Eknath Shinde : शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपकडून अन्याय; खदखद आली चव्हाट्यावर
PM Narendra Modi Cabinet : ''शिवसेना एनडीएचा जूना साथिदार आहे. या नात्याने शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री एक राज्यमंत्री पद मिळावं ही अपेक्षा होती. शिंदे साहेबांना न्यायिक भूमिका केंद्रीय मंत्रिमंडळात मिळेल अशी अपेक्षा होती. पण या सगळ्या घडामोडीमध्ये इतर पक्षाला एक न्याय आणि शिवसेनेला एक न्याय दिल्याची नाराजी श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
PM Narendra Modi Cabinet : ''शिवसेना एनडीएचा जूना साथिदार आहे. या नात्याने शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री एक राज्यमंत्री पद मिळावं ही अपेक्षा होती. शिंदे साहेबांना न्यायिक भूमिका केंद्रीय मंत्रिमंडळात मिळेल अशी अपेक्षा होती. पण या सगळ्या घडामोडीमध्ये इतर पक्षाला एक न्याय आणि शिवसेनेला एक न्याय दिल्याची नाराजी श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली.
Shinde Mp Reaction on Modi Cabinet : नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानप्रदाची शपथ घेतली. यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचा शपथविधी पार पडला. या मंत्रिमंडळात शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. खरं तर शिंदेंच्या शिवेसेनेला कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा होती, मात्र राज्यमंत्री पदावरून त्यांची बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी सूरू असून आता खदखद व्यक्त केली जात आहे. eknath shinde mp shrirang barne reaction on pm narendra modi cabinet prataprao jadhav union minister modi cabinet ministry
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
''चंद्राबाबू नायडू यांचे 16 खासदार निवडून आले. नितीश कुमारांचे 12 खासदार निवडून आले. त्या खालोखाल शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले. चिराग पासवान यांचे 5 खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. कुमारस्वामींचे दोन खासदार निवडून आले त्यांना एक कॅबिनेट मंत्रीपद दिलं. त्याचबरोबर बिहारमधून जितेन मांझी स्वता: एकटे निवडून आले त्यांना कॅबिनेट देण्यात आलं. त्यामुळे इतर पक्षाला एक न्याय आणि शिवसेनेला एक न्याय देण्यात आल्याची'' खदखद शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : एकही खासदार नसताना मोदी मंत्रिमंडळात आठवलेंची सीट का असते फिक्स?
''शिवसेना एनडीएचा जूना साथिदार आहे. या नात्याने शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री एक राज्यमंत्री पद मिळावं ही अपेक्षा होती. निदान एक राज्यमंत्रीपद जर दिलेलं आहे. आणि 35 स्थानिय आम्हाला शपथविधी घ्यावा लागला. तर कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ आमच्या खासदाराने घेतली असती तर आम्हाला समाधान वाटले असते. शिंदे साहेबांना न्यायिक भूमिका केंद्रीय मंत्रिमंडळात मिळेल अशी अपेक्षा होती. पण या सगळ्या घडामोडीमध्ये इतर पक्षाला एक न्याय आणि शिवसेनेला एक न्याय दिल्याची नाराजी श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली.
हे वाचलं का?
हे ही वाचा : PM Modi new cabinet minister list 2024 : असे आहे मोदींचे मंत्रिमंडळ, वाचा संपूर्ण यादी
शिवसेनेला राज्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे कुठेतरी मला तरी व्यक्तीशा वाटत की शिवसेनेच्या बाबतीत दुजाभाव झाला. भाजपकडून शिवसेनेला न्यायिक भूमिका दिली पाहिजे होती. कारण तीन महिन्यात विधानसभा निवडणूका येतात. विधानसभेला एकत्रपणे सामोरे जात असताना, या सगळ्या गोष्टीचा विचार करून भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षाला न्यायिक भूमिका देण्याची आवश्यकता होती. कारण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेने राज्यात मोठी भूमिका घेत सत्तापरिवर्तन भाजपला घडवून दाखवलं, असे बारंगे यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT