अभिनेते शरद पोंक्षेंचं पहिलं पुस्तक लवकरच होणार प्रकाशित
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांमधील एक नाव म्हणजे शरद पोंक्षे. आपले विचार अगदी परखडपणे मांडणाऱ्या शरद पोंक्षे यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. शरद पोंक्षे यांचं हे पहिलं पुस्तक लवकरच लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहे. ‘मी आणि नथुराम’ असं या पुस्तकाचं नाव आहे. शरद पोंक्षे यांचं मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक फार गाजलं होतं. हे नाटक […]
ADVERTISEMENT

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांमधील एक नाव म्हणजे शरद पोंक्षे. आपले विचार अगदी परखडपणे मांडणाऱ्या शरद पोंक्षे यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. शरद पोंक्षे यांचं हे पहिलं पुस्तक लवकरच लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहे. ‘मी आणि नथुराम’ असं या पुस्तकाचं नाव आहे.
शरद पोंक्षे यांचं मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक फार गाजलं होतं. हे नाटक करताना त्यांना आलेले विविध अनुभव शरद या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आणणार आहेत. 13 एप्रिल रोजी हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.
याविषयी माहिती देताना शरद पोंक्षे म्हणाले, “1998 साली नथुराम गोडसे यांची भूमिका मला करायला मिळाली. तब्बल 20 वर्ष मी हे नाटकं केलं. या नाटकाने माझं संपूर्ण आयुष्य ढवळून काढलं. प्रचंड संघर्ष आणि प्रचंड विरोध या सर्व गोष्टींना तोंड देत एकंही प्रयोग रद्द न करता मी 1100 प्रयोग सादर केले. या 20 वर्षांमध्ये अनेक चांगले, वाईट, कटू, घाणेरडे असे अनुभव मला आले. चांगली माणसं भेटली तसंच मुर्दाबाच्या घोषणाही ऐकल्या. हा संपूर्ण 20 वर्षांचा अनुभव ‘मी आणि नथुराम’ या माझ्या पहिल्या पुस्तकातून तुमच्यासमोर आणतोय”.