लाइव्ह

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live : ठाकरेंना झटका! तीन निष्ठावंत शिवसैनिकांचा पराभव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray with NCP-SCP chief Sharad Pawar; (Photo: Milind Shelte)
Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray with NCP-SCP chief Sharad Pawar; (Photo: Milind Shelte)
social share
google news

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live : केंद्रातील सत्ता ठरवण्यात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. 

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात तब्बल 48 लोकसभा मतदारसंघ आहे. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रात असून, महाराष्ट्रातील जनतेचा जनादेश कुणाला आहे, हे हळूहळू स्पष्ट होत आहे. 

महाराष्ट्रात यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होती. काही मतदारसंघात बंडखोर आणि छोट्या पक्षाचे उमेदवार रिंगणात होते. त्यांचा कुणाला फटका बसला हेही निकालातून स्पष्ट होईल. 

लोकसभेची ही निवडणूक उद्धव ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर भाजपच्या कामगिरीकडेही सगळ्यांचे लक्ष आहे... त्यांना किती जागा मिळताहेत, याबद्दलचेही अपडेट वाचा...

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती. युतीने तब्बल 41 जागा जिंकल्या होत्या, तर आघाडीला 6 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला एकच जागा गेल्या निवडणुकीत मिळाली होती. त्यामुळे या निवडणुकीत किती जागा मिळणार याचीही सगळ्यांना उत्सुकता होती. 

महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे ताजे अपडेट्स वाचण्यासाठी वाचत रहा लाईव्ह ब्लॉग..

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 08:22 PM • 04 Jun 2024

    Beed Lok Sabha Elections Results 2024 Live : 'बीडमधील घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवा', पवारांचे पोलीस महासंचालकांना आवाहन

    लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोलीस महासंचालकांचे लक्ष वेधले आहे. 

    "बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे सत्वर लक्ष पुरवावे", असे शरद पवारांनी म्हटले आहे. 

     

  • 06:58 PM • 04 Jun 2024

    Raigad Lok Sabha Results 2024 Live : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 'या' मतदारसंघात उधळला गुलाल!

    लोकसभा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत एक जागा जिंकली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे विजयी झाले आहेत. तटकरे यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनंत गीते यांचा 82 हजार 784 मतांनी पराभव केला. 

  • 05:56 PM • 04 Jun 2024

    Shirdi Lok Sabha Results 2024 Live : ठाकरेंनी शिर्डी पुन्हा मिळवली!

    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पुन्हा एकदा आपला मतदारसंघ मिळवला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांचा पराभव करत भाऊसाहेब वाकचौरे यांनी विजय मिळवला आहे. 


    भाऊसाहेब वाकचौरे ( UBT ) - 4 लाख 76 हजार 900 मते

    सदाशिव लोखंडे ( शिवसेना, शिंदे ) - 4 लाख 26 हजार 371 मते

    उत्कर्षा रूपवते ( वंचित ) - 90 हजार 929 मते

    50 हजार 529 मतांनी भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. 

  • 05:34 PM • 04 Jun 2024

    Shiv Sena UBT Lok Sabha Results 2024 : ठाकरेंना झटका! तीन निष्ठावंत शिवसैनिकांचा पराभव

    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असली, तरी ठाणे-कोकणातील तीन निष्ठावंत शिवसैनिकांचा पराभव झाला आहे. 

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार विनायक राऊत यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पराभव केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे 47 हजार 858 मतांनी विजयी झाले आहेत. 

    रायगड लोकसभा मतदारसंघातही ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. अनंत गीते हे निवडणूक लढवत होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी 82784 मतांनी गीतेंचा पराभव केला आहे. 

    ठाणे लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला आहे. 

  • ADVERTISEMENT

  • 05:27 PM • 04 Jun 2024

    ratnagiri sindhudurg lok sabha Results 2024 Live : नारायण राणेंचा निकाल आला! रत्नागिरीतून किती घेतली आघाडी?

    भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय झाला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे 47 हजार 858 मतांनी विजयी झाले आहे. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विनायक राऊत हे निवडणूक लढवत होते. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

  • 01:06 PM • 04 Jun 2024

    Maharashtra Lok Sabha Elections Results 2024 : काँग्रेस 'या' 11 जागांवर आघाडीवर

    नंदूरबारमधून गोवाल पडवी ९ हजार मतांनी आघाडीवर

    अकोलामधून अभय पाटील ११ हजार मतांनी आघाडीवर

    रामटेकमधून श्यामकुमार बर्वे ३४ हजार मतांनी आघाडीवर

    भंडारा गोंदियामधून प्रशांत पडोळे १४०० मतांनी आघाडीवर

    गडचिरोली चिमूरमधून नामदेव किरसान हे २४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

    चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर या ८९ हजार मतांनी आघाडीवर आहे. 

    नांदेडमधून वसंतराव चव्हाण हे 14 हजार मतांनी आघाडीवर आहे. 

    जालना लोकसभा मतदारसंघातून कल्याण काळे हे ५ हजार मतांनी आघाडीवर आहे. 

    लातूरमधून शिवाजी काळगे हे १४ हजार मतांनी आघाडीवर आहे.

    सोलापूरमधून प्रणिती शिंदे या १४ हजार मतांनी आघाडीवर आहे. 

    कोल्हापूरमधून शाहू छत्रपती हे ६४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. 
     

  • ADVERTISEMENT

  • 12:31 PM • 04 Jun 2024

    Pune Lok Sabha Elections 2024 Live : पुण्यात मोहोळ आघाडीवर

    पुणे लोकसभा मतमोजणी

    वडगाव शेरी - मोहोळ - ६०९३  - धंगेकर. - ४८०२
    शिवाजीनगर -३४५७  - ३५७६
    कोथरुड - ५३४५- ३३०७
    पर्वती - ४७०९- ५२६७ 
    कॅन्टोनेंंट - २३०९ - ४१९१
    कसबा - ५३६२ - ३२८७
    एकूण. -  २७२७५ -  २४४३०

    मोहोळ यांची ६व्या फेरीतील आघाडी - २८४५ 

    मोहोळ यांची एकूण आघाडी ३८५२८

    पुणे लोकसभा आत्तापर्यंत एकूण मतं

    मुरलीधर मोहोळ: 2,03,000

    रवींद्र धंगेकर: 1,63,000

     बारामती लोकसभा आत्तापर्यंत एकूण मतं

    सुप्रिया सुळे: 1,77,000

    सुनेत्रा पवार: 1,66,000

  • 12:26 PM • 04 Jun 2024

    Maharashtra Lok Sabha elections 2024 Live : सहा मतदारसंघातील महत्त्वाचे अपडेट्स

    - नारायण राणे २० हजारांनी आघाडीवर
    - अनिल देसाई २४ हजारांनी पुढे
    - सुरेश म्हात्रे १६ हजारांनी आघाडीवर
    - नवनीत राणा ५७०० मतांनी पुढे
    - शशिकांत शिंदेंना ७९५ मतांची आघाडी
    - सुप्रिया सुळेंना ३५ हजारांचं लीड

    - महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 40,872 मतांनी आघाडीवर
    - प्रतापराव जाधव (शिंदे गट) 17,684 मतांनी पुढे आहेत.
    - काँगेस वसंत चव्हाण 13500 मतांची आघाडी
    - पाचव्या फेरीअखेर काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे हे 458 मतांनी आघाडीवर
    - काँग्रेसचे नामदेव किरसान 16835 मतांनी आघाडीवर-गडचिरोली

  • 12:21 PM • 04 Jun 2024

    kolhapur lok sabha elections 2024 : कोल्हापुरात शाहू छत्रपती महाराज किती मतांनी आघाडीवर?

    कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

    सहावी फेरी...
     
    (महाविकास आघाडी ) छत्रपती शाहू महाराज - 181754

    (महायुती )संजय मंडलिक –154716

    सहावी फेरी अखेर,  शाहू महाराज छत्रपती 38036 मताने आघाडीवर आहेत

    मावळ लोकसभा

    8 वी फेरी- 

    श्रीरंग बारणे (महायुती) - 246653

    संजोग वाघेरे (महाविकास आघाडी) - 203604  

    महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 43,049 मतांनी आघाडीवर

    परभणी

    पाचव्या फेरी आखेर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव 23 हजार 312 मतानी आघाडीवर 

    महादेव जानकर 23 हजार 312 मतानी पिछाडीवर

    संजय जाधव यांना 1 लाख 3 हजार 458 मते 

    तर महादेव जानकर याना 80 हजार 146 मते मिळाली

    मतदारसंघ- गडचिरोली-चिमूर 

    पाचवी फेरी 

    उमेदवार- अशोक नेते भाजप 103011

    उमेदवार- नामदेव किरसान- काँग्रेस - 120505
     
    नामदेव किरसान हे 17494 मतांनी आघाडीवर आहेत. 

  • 12:17 PM • 04 Jun 2024

    Akola Lok Sabha Elecitons Results 2024 Live : अकोल्यात भाजपचं टेन्शन वाढलं!

    अकोल्यात काँग्रेस आणि भाजपात काट्याची टक्कर होताना दिसत आहे. काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांनी दीड लाख मतांचा टप्पा ओलांडला आहे. काँग्रेसचे डॉ. अभय पाटील नवव्या फेरी अखेर 8962 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे अनुप धोत्रे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. वंचितचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आंबेडकर काँग्रेसपेक्षा 51 हजारांनी पिछाडीवर आहेत. 

    अभय पाटील : 157901
    अनुप धोत्रे : 148939
    प्रकाश आंबेडकर आंबेडकर : 106349

    मतदारसंघ– यवतमाळ-वाशिम

    संजय देशमुख - 2 लाख 18 हजार 466 
    राजश्री पाटील- 1 लाख 80 हजार 572 

    मतांची आघाडी – संजय देशमुख - 37 हजार 894 लीड

    भंडारा गोंदिया लोकसभा 

    सुनील मेंढे भाजपा - 120863
    प्रशांत पडोळे काँग्रेस - 116892
    सुनील मेंढे भाजपा - 3971 मतांनी पुढे

    पालघर लोकसभा

    हेमंत सावरा  (भाजप)   206665
    भारती कामडी(उबाठा)   153015
    राजेश पाटील (बविआ)   117335

    महायुती भाजपचे डॉ. हेमंत सावरा 53650 मतांनी आघाडीवर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारती कामडी पिछाडीवर. तर बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

    भिवंडी -२३ लोकसभा 

    १)कपिल पाटील :- भाजप 
     एकूण मते :-   84624

    २)सुरेश म्हात्रे बाळ्यामामा एनसीपी शरद पवार गट 
    एकूण मते :- 99979

    निलेश सांबरे:- अपक्ष 
    एकूण मते :-56652
    आघाडी  15355, सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा)

  • 12:09 PM • 04 Jun 2024

    Nanded Lok Sabha election Results 2024 live : नांदेडमध्ये भाजपचा उमेदवार पिछाडीवर

    तिसरी फेरी

    काँग्रेस वसंतराव चव्हाण - 63845
    भाजप प्रताप पाटील चिखलीकर - 56090

    काँग्रेसचे वसंतराव चव्हाण 7755 मताने पुढे
    --------------
    चौथी फेरी

    काँग्रेस वसंतराव चव्हाण - 85744

    भाजपा प्रतापराव पाटील चिखलीकर - 79060

    चौथ्या फेरी अखेर काँग्रेस 6684 ने आघाडीवर
    -----------------
    पाचवी फेरी

    काँग्रेस वसंतराव चव्हाण - 101915

    भाजप प्रताप पाटील चिखलीकर 101091

    पाचव्या फेरी अखेर काँग्रेस 824 मताने पुढे

    नांदेडमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये 'काटे की टक्कर'
     

  • 11:23 AM • 04 Jun 2024

    Maharashtra Lok Sabha Elections 2024 Live : काँग्रेसची महाराष्ट्रात उसळी, 11 जागांवर आघाडीवर

    महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू असून, काँग्रेस 11 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 11 जागांवर आघाडीवर आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना 10 जागांवर आघाडीवर असून, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना 6 जागांवर आघाडीवर आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 1 आघाडीवर आहे. सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे विशाल पाटील हे आघाडीवर आहेत. 

    Maharashtra Lok Sabha Elections Results 2024 Live
    महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४
  • 11:02 AM • 04 Jun 2024

    Maharashtra lok sabha elections 2024 Live : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची मुसंडी

    नाशिक लोकसभा मतदारसंघ 

    राजाभाऊ वाजे 168351
    हेमंत गोडसे 117472
    - सहाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे 50 हजार 879 मतांनी आघाडीवर

    धाराशिव

    तिसरी फेरी 

    ओमराजे निंबाळकर - 82120 मते
    अर्चना पाटील - 45999मते 
    -तिसऱ्या फेरी अखेर 36 हजार 121मतांची ओमराजे निंबाळकर यांची आघाडी.

    अमरावती लोकसभा

    बळवंत वानखडे 51425
    नवनीत राणा 52943
    नवनीत राणा यांना 1518 मतांनी आघाडीवर

    बळवंत वानखडे पिछाडीवर

    मतदारसंघ - हिंगोली 

    दुसरी फेरी .

    909 मतांनी नागेश पाटील आष्टीकर
    आघाडीवर.

    नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना UBT) -  35391

    बाबुराव कदम कोहळीकर (शिवसेना ) - 34482

    डॉ. बी. डी. चव्हाण (वंचित ) - 14804

  • 10:45 AM • 04 Jun 2024

    Maharashtra Lok Sabha Elections 2024 Live : भाजपचे कोणते मंत्री पिछाडीवर?

    केंद्रीय मंत्री भारती पवार - 9 हजार मतांनी पिछाडीवर

    केंद्रीय मंत्री कपिल पाटील - 3 हजार मतांनी पिछाडीवर

    केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे 771 मतांनी आघाडीवर

    केंद्रीय मंत्री पीयूष गोयल 36 हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 22 हजार मतांनी आगाडीवर आहेत. 

    केंद्रीय मंत्री नारायण राणे 5 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. 

    राज्यातील सांस्कृतिक राज्यमंत्री सुधीर मुनगंटीवार 24 हजार मतांनी पिछाडीवर 

  • 10:37 AM • 04 Jun 2024

    Maharashtra Lok Sabha Elections 2024 Live : वर्ध्यात काळेंची मुसंडी

    गडचिरोली-चिमूर 

    उमेदवार- अशोक नेते भाजप 15596
    उमेदवार- नामदेव किरसान- काँग्रेस - 18276
    2680 मतांनी नामदेव किरसान आघाडीवर आहेत. 

    वर्ध्यात रामदास तडस यांना धक्का 

    अमर काळे 10 हजार मतांनी आघाडीवर 

    सोलापूर लोकसभा

    काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना दुसऱ्या फेरीमध्ये 64 हजार 421 मते मिळाली.

    भाजप उमेदवार राम सातपुते यांना दुसऱ्या फेरीमध्ये 43 हजार 354 मते मिळाली.

    दुसऱ्या फेरीत प्रणिती शिंदे या 21 हजार 67 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 10:34 AM • 04 Jun 2024

    BJP Lok Sabha Results 2024 Live : तीन केंद्रीय मंत्री पिछाडीवर

    केंद्रीय मंत्री भारती पवार - 9 हजार मतांनी पिछाडीवर

    केंद्रीय मंत्री कपिल पाटील - 6 हजार मतांनी पिछाडीवर

    केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे 1470 मतांनी आघाडीवर

    केंद्रीय मंत्री पीयूष गोयल 38 हजार 249 मतांनी आघाडीवर आहेत. 

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 18 हजार मतांनी आगाडीवर आहेत. 

    केंद्रीय मंत्री नारायण राणे 5 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. 

  • 10:14 AM • 04 Jun 2024

    Maharashtra Lok Sabha Elections 2024 : उत्तर पूर्व मुंबईत संजय दिना पाटील आघाडीवर

    उत्तर पूर्व मुंबई लोकसभा 

    संजय दिना पाटील - ४२७६७
    मिहीर कोटेचा - ३०८५६

    - संजय दिना १५९१२ मतांनी आघाडीवर

    सोलापूर लोकसभा

    - प्रणिती शिंदे यांना पहिल्या फेरीअखेर 29522 मते मिळाली आहेत.

    - राम सातपुते यांना 24284 मते मिळाले आहेत.

    पहिल्या फेरीत प्रणिती शिंदे या 5238 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 10:07 AM • 04 Jun 2024

    Bhiwandi lok Sabha Resutls 2024 : भाजपचे कपिल पाटील आघाडीवर

    भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आघाडी घेतली आहे. 

    महविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा ऊर्फ सुरेश म्हात्रे पिछाडीवर आहेत.

    6850 मतांनी पाटील हे आघाडीवर आहेत.


    कपिल पाटील - 26189

    बाळ्या मामा - 19339

    निलेश सांबरे - 15837

    जालन्यात दानवे आघाडीवर

    रावसाहेब दानवे, भाजपा- 19582 मते 

    कल्याण काळे, कॉंग्रेस - 17115 मते 

    मंगेश साबळे, अपक्ष.. 5600 मते

    रावसाहेब दानवे 2427 मतांनी आघाडीवर आहेत.

     कल्याण काळे 2427 मतांनी पिछाडीवर आहेत.

    नंदुरबार लोकसभा मतदारसंघ 

    चौथ्या फेरीअंती  

    कॉग्रेस उमेदवार - गोवाल पाडवी 64,000 मतांनी आघाडीवर. 

    भाजपाच्या हिना गावित पिछाडीवर पडल्या आहेत.

  • 09:58 AM • 04 Jun 2024

    शिंदेंची शिवसेना 10, तर ठाकरेंची शिवसेना 7 जागांवर आघाडीवर

    केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात महायुतीने 22 जागांवर (भाजप 12, शिवसेना 10 जागा) आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस 8, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 7 जागांवर, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर आहे. तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएम आघाडीवर असून, सांगलीतून विशाल पाटील हे आघाडीवर आहेत.

  • 09:51 AM • 04 Jun 2024

    Amravati Lok Sabha Results अमरावतीत काँग्रेसची मुसंडी

    - अमरावती लोकसभेच्या पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आघाडीवर.

    - तिवसा, बडनेरा, अमरावती, मेळघाटमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आघाडीवर, तर नवनीत राणा पिछाडीवर आहेत. 

    आमदार रवि राणा यांच्या मतदारसंघातच नवनीत राणा या पिछाडीवर पडल्या. 

    - बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदारसंघात मात्र नवनीत राणांना आघाडी मिळाली आहे. 

follow whatsapp

ADVERTISEMENT