम्यान आज याचाच आढावा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी घेतला. बीड लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहा विधानसभा मतदारसंघात 14 काउंटिंग टेबल ठेवण्यात आले असून 4 जून रोजी सकाळी आठ वाजता पोस्टल मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात होईल. त्यानंतर EVM मशीनच्या मतमोजणीला सुरुवात होईल. बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे आता मतदार राजाने नेमका कोणाच्या बाजूने कौल दिलाय? हे 4 जून रोजी स्पष्ट होईल..

  • ADVERTISEMENT

  • 01:54 PM • 01 Jun 2024

    Maharashtra News : जयंत पाटील भाजप किंवा कॉंग्रेसमध्ये जाणार?

    एकीकडे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे निकालानंतर भाजपात जातील असा दावा केला जात असतानाच आता भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील कॉंग्रेस किंवा भाजपात जातील असे म्हटले आहे.

     

  • 12:38 PM • 01 Jun 2024

    Maharashtra News : 'चारही बाजूंनी कॅमेरे लावून कसली ध्यानधारणा?' राऊतांची मोदींवर टीका 

    '4 जूननंतर देशात चक्र उलटं फिरणार, सामनात आम्ही सत्याच्या आधारावरच लिहितो. बेकायदेशीर मुख्यमंत्री आम्हाला नोटीस पाठवणार? तुम्हाला कोर्टात जायचं तर जा, आम्ही घाबरणार नाही. मोदींनी सेलिब्रेटींच्या सोयीनुसार निवडणुकीच्या तारखा ठरवल्या. मी तर म्हणतोय संपूर्ण देश राहुल गांधींसोबत आहे.' असं शिवसेना (UBT) नेते संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर 'चारही बाजूंनी कॅमेरे लावून कसली ध्यानधारणा?' असा सवाल करत राऊतांनी मोदींवर टीकाही केली. 

  • ADVERTISEMENT

  • 12:03 PM • 01 Jun 2024

    Maharashtra News : नाशिकमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू

    नाशिकमध्ये स्वाईन फ्लूमुळे पुन्हा दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 5 महिन्यात 28 जणांना स्वाईन फ्लू ची लागण तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूसोबत स्वाईन फ्लूचे देखील रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलं आहे. मृतांमध्ये एका महिलेचा आणि 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

     

  • 11:55 AM • 01 Jun 2024

    Maharashtra News : पुणे पोलीस शिवानी अग्रवालला घेऊन बाल न्याय मंडळात दाखल

    पुणे पोलीस शिवानी अगरवालला घेऊन बाल न्याय मंडळात दाखल झाले आहेत. शिवानी अग्रवालसोबत अल्पवयीन आरोपीची चौकशी केली जाणार आहे. मायलेकाची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी ही चौकशी केली जाणार आहे.

     

  • 11:46 AM • 01 Jun 2024

    Maharashtra News : विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज बैठक

    विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज राजधानी नवी दिल्ली येथे बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दुपारी 3 वाजता बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यासह इतर पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

     

  • 10:50 AM • 01 Jun 2024

    Maharashtra News : राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल

    निकालाआधीच महायुती राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विनापरवाना सभा घेतल्याने आचारसंहिता भंग. अर्चना पाटील यांच्यावर 43 दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना रॅली काढून जाहीर सभा घेतल्याने गुन्हा दाखल, या सभेसाठी परवानगी घेण्यात आली नव्हती.

     

  • 10:47 AM • 01 Jun 2024

    Maharashtra News : शिरुर तालुक्यात 15 वर्षीय मुलीने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

    पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असताना शिरुर तालुक्यातही एका अल्पवयीन पोलीस पाटलाच्या १५ वर्षीय मुलीने मालवाहू पिकउप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात एवढा गंभीर होता की मालवाहु पिकअपने मोटार सायकलसह चालकास 20 ते 30 फुट फरफटत नेले,या अपघातात दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला तर महिंद्र बांडे हा जखमी झाला.

    पिकअप क्रं एम एच 12 एस एफ 3439 अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी चालवत होती. तिच्या सोबत शेजारील सिटवर पोलीस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते. सदर मुलीने तिच्या ताब्यातील सदरचा पिकअप हा जोरात भरधाव वेगात चालवुन दुचाकीला समोरुन धडक देवुन सदरचा अपघात केलाय,या प्रकरणी शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  • 10:30 AM • 01 Jun 2024

    Maharashtra News : पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल अटकेत!

    पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी क्राईम ब्रांचने ही कारवाई केली असून आज 11.30 वाजता शिवानी अग्रवालच्या समोर अल्पवयीन आरोपीची चौकशी होणार आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT