Sanjay Shirsat : 'ठाकरेंचे अनेक आमदार शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर...', शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sanjay shirsat big revealation majour incoming in eknath shinde shiv sena 6 june 2024 udhav thackeray
येत्या 6 जूननंतर आमची इनकमिग सुरु होणार आहे.
social share
google news

Sanjay Shirsat big revealation:'येत्या 6 जूननंतर शिंदे गटात इनकमिंग सुरु होणार आहे. अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. आमचं त्याचं नेहमी बोलणही होते.पण योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची शिंदे साहेबांची स्ट्रेटेजी आहे. त्यानुसार ते निर्णय घेतील, असा मोठा गौप्यस्फोट शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे.  (sanjay shirsat big revealation majour incoming in eknath shinde shiv sena 6 june 2024 udhav thackeray) 

ADVERTISEMENT

संजय शिरसाट यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला. 'आमच्याकडे इनकमिंग वाढणार आहे. येत्या 6 जूननंतर आमची इनकमिग सुरु होणार आहे. त्यासाठी अनेक नेते मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात आहेत. आमचं त्याचं नेहमी बोलणही होते.पण योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची शिंदे साहेबांची ही स्ट्रेटेजी आहे. त्याचवेळी ते निर्णय़ घेतील, असे संजय शिरसाट यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : "गडकरींच्या पराभवासाठी मोदी,शाह, फडणवीसांनी प्रयत्न केले, पण..."

संजय शिरसाट यांनी शरद पवारांवर देखील टीका केली. अनेक लोक शरद पवारांच्या गटाला कंटाळलेले आहेत. त्याच्यामध्ये चाललेली हुकूमशाही, मी पणा आणि अहम भाव आहेत. आता त्याला लोक कटाळलेले आहेत. त्याच्यातले अनेक आमदार कंटाळले असून ते अजित पवारांच्या संपर्कात असतात,असा शिरसाट यांनी दावा केला आहे. 

हे वाचलं का?

ठाकरेंनी आमदार सांभाळावे

आता आम्ही फुटू की राहू त्याची चिंता करू नका.तुमच्याकडे जे राहिले आहेत ना, त्यांना संभाळा. आता यांच्यातले सगळेच निघून येतील आणि हेच लंडनमध्ये शिफ्ट होतील, असा चिमटा देखील संजय शिरसाट आणि उद्धव ठाकरेंना काढला आहे. 

हे ही वाचा : Akola : सावकाराकडून ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा...; व्हायरल व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT