VIDEO: NDA च्या बैठकीनंतर मोदी महाराष्ट्रातील नेत्यांना कसे भेटले?
Narendra Modi Meet NDA leaders: एनडीएच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक नेत्यांना भेटले पण त्यावेळी त्यांची नेमकी देहबोली कशी होती याची आता चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
Narendra Modi Meet NDA leaders: एनडीएच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक नेत्यांना भेटले पण त्यावेळी त्यांची नेमकी देहबोली कशी होती याची आता चर्चा सुरू झाली आहे.
Modi and Fadnavis: नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर आज (7 जून) राजधानी दिल्लीत संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्रातील एनडीएमधील सर्व पक्षांचे महत्त्वाचे नेते हे तिथे हजर होते. (lok sabha election 2024 bjp lost its majority now how did narendra modi meet devendra fadnavis and leaders of nda in maharashtra)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
पंतप्रधान पदासाठी एनडीएकडून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा यावेळी करण्यात आली. ज्यानंतर येथे उपस्थित असणाऱ्या नेत्यांनी मोदींची भेट घेतली. त्यावेळी नरेंद्र मोदींची देहबोली बरंच काही संकेत देत होती.
आतापर्यंत दोनदा भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली होती. पण यंदा त्यांना सत्तास्थापनेसाठी एनडीएमधील मित्रपक्षांवर पूर्णपणे अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे या नेत्यांकडे मोदींनी विशेष लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं.
हे वाचलं का?
फडणवीस भेटायला गेले तेव्हा मोदींनी नेमकं काय केलं?
पण दुसरीकडे नरेंद्र मोदी हे देवेंद्र फडणवीसांशी फारसे संवाद साधताना दिसले नाही. एकीकडे सर्व नेते भेटत असताना मोदी हे सर्वांशी काहीसा संवाद करताना दिसत होते.. पण जेव्हा देवेंद्र फडणवीस मोदींचं अभिनंदन करायला गेले तेव्हा मोदींनी त्यांच्याशी केवळ हस्तांदोलन केलं. त्यानंतर फडणवीस हे पुढे निघून गेले. दरम्यान, आता सध्या याच व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
बैठकीनंतर सभागृहात जेव्हा एनडीएमधील नेत्यांनी मोदींची भेट घेतली. यावेळी मोदी कोणाला कसे भेटले ते तुम्हीच पाहा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT