Amethi Lok Sabha : "स्मृती इराणी पराभूत होऊ शकतात", कोणता 'फॅक्टर' गेमचेंजर?
Amethi Lok Sabha prediction : 2019 मध्ये स्मृती इराणी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधींचा पराभव केला होता. यावेळी त्यांच्या विरोधात के.एल. शर्मा निवडणूक लढवत आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अमेठी लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
स्मृती इराणी जिंकणार का? योगेंद्र यादवांचा अंदाज काय?
काँग्रेसचे के.एल. शर्मा इराणींविरोधात मैदानात
Amethi Lok Sabha 2024 Prediction : अमेठी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने गांधी घराण्याशी निष्ठावंत असलेल्या के.एल. शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
ADVERTISEMENT
Yogendra Yadav on Amethi Lok Sabha Election : 2019 मध्ये राहुल गांधींचा पराभव करून लोकसभेत पोहोचलेल्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणींचं या निवडणुकीत काय होणार? याची सगळीकडे चर्चा होत आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघातून गांधी कुटुंबातीलच व्यक्ती असेल, असे म्हटले जात होते. पण, प्रियांका गांधी यांनी माघार घेतली आणि रायबरेलीतून राहुल गांधी मैदानात उतरले. त्यामुळे अमेठीतून काँग्रेसने गांधी घराण्याचे निष्ठावंत असलेल्या के.एल. शर्मा यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघाचा निकाल काय लागू शकतो, याबद्दल राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. (Yogendra Yadav has predicted that I will not be surprised if Smriti Irani loses in Amethi Lok Sabha constituency)
योगेंद्र यादव यांनी 'न्यूज Tak'ला दिलेल्या मुलाखतीत लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल काय असतील, याबद्दल भाष्य केले.
अमेठी आणि रायबरेलीमध्ये कोण आघाडीवर?
या प्रश्नाला उत्तर देताना योगेंद्र यादव म्हणाले की, "व्यक्ती आणि प्रत्येक जागेबद्दल रस नाहीये. मी त्यात तज्ज्ञही नाही. जागांचे गणित समजून घेण्याबद्दल स्थानिक राजकारणाबद्दल जशी तुमची पकड असावी लागते, तशी माझी नाही. पण, मी दोन्ही मतदारसंघामध्ये गेलो होतो... अमेठी आणि रायबरेली", असे स्पष्ट करत यादव यांनी अंदाज मांडला.
हे वाचलं का?
रायबरेली लोकसभा... योगेंद्र यादवाचा अंदाज काय?
"रायबरेलीमध्ये गांधी कुटुंबातील कोणताही व्यक्ती तिथे उभा राहिला तरी... मागच्या वेळी सोनिया गांधी कदाचित १ लाख ६० हजारांनी जिंकल्या होत्या. यावेळी मला वाटतं की, २ लाखापेक्षा जास्त मतांनी विजय होईल. त्यात जास्त विचार करण्यासारखे नाही. त्याचं एक कारण आहे. तिथे गांधी कुटुंबाची एक व्होटबँक आहे. त्यांच्या नावाने", असे यादव म्हणाले.
हेही वाचा >> निकालाआधी नेत्यांची धडधड वाढणार, एक्झिट पोल कुठे आणि कधी पाहता येणार?
"गांधी कुटुंबाने रायबरेलीत रेल्वे बोगी फॅक्टरी सुरू केली. एम्स आणले आणि खूप सारे लोक थेट लाभार्थी आहेत. त्यांच्याजवळ (काँग्रेस) त्यांची एक व्होटबँक आहे. आता राहुल गांधी तिथून लढताहेत, तर जाहीर आहे की, ती वाढेल. त्यात विचार करण्यासारखे नाही", असा अंदाज त्यांनी मांडला.
ADVERTISEMENT
अमेठी लोकसभा : स्मृती इराणींचे काय होणार?
यादव म्हणाले की, "जेव्हा मी अमेठीमध्ये फिरलो, तोपर्यंत निश्चित झालेले नव्हते की उमेदवार कोण असणार? एक गोष्ट स्पष्ट होती की, स्मृती इराणींच्या कामाबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये असंतोष होता. आणि स्मृती इराणींबद्दल भाजपच्या नेत्यांमध्ये खूप राग होता. भाजपचे नेते बसून रणनीती बनवत होते की, त्यांना कसे पराभूत करता येईल. त्यामुळे या फॅक्टरला विसरूता कामा नये", असे यादव यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> महाराष्ट्रात महायुतीला मोठा झटका, MVA ला किती जागा येणार?
"तिसरा मुद्दा म्हणजे उत्तर प्रदेशात जो एक विरोधी प्रवाह आहे, ज्यामुळे ५ ते ७ टक्क्यांचे नुकसान होऊ शकते. त्याचा परिणाम अमेठी लोकसभा मतदारसंघातही होऊ शकतो. के.एल. शर्मा हे दिल्लीतील माध्यमांच्या दृष्टिकोणातून बलाढ्य उमेदवार वाटत असले, तरी अमेठीमध्ये त्यांना कुणीही हलका उमेदवार मानत नाहीत. कारण २०-३० वर्षांपासून पूर्ण काम त्यांनी केलेले आहे", असा मुद्दा त्यांनी सांगितला.
हेही वाचा >> मुनगंटीवारांचं वाढलं टेन्शन, धानोरकर देणार जबर झटका?
"ते असे एक व्यक्ती आहेत, ज्यांना अमेठीतील प्रत्येक गाव माहीत आहे. प्रत्येक गावातील व्यक्ती त्यांना ओळखतो. त्यामुळे स्मृती इराणी यांचा पराभव झाला, तर मला आश्चर्य वाटणार नाही. यात एक गोष्ट महत्त्वाची आहे की, अंडर करंट कुणाच्या बाजूने आहे. मला जसं दिसलं की, उत्तर प्रदेशात थोडा अंडर करंट विरोधात आहे, तर तसं झालं, स्मृती इराणी पराभूत होऊ शकतात", असा अंदाज त्यांनी मांडला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT