अभिनेत्री भाग्यश्री मोटेवर महिन्याभरात दोन मोठे आघात!
Bhagyashree Mote Sister and her husband Death: पुणे: मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Actress Bhagyashree Mote) हिची मोठी बहीण मधू मार्कंडेय (Madhu Markandeya) हिचा काल (13 मार्च) मृत्यू झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं. पुण्यातील (Pune) वाकड परिसरात राहणाऱ्या मधू हिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याआधीच तिचा […]
ADVERTISEMENT

Bhagyashree Mote Sister and her husband Death: पुणे: मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Actress Bhagyashree Mote) हिची मोठी बहीण मधू मार्कंडेय (Madhu Markandeya) हिचा काल (13 मार्च) मृत्यू झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं. पुण्यातील (Pune) वाकड परिसरात राहणाऱ्या मधू हिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टारांनी घोषित केलं. दरम्यान, या घटनेने अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिला मोठा धक्का बसला आहे. अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने भाग्यश्रीवर सलग दुसरा आघात झाला आहे. ज्यामध्ये तिला आपल्या अगदी जवळच्या दोन जणांना गमवावं लागलं आहे. (actress bhagyashree mote suffered two major shocks in a month fans were also shocked)
भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा मृत्यू
भाग्यश्रीची मोठी बहीण मधू हिचा अचानक झालेल्या मृत्यूने भाग्यश्री पार हादरून गेली आहे. कारण अगदी अनपेक्षिरित्या ही बातमी तिच्या कानावर आदळली. खरं तर मधू ही वाकड परिसरात केक बनवण्याचा व्यवसाय करायची. ज्यामध्ये तिला तिची मैत्रीण मदत करायची. आपल्या व्यवसायासाठी मधूला एक फ्लॅट भाड्याने हवा होता. त्यामुळे रविवारी मधू तिच्या मैत्रिणीसह वाकड परिसरात फिरत होती.
दरम्यान, रूम बघून झाल्यानंतर अचानक मधूला चक्कर आली आणि तिची दातखिळी बसली. त्यामुळे तिच्या सोबत असणाऱ्या मैत्रिणीने तिला ताबडतोब नजीकच्या खासगी रुग्णालयात नेलं. पण तिथे उपचार होऊ न शकल्याने मधूला महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी मधूला तपासल्यानंतर ती मृत असल्याचं घोषित केलं.
अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा मृत्यूने पुणे हादरलं, चेहऱ्यावर गंभीर जखमा