Lok Sabha Election 2024 : राम सातपुतेंचं नेमकं गाव कोणतं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

solapur lok sabha elction 2024 ram satpute vs praniti shinde letter war maharashtra politics
सोलापूर लोकसभेतून भाजपने राम सातपूते यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
social share
google news

Ram Satpute vs Praniti Shinde letter war : सोलापूर लोकसभेतून भाजपने राम सातपूते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारी जाहीर होण्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरची लेक म्हणून राम सातपूते यांचे सोलापूरात स्वागत केले होते. एकूणच प्रणिती शिंदे यांनी राम सातपूते यांना आयात उमेदवार असण्याचा दावा केला होता. त्यामुळे नेमकं राम सातपुतेंचं गावं कोणतं आहे? याची चर्चा सूरू झाली आहे. त्यामुळे सातपुते नेमक्या कोणत्या गावचे आहेत. हे जाणून घेऊयात. (solapur lok sabha elction 2024 ram satpute vs praniti shinde letter war maharashtra politics) 

ADVERTISEMENT

प्रणिती शिंदे यांनी राम सातपूते हे बाहेरचे उमेदवार असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मी सोलापूरची लेक असून तुमचे सोलापूरात स्वागत करते, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या आहे. त्यामुळे नेमके राम सातपुते कोणत्या गावचे आहेत? याची चर्चा सुरु झाली आहे. 

हे ही वाचा : Sharmila Pawar : ''मुखातून श्रीराम म्हणतोय, घरात महाभारत चाललंय''

राम सातपुते हे मूळचे बीड जिल्हयातील आष्टी तालुक्तातील डोईठाण या गावचे आहेत. त्यामुळे सातपुते हे मुळचे बीड असल्यानेच प्रणिती शिंदे यांनी हा मुद्दा बाहेर काढत त्यांना डिवचलं आहे. मात्र सातपूते जरी बाहेरचे उमेदवार असले तरी मागच्या पाच वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. 

हे वाचलं का?

प्रणिती शिंदेंवर पलटवार 

आमदार प्रणिती शिंदे यांनी माझे स्वागत केले त्याबद्दल त्यांनी मी धन्यवाद करतो आणि त्यांना देखील शुभेच्छा देतो.माझी राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नाही. मी एका ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातून आलेलो आहे,असे म्हणत प्रणिती शिंदे यांना राजकीय वारसा आहे आणि मी एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न राम सातपुते यांनी केला आहे. 

हे ही वाचा : 'या' उमेदवारांकडे उरले फक्त 24 दिवस... नेमकं काय होणार?

दरम्यान राम सातपुते यांनी पलटवार केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते सोशल मीडियावर अॅक्टीव्ह झाले आहेत. चला लागा कामाला,बीडचे पार्सल, बीडला परत पाठवा, अशा आशयाचे पोस्ट सध्या व्हायरल होतं आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT