Fact Check : ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्त्यांनी सभेत बोलूच दिलं नाही? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
Uddhav Thackeray Viral Video : काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाकरेंना (Uddhav Thackeray) भाषण करण्यापासून रोखल्याचे बोलले जात आहे. ठाकरेंना 5 मिनिटे देखील भाषण करू दिले नसल्याचा दावा,या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे खरंच असा प्रसंग घडलाय काय? याची पडताळणी करण्यासाठी इंडिया टूडेने याचे फॅक्टचेक केले आहे.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray Viral Video : शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाकरेंना (Uddhav Thackeray) भाषण करण्यापासून रोखल्याचे बोलले जात आहे. ठाकरेंना 5 मिनिटे देखील भाषण करू दिले नसल्याचा दावा,या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे खरंच असा प्रसंग घडलाय काय? याची पडताळणी करण्यासाठी इंडिया टूडेने याचे फॅक्टचेक केले आहे. या फॅक्टचेकमध्ये काय सत्य समोर आले आहे? हे जाणून घेऊयात. (udhhav thackeray viral video congress worker obstruct wardha rally india today fact check)
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर समीत ठक्कर नावाच्या एक्स हँडलवरून ठाकरेंचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये वर्ध्यातील सभेत ठाकरेंना 5 मिनिटे देखील भाषण करू दिले नसल्याचा दावा व्हिड़िओमध्ये करण्यात आला आहे.एक वेळ अशी होती जेव्हा बाळासाहेब ठाकरे भाषणाला उभे राहिले की अन्य कुणालाही मध्यस्थी करायची हिंमत व्हायची नाही. पण आता काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याने उद्धव ठाकरेंवर ही वेळ आल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हणण्यात आलं आहे.
हे ही वाचा: शिंदे-पवार सोबत तरीही महाराष्ट्रात BJP ला मोदी का हवे?
इंडिया टुडेने या व्हिडिओची पडताळणी केली असता, फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडिओ एडीट केल्याचे आढळून आले आहे.कारण वर्ध्याच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ कमी असल्याने त्यांनी छोटेसेच भाषण करणार असल्याचे सांगितले होते. मात्र कार्यकर्ते त्यांना जास्त वेळ बोलण्याची विनंती करत होते.
हे वाचलं का?
गेल्या 22 एप्रिलला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि वर्ध्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ठाकरेंसोबत शरद पवार, अमर काळे आणि इतर स्थानिक नेत्यांची भाषणे झाली.
मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर या सभेचा व्हिडिओ इंडिया टूडेने तपासला असता, 50 मिनिटाच्या या व्हिडिओत अमर काळे मंचावर बोलत असताना एका व्यक्तीने नेत्याजवळ जाऊन त्याला अडवले. यानंतर काळे व्यासपीठावरून दूर गेले आणि उद्धव ठाकरे यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले. ठाकरे माईकजवळ पोहोचताच पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्याशी बोलताना दिसले. ठाकरे “पाच मिनिटे” असे म्हणताना ऐकू येत होते, तर इतर नेते “नाही, 15 मिनिटे” असे बोलताना दिसत होते. यानंतर ठाकरे यांनी कोणतेही व्यत्यय न घेता 10 मिनिटांचे भाषण केले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा: ''त्यांची लायकी नाही, मी यादी दिली तर फिरणं मुश्कील होईल'
दरम्यान इंडिया टुडेने या सभेचे आयोजन करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अतुल वांडीले यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचे म्हणत संपूर्ण प्रसंग सांगितला आहे. वाडिले म्हणाले की, “आमच्या काही नेत्यांची भाषणे वाढली आणि उद्धव ठाकरेंना नागपुरला जायचे होते. मला नागपूरच्या कार्यक्रमांसाठी लवकर जायचे आहे, त्यामुळे मी फक्त 5 मिनिटे बोलेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तेव्हा आम्ही त्यांना विनंती केली की, तुम्हाला ऐकण्यासाठी इथे खूप लोक आले आहेत, त्यामुळे 5 मिनिटे बोलू नका; 10 ते 15 मिनिटे किंवा शक्य तितक्या वेळ बोला,असे कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितले होते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाकरेंना भाषण करण्यापासून अडवल्याचा दावा पुर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT