Lok Sabha Election 2024 Live : अजितदादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे -जयंत पाटील
Maharashtra Breaking news : लोकसभा निवडणुकीचे अपडेट्स आणि महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घटनांबद्दलची माहिती वाचा एकाच ठिकाणी...
ADVERTISEMENT
Lok Sabha elections 2024 Maharashtra updates : महाराष्ट्रासह देशभरातील लोकसभा निवडणुकीचे ताजे अपडेट्स आणि इतर ब्रेकिंग घटनांची माहिती जाणून घेण्याासाठी वाचत रहा मुंबई Tak live ब्लॉग...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 05:10 PM • 29 Mar 2024
Lok Sabha election 2024 : अजितदादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे -जयंत पाटील
शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना लक्ष्य केले. सुनील तटकरे हे अजित पवारांची दुसरी बायको आहेत, असे जयंत पाटील म्हणालेत.
"बाळाराम पाटील यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा राष्ट्रवादीचा एकमेव माणूस भुसार आहे. सर्वांनी फसवलं. आमची एवढी मतं नव्हती. आमची 5 हजारच मतं होती. आम्ही 11 हजारांपर्यंत गेलो, कारण बाळाराम पाटलांनी चांगलं काम केलं", असे जयंत पाटील म्हणाले.
"प्रत्येक शाळेमध्ये गेले आणि काम केलं. बंधूंनी पुन्हा फसवलं. मी बाळाराम साहेबांना बोललो की, उभं राहू नका. विधानसभेला उभं रहा; पण ऐकलं नाही. त्यांचा विश्वास. नुसती तुमची चार संस्थांची कामे मिळाली असती. स्वामी गेली, रयत गेली, दादा म्हणजे का? अजितदादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे. ही जी परिस्थिती आहे ती आम्ही कधी विसरणार नाही", अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
- 04:13 PM • 29 Mar 2024
Baramati Lok Sabha Elections 2024 : अजित पवारांविरोधात विजय शिवतारेंचा सूर नरमला
शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांचा अजित पवारांविरोधातील सूर नरमल्याचे दिसत आहे. बारामतीतून निवडणूक लढवणारच, असे म्हणणारे शिवतारे आता चर्चा करून ठरवू असे म्हटले आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना शिवतारे म्हणाले, "परवा रात्री अडीच तास चर्चा झाली. मतदारसंघातील लोकांच्या भावना काय आहेत, ते मी मांडलं. लोकांमधून मी तो निर्णय घेतला होता. तसाच उद्या सासवड येथील निवासस्थानी ११ ते १ वाजेपर्यंत बैठक चालेल. त्यांचं म्हणणं ऐकून घेतले जाईल."
"बैठकीतील चर्चेबद्दल त्यांना माहिती दिली जाईल. त्यांना विश्वासात घेऊन नक्की काय करायचं, हे ठरवलं जाईल. उद्या (३० मार्च) एक ते दीड वाजता सासवडला पत्रकार परिषद होईल", अशी माहिती शिवतारे यांनी दिली.
माघार घेतली नाही, असं समजायचं का? त्यावर शिवतारे म्हणाले, "माघार हा शब्द वेगळा आहे. राजकारणात सर्व कामे विचारपूर्वक करायची असतात. शेवटी आम्ही कशासाठी लढत असतो, तर जनतेचे प्रश्न घेऊन लढत असतो. त्याबाबतीतील काय चर्चा झाली, ती लोकांना सांगून मग लोकांचा काय मूड आहे. तसेच कार्यकर्त्यांचा काय मूड आहे. ते पाहून त्यानंतर निर्णय घेईन आणि परत मुंबईला येईन."
"मी कार्यकर्त्यांसोबत बैठक झाल्यानंतर मी पत्रकार परिषद घेईन. राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रू नसतो. व्यापक हित, लोकहित कशामध्ये आहे, त्याचा नीट विचार करून, सगळ्यांचे म्हणणे ऐकून निर्णय सांगेन", असे शिवतारे म्हणाले.
- 02:29 PM • 29 Mar 2024
'साताऱ्यातून महाविकास आघाडीचाच उमेदवार लढणार', शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं!
'साताऱ्याचा उमेदवार एक ते दोन दिवसांमध्ये जाहीर करू. श्रीनिवास पाटलांनी निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा होती. वैद्यकीय कारणांमुळे श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार नाहीत. साताऱ्यातून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांचं नाव चर्चेत आहे. सुनील माने, सत्यजित यांचंही नाव चर्चेतून पुढं आलं आहे. चर्चा करून आम्ही उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेऊ. लोकसभेसाठी मविआचा किमान समान कार्यक्रम असावा. ' असं शरद पवार पत्रकार परिषदेत स्पष्ट म्हणाले आहेत.
- 02:06 PM • 29 Mar 2024
'खिचडी चोर अजूनही फरार', संजय निरूपम यांचं MVA वर टीकास्त्र!
शिवसेनेकडून (UBT) उत्तर-पश्चिम मतदार संघातून अमोल कीर्तिकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरूम नाराज आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसला मुंबईत मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. कारण संजय निरूपम बंडाच्या भूमिकेत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. संजय निरुपम यांनी आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्यांनी 'ईडीचे दुसरे समन्स! खिचडी चोर अजूनही फरार... असा आहे #MVA चा उमेदवार आहे. विनम्र प्रश्न, तुरुंगातून करणार का प्रचार?' असं ट्वीट करत महाविकास आघाडीवर टीका केली.
- 12:52 PM • 29 Mar 2024
नवनीत राणांविरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बूब अमरावती लोकसभा लढवणार!
आताची महत्तवाची माहिती म्हणजे प्रहार पक्षाकडून दिनेश बूब अमरावती लोकसभा लढवणार आहेत. ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब दुपारी १ वाजता प्रहार पक्षात प्रवेश करणार आहे. नवनीत राणांविरोधात प्रहारकडून ते निवडणूक लढवतील.
- 12:14 PM • 29 Mar 2024
Lok Sabha Election 2024 Live : संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी
संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी झाली आहे. एकमेकांनी उमेदवारांची नावं घेण्यावरून बैठकीत हा वाद झाला आहे. माहितीनुसार, बैठकीत चंद्रकांत खैरेंचं नाव घेतल्याने हा वाद पेटला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याकरता ही बैठक आयोजित केली होती.
- 10:54 AM • 29 Mar 2024
Sanjay Raut : 'वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला', आंबेडकरांना राऊतांचे उत्तर
खासदार संजय राऊत यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. एक पोस्ट करत आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीत संजय राऊतांनी खंजीर खुपसल्याचा आरोप केला.
या आरोपाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "जे संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत, त्यांच्याविरोधात आमची लढाई आहे. प्रकाशजी जे म्हणत आहेत, त्याच्याशी माझा संबंध नाहीये. आम्ही सोबत बसलो आहोत. चर्चा केली आहे. आम्ही ५ जागांचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे. आता ते त्यांच्यावर अवलंबून आहे."
"कालपर्यंत नाना पटोलेंवर आरोप करत होते. आता मी काय बोलू शकतो? मला पूर्ण विश्वास आहे की, जे संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत, त्यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर राहणार नाही, प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष", असे म्हणत राऊतांनी आंबेडकरांना उत्तर दिले.
- 10:40 AM • 29 Mar 2024
Lok Sabha Elections 2024 : सुजय विखेंविरोधात निलेश लंकेंच फुंकणार 'तुतारी'?
दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निलेश लंकेनाच उतरवणार असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. एकीकडे सुजय विखे हे प्रचारात व्यस्त झाले असून, निलेश लंकेंही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांसोबत कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहे.
निलेश लंकेंनी शरद पवारांच्या बाजूने असलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत इफ्तार पार्टीला हजेरी लावली. लंके सध्या मतदारांपर्यंत पोहोचत असून, काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनीही लंके उमेदवार असतील, असे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे नगरमध्ये विखे विरुद्ध लंके लढत बघायला मिळेल.
- 10:04 AM • 29 Mar 2024
Lok Sabha Elections 2024 : वसंत मोरे घेणार प्रकाश आंबेडकर यांची भेट
वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकर यांची आज (29 मार्च) दुपारी राजगृहावर भेट घेणार आहेत. वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत. वसंत मोरे यांनी आधी महाविकास आघाडीचे नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या.
मात्र, महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांना देण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत वसंत मोरे उमेदवारी संदर्भात चर्चा करू शकतात. वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत आठ उमेदवार हे जाहीर केले आहेत.
- 09:38 AM • 29 Mar 2024
Sharad Pawar News : सातारा, माढाचा उमेदवार ठरणार?
महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेने (युबीटी) काही उमेदवार जाहीर केले आहेत. पण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे सोडल्यास कुठल्याही उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही.
त्यात आज शरद पवार हे सातारा दौऱ्यावर असून, या दौऱ्यामध्ये सातारा लोकसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा निर्णय होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. दोन्ही मतदारसंघांचा आढावा घेऊन शरद पवार निर्णय घेण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT