लाइव्ह

Lok Sabha Election Maharashtra Live : पवारांच्या उमेदवाराची ताकद वाढली; 'या' उमेदवाराने घेतली माघार

मुंबई तक

ADVERTISEMENT

दिंडोरी लोकसभा निवडणूक २०२४ : भारती पवार, भास्कर भगरे आणि शरद पवार.
दिंडोरी लोकसभा निवडणूक २०२४ : भारती पवार, भास्कर भगरे आणि शरद पवार.
social share
google news

Lok Sabha Election 2024 Maharashtra Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच ७ मे रोजी होत आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघामधील प्रचार ५ मे रोजी संपला असून, या ११ जागांचा समावेश आहे. 

ADVERTISEMENT

दुसरीकडे चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदारसंघावर आता राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले असून, मराठवाडा, खान्देश, मुंबईमधील मतदारसंघाचा यात प्रामुख्याने समावेश आहे. 

उन्हाच्या झळांनी अंगाची लाहिली होत असताना सर्व पक्षाचे नेते गावोगाव-घरोघरी फिरत असून, राजकीय रणधुमाळी जोरात सुरू आहे. दुसरीकडे बेरजेचं राजकारणाचेही प्रयत्न होताना दिसत आहेत.

महाराष्ट्रासह देशातील लोकसभा निवडणूक २०२४ आणि राज्यातील महत्त्वाच्या घटना घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स...

ADVERTISEMENT

  • 05:59 PM • 06 May 2024

    'वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा'- एस. एम. मुश्रीफ

    मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ला होणार अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांनी आय बी खात्याला दिलेली होती. मुंबईतील दोन हॉटेलवर हल्ला करण्यासाठी बोट निघाली असून त्याचे अक्षांश आणि रेखांश असे आहेत अशी ईत्तमभूत माहिती अमेरिकन एजन्सीकडून मिळाली असतानाही ही माहिती मुंबई पोलीस महाराष्ट्र शासन यांना देण्याची जबाबदारी गुप्तचर संघटनेचे अधिकारी तत्कालीन अधिकारी प्रभाकर अलोक यांची होती.

    मात्र खटला सुरू झाल्यानंतर आर.एस.एस आणि  एडवोकेट उज्वल निकम या दोघांनी मिळून त्यावेळच्या शासन आणि कोर्टाची ही दिशाभूल केली. त्यामुळे उज्वल निकम हे या सगळ्या बाबीसाठी संपूर्णपणे जबाबदार आहेत. आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी करत 'हु किल्ड करकरे' पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निकम यांच्यावर केलेले

  • 01:58 PM • 06 May 2024

    Dindori Lok Sabha : पवारांच्या उमेदवाराची ताकद वाढली; 'या' पक्षाने दिला पाठिंबा

    दिंडोरी लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाला आहे. या मतदारसंघातून शरद पवारांनी भास्कर भगरे यांना उमेदवारी दिलेली आहे. पण, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या मतदारसंघातून उमेदवार उतरवल्याने भगरेंच्या अडचणी वाढल्या होत्या. 

    माकपच्या उमेदवारांमुळे भाजपच्या उमेदवाराला फायदा होणार अशी स्थिती या मतदारसंघात निर्माण झाली होती. पण, शरद पवार यांनी केलेल्या शिष्टाईला यश आले आहे. माकपचे उमेदवार जे.पी. गावित यांनी मतदारसंघातून माघार घेतली आहे. 

    "पक्षाच्या निर्णयानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) जागा सोडलेली आहे. इथे एकच उमेदवार हवा म्हणून तुम्ही उमेदवारी मागे घ्या, अशी विनंती मविआने केली होती. पक्षाने मला सूचना केली होती. त्यानुसार उमेदवारी मागे घेत आहे", असे जे.पी. गावित म्हणाले. 

    "भास्कर भगरे यांना पाठिंबा देत आहोत. त्यांचा प्रचार करणार आहे. भास्कर भगरे यांच्या विजयसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरात कामाला लागले पाहिजे", असे जे.पी. गावित म्हणाले.

    2019 मध्ये कशी झाली होती लढत?

    2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या भारती पवार या विजयी झाल्या होत्या. त्यांना ५ लाख ६७ हजार ४७० मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनराज महाले यांना ३ लाख ६८ हजार ६९१ मते मिळाली होती. गेल्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे.पी. गावित हेच उमेदवार होते. त्यांना १ लाख ९ लाख ५७० इतकी मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीच्या बापू बरडे यांना ५८ हजार मते मिळाली होती. 

  • 01:27 PM • 06 May 2024

    Mumbai North East Lok Sabha : गुजराती सोसायटीमध्ये मराठी उमेदवाराला प्रचार करण्यास विरोध

    उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजय दिना पाटील यांचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीमध्ये विरोध झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.  

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते घाटकोपरमध्ये गेले होते. त्यावेळी मराठी पत्रके वाटण्यास त्यांना विरोध करण्यात आला. मराठी माणसांना बिल्डिंगमध्ये प्रचार करु देणार नाही, असे सांगण्यात आल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला. सोसायटीत आम्ही परवानगी घेऊन प्रचार करत आहोत, असे त्यांनी सांगितले, त्यानंतर हा वाद सुरु झाला होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला.

  • 10:36 AM • 06 May 2024

    प्रचाराला आले, पण 'गोविंदा' श्रीरंग बारणेंचं नाव विसरले!

    शिवसेनेचे नेते गोविंदा सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने राज्यभर फिरताना दिसत आहे. महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार गोविंदा प्रचार करत असून, मावळमध्येही ते प्रचारासाठी आले होते. 

    महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या रोड शोसाठी गोविंदा रविवारी (५ मे) मावळ लोकसभा मतदारसंघात आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत गोविंदा यांनी उपस्थितांची नावांचा उल्लेख केला. पण, ज्यांच्या रोड शो साठी ते आले; त्या श्रीरंग बारणेंचं नावच त्यांच्या लक्षात नव्हतं. 

    शेजारी बसलेल्या भाजपच्या आमदार उमा खापरेंना सांगावं लागलं. हे सगळं माध्यमांच्या कॅमेरात कैद झालं. 

  • ADVERTISEMENT

  • 08:58 AM • 06 May 2024

    "आमचा पक्ष काँग्रेसच, पण...", विशाल पाटलांचं मोठं विधान

    सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची उदाहरणे देत मोठं विधान केले आहे. 

    "शरद पवार दावा करतात की, त्यांचाच पक्ष राष्ट्रवादी आहे, फक्त चिन्ह चोरले गेले आङे. उद्धव ठाकरेही दावा करतात की, त्यांचाच पक्ष शिवसेना आहे, पण धनुष्यबाण चिन्ह चोरले आहे. तसेच आमच्यासोबत सांगलीमध्ये झाले आहे. आमचे चिन्ह सांगलीत चोरले गेले आहे", असे त्यांनी सांगितले.

    "काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे ज्याला महाविकास आघाडीचे महत्त्व समजते. इंडिया आघाडीत खऱ्या अर्थाने भाजपला घालवण्यास एकत्र यायचे हा काँग्रेसचा अजेंडा आहे. इतरांचे मात्र काही वेगळे अजेंडे आहेत. कुणाला पक्ष संघटना वाढवायची आहे, तर कुणाला नवीन नेतृत्व तयार करायचे आहे", असे म्हणत विशाल पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्या अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. 

  • 08:34 AM • 06 May 2024

    Maharashtra Lok Sabha : काँग्रेसला मनधरणी करण्यात यश, गायकवाडांना मिळणार ताकद

    उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या नसीम खान यांची निराशा झाली. त्यामुळे ते वर्षा गायकवाड यांच्या प्रचारापासून बाजूला होते.

    काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर नसीम खान यांची नाराजी दूर झाली आहे. नसीम खान यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारातही सहभाग घेतला असून, वर्षा गायकवाड यांचे टेन्शन यामुळे कमी झाल्याचे म्हटले जात आहे. 

    चार वेळा आमदार राहिलेले आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेले नसीम खान हे काँग्रेस प्रदेश कमिटीचे कार्याध्यक्षही आहेत. नसीम खान रायगडमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेला हजर होते. त्याचबरोबर ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत. 

    दुसरीकडे भाई जगताप हेही वर्षा गायकवाड यांच्याबद्दल नाराज होते. पण, त्यांनीही समजूतदारपणाची भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काम करणार अशी भूमिका भाई जगताप यांनी घेतली आहे. 

    मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, अमरजित मन्हास, नसीम खान हे नेते वर्षा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थितीत नव्हते. महत्त्वाचं म्हणजे नसीम खान यांच्या नाराजी फटका जास्त बसेल, असे म्हटले जात होते, पण त्यांची नाराजी दूर झाली आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT