Asur 2 First Look: मोठ्या प्रतिक्षेनंतर 'असूर' येतोय... ट्रेलर बघून भरेल धडकी - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Asur 2 First Look: मोठ्या प्रतिक्षेनंतर ‘असूर’ येतोय… ट्रेलर बघून भरेल धडकी
बातम्या मनोरंजन

Asur 2 First Look: मोठ्या प्रतिक्षेनंतर ‘असूर’ येतोय… ट्रेलर बघून भरेल धडकी

asur 2 first look Trailer scary thriller series release on june 1 on jio cinema arshad warsi barun sobti

Asur 2 First Look : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर तो क्षण आला आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ‘असुर’ या लोकप्रिय हिंदी वेब सीरिजच्या दुसऱ्या भागाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. शोच्या निर्मात्यांनी सीरिजचा फर्स्ट लुकही प्रदर्शित केला आहे. ‘असुर’चा फर्स्ट लूक पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील. (Asur 2 web series is going to be streamed on this OTT platform from June 1.)

‘असुर’चा फर्स्ट लूकमध्ये काय?

अर्शद वारसी आणि बरुण सोबती स्टारर वेब सिरीज ‘असुर’ वर्ष 2020 मध्ये रिलीज झाली होती. सुरुवातीपासूनच त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. वेब सीरिजच्या कथेचं आणि सर्व कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. इतकंच नाही तर नंतर तिला सर्वोत्कृष्ट हिंदी मालिकांपैकी एक म्हणूनही ओळखलं गेलं.

तेव्हापासून चाहते असूरच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट बघत आहेत. ‘असुर’चा पुढचा भाग आणण्याची मागणी सोशल मीडियावरून लोक करत होते.

हेही वाचा >> Maharashtra Politics : बच्चू कडूंचं जे झालं, तेच आता रवी राणांचंही होणार?

‘असुर’मध्ये विज्ञान, धर्म आणि गुन्हेगारी यांच्यात अडकलेली अशी वेधक कथा दाखवण्यात आली होती. या वेब सीरिजने अनेकांची झोपच उडवली. या सस्पेन्स थ्रिलर मालिकेत गुन्ह्यांसोबतच धर्म आणि पौराणिक कथा यांच्या मिश्रणाने प्रेक्षकांना वेड लावले.

आता निर्माते ‘असुर 2’ ला एक पाऊल पुढे घेऊन जाणार आहेत. मालिकेचा फर्स्ट लूक जबरदस्त आहे. त्यात तुम्हाला पात्रे अडचणीत सापडलेले दिसत आहे. एक क्षण असा येईल जेव्हा बरुण सोबती आणि अर्शद वारसी आमने सामने आलेले असतील. अभिनेता विशेष बन्सलची व्यक्तिरेखा तुम्हाला घाबरवून सोडेल.

पहिल्या भागाची कथा काय होती?

‘असुर’ या वेबसिरीजची कथा सीबीआय अधिकारी धनंजय राजपूत (अर्शद वारसी), फॉरेन्सिक तज्ज्ञ निखिल (बरुण सोबती) आणि स्वत:ला ‘असुर’ समजणाऱ्या आणि त्यानुसार एकामागून एक खून करणाऱ्या पात्राची आहे. प्रत्येक हत्येमागे त्याचे स्वतःचे तर्कशास्त्र असते आणि तो ज्या पद्धतीने खून करतो, ते अंगावर शहारे आणणारं आहे.

पहिल्या सीझनमध्ये ‘असुर’ची कथा धनंजय राजपूतच्या निलंबनाने संपलेली आहे. दुसरीकडे, होत असलेल्या खुनामागे धनंजयचा हात असल्याचे निखिलला वाटत होते. तर प्रत्यक्षात असुर अजूनही मोकाटपणे फिरत आहे. आता ही कथा काय वळण घेते हे ‘असुर 2’मध्ये पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा >> Hyderabad : श्रद्धासारखेच हत्याकांड! दगड फोडायच्या मशीनने केले तुकडे अन् फ्रीजमध्ये ठेवले

‘असुर 2’ आता जिओ सिनेमावर पाहता येणार आहे. हा शो 1 जूनपासून या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. अर्शद वारसी आणि बरुण सोबती यांच्याशिवाय ‘असुर 2’मध्ये अनुप्रिया गोएंका, रिद्धी डोगरा, मियाँ चेंग, गौरव अरोरा, विशेष बन्सल आणि एमी वाघ हे देखील दिसणार आहेत.

वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट! Shruti Marathe च्या घायाळ करणाऱ्या अदांवर, चाहते फिदा! साधं राहणीमान असणाऱ्या Ratan Tata कडे आहेत ‘या’ खास वस्तूचं कलेक्शन Swara Bhaskar ने दिली Good News! शेअर केले खास Photo Sahid Kapoor पत्नीच्या ‘या’ सवयीने हैराण! लग्नाच्या 8 वर्षांनंतर सांगितलं सत्य मुंबईत या गँगस्टरची होती दहशत, नाव ऐकलं तरी फुटायचा घाम अनन्या, निसा, सुहानासोबत दिसणारा ‘हा’ तरूण भेटला राहुल गांधींना! Photo Viral Sara Ali Khan : कपिलने साराला विचारला शुबमनबद्दल प्रश्न, ती म्हणाली… WTC Final : विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी, 4 विक्रम मोडणार? Bollywood स्टार्सचं फिटनेस प्रेम, लक्झरी वाहनांपेक्षाही वापरतात महागडी सायकल! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचा ऑनस्क्रीन किसिंग सीन देण्यास नकार न्यासा देवगणची लंडनमध्ये मस्ती, ग्लॅमरस फोटो आले समोर XL वरुन झाली मीडियम साइज, अभिनेत्रीने कसं घटवलं एवढं प्रचंड वजन? जगातील सर्वात अनोखी स्पर्धा सेक्स चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी फक्त… वेब सीरीजमधील ‘तो’ गायक ‘जो’ बनला निर्दयी खुनी! IPS पत्नीसोबत IAS पतीची परदेशवारी… दिसतायेत दोघंही लय भारी! Gufi paintal : महाभारतात शकुनी मामा लंगडत का चालायचे? Aditi Rao Hydari घटस्फोटनंतर दुसऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात! थाटणार संसार?