Lok Sabha Election 2024: शिंदे-पवार सोबत तरीही मोदी का हवे? 2019 मध्ये महाराष्ट्रात फक्त 9, आता 20 सभा..

मुंबई तक

ADVERTISEMENT

शिंदे-पवार सोबत तरीही मोदी का हवे?
शिंदे-पवार सोबत तरीही मोदी का हवे?
social share
google news

PM Modi Maharashtra public meetings: मुंबई: 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सलग दुसऱ्यांदा देशात अभूतपूर्व विजय मिळवला होता. 2014 प्रमाणेच 2019 मध्येही महाराष्ट्राने भाजपच्या पारड्यात भरभरून दान टाकलं होतं. पण 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी महाराष्ट्रात मोठं आव्हान आहे. त्यासाठी स्वत: पंतप्रधान मोदी हे मैदानात उतरले आहेत. (lok sabha election 2024 why does bjp need pm modi to campaign in maharashtra despite shinde pawar in the 2019 lok sabha elections only 9 now 20 public meetings had to be held in maharashtra)

2019 लोकसभा निवडणुवेळी महाराष्ट्रात भाजपसोबत शिवसेना-उद्धव ठाकरे हे सोबत होते. तसंच राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने तेव्हा महाराष्ट्र हा अनुकूल होता. म्हणून पंतप्रधान मोदींनी येथे केवळ 9 प्रचार सभा घेतल्या होत्या.

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 11 एप्रिलला 7 मतदारसंघात, 18 एप्रिलला 10 मतदारसंघात, 23 एप्रिलला 14 मतदारसंघात तर 29 एप्रिलला 17 मतदारसंघात मतदान होईल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आता आपण हे पाहूयात की 2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी कोणती सभा कुठे घेतली होती. 

 • 1 एप्रिल 2019 - वर्धा 
 • 3 एप्रिल 2019 - गोंदिया
 • 6 एप्रिल 2019 - नांदेड
 • 9 एप्रिल 2019 - लातूर
 • 12 एप्रिल 2019 - अहमदनगर 
 • 22 एप्रिल - नाशिक, दिंडोरी, नंदूरबार
 • 26 एप्रिल - मुंबई

पण आता म्हणजे 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपसाठी परिस्थिती फारशी चांगली नसल्याचं भाजपच्या अंतर्गत वर्तुळात बोललं जात आहे. त्यामुळेच आता स्वत: पंतप्रधान मोदींनी मिशन महाराष्ट्र हाती घेतलं आहे.

हे ही वाचा>> ''त्यांची लायकी नाही, मी यादी दिली तर फिरणं मुश्कील होईल'

2019 साली केवळ 9 सभा घेणाऱ्या पंतप्रधान मोदींना यंदा 20 हून अधिक सभा घ्यावा लागणार आहेत. ज्यापैकी 12 सभा पारही पडल्या आहेत. तर महाराष्ट्रातील उर्वरित 7 ते 8 सभा ते लवकरच घेणार आहेत. 

ADVERTISEMENT

आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी कुठे-कुठे सभा घेतल्या ते आता आपण पाहूया.. 

 • 8 एप्रिल – चंद्रपूर
 • 10 एप्रिल - रामटेक 
 • 19 एप्रिल - वर्धा 
 • 20 एप्रिल - नांदेड, परभणी,
 • 27 एप्रिल- कोल्हापूर

 
29 एप्रिल - कराड, सोलापूर, पुणे 

ADVERTISEMENT

(पुण्यातील उमेदवार  मुरलीधर मोहोळ, मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे, शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार पंतप्रधान मोदींनी यावेळी केला. करणार आहेत. या 4 पैकी मावळची जागा सध्या महायुतीच्या ताब्यात आहे, तर पुण्याची जागा रिक्त आहे. शिरुर आणि बारामतीची जागा शरद पवार गटाच्या ताब्यात आहे)

हे ही वाचा>> "उज्ज्वल निकम यांना लोकसभेत नव्हे जेलमध्ये पाठवायला हवं"

30 एप्रिल - माळशिरस, धाराशिव, लातूर 

(माळशिरसमध्ये मोदी माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला. तसेच धाराशिवमध्ये अर्चना पाटील आणि लातूरमधील भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा प्रचार केला.)

6 मे - बीड

(बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी मोदी मैदानात उतरणार आहेत.) 

10 मे - कल्याण, अहमदनगर, दिंडोरी 

(10 मे रोजी कल्याणसह नगर आणि दिंडोरीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधानांच्या सभा होणार आहेत.)

दरम्यान, यानंतरही पंतप्रधान मोदी हे एकूण चार ते पाच सभा घेणार आहेत. त्यापैकी एक सभा ही निश्चितच मुंबईत होणार आहे. पण त्याशिवाय इतर तीन सभांच्या तारखा आणि ठिकाण अद्याप निश्चित झालेलं नाही. 

पण या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, 2019 च्या तुलनेत 2024 ची महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक नक्कीच भाजपसाठी सोपी नाही.

 

  follow whatsapp

  ADVERTISEMENT