सुश्मिता सेनने Gold Digger म्हणणाऱ्या ट्रोलरला सुनावले खडे बोल, म्हणाली...

अभिनेत्री सुश्मिता सेनने ललित मोदी आणि तिच्याबाबत गॉसिप करणाऱ्यांनाही चांगलंच सुनावलं आहे
Actress sushmita sen  flaunts engagement Ring
Actress sushmita sen flaunts engagement Ring

अभिनेत्री सुश्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ललित मोदी यांनी तिच्यासोबत पोस्ट केलेले फोटो. ललित मोदी यांनी 'बेटरहाफ' असं कॅप्शन देऊन सुश्मिता सेनसोबतचे काही इंटिमेट फोटो शेअर केले होते. त्यानंतर या दोघांनी लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या. जेव्हा या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या तेव्हा काही वेळातच स्पष्टीकरण देत आम्ही दोघांनी लग्न केलं नसून एकमेकांना डेट करत आहोत असं स्पष्टीकरण ललित मोदी यांनी दिलं.

Actress sushmita sen  flaunts engagement Ring
अशी आहे सुश्मिता सेन आणि ललित मोदींची लव्हस्टोरी

दरम्यान ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. काही लोकांनी सुश्मिताला ट्रोल केलं तर काहींनी तिचं अभिनंदन केलं. या दोघांच्या फोटोंवर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. अशात एकाने तिच्यावर Gold Digger म्हणत टीका केली. ज्यानंतर सुश्मिताने त्याला सुनावलं आहे. ललित मोदी यांच्यासोबत सुश्मिताचे फोटो आल्यानंतर काहींनी सुश्मिता हे सगळं पैशांसाठी करते आहे असं म्हटलं आहे. तर एकाने तिला गोल्ड डिगर म्हणजेच संधी साधू असं म्हटलं आहे. हे सुनावणाऱ्याला सुश्मिताने चांगलंच खडसावत उत्तर दिलं आहे.

सुश्मिता सेनने टीकाकारांना कसं खणखणीत उत्तर दिलं आहे?

गेल्या काही दिवसांपासून माझ्या नावापुढे गोल्ड डिगर म्हणजेच मी संपत्तीसाठी संधी शोधणारी व्यक्ती किंवा संधीसाधू व्यक्ती आहे असं जोडलं जातं आहे. मला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोलही केलं जातं आहे. ललित आणि माझे फोटो व्हायरल झाल्याने मला नावंही ठेवली जात आहेत. मात्र टीकाकारांची पर्वा मी करत नाही. आपल्या आजूबाजूला असणारी माणसं किती नकारात्मक आणि असंतुष्ट आहे हेच यातून दिसतंय.

मला गोल्ड डिगर म्हटलं जातं आहे तरीही मी पर्वा करणार नाही याचं कारण मी सोन्यापेक्षा हिऱ्याला जास्त महत्त्व देते आणि अजूनही हिरे स्वतः विकत घेते. माझ्यावर अशी टीका करणारे खालच्या मानसिकतेचे आहेत हेच दिसून येतं आहे. मला असल्या क्षुल्लक लोकांमुळे काही फरक पडत नाही.

माझ्या हितचिंतकांचा आणि कुटुंबीयांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. कारण मी सूर्यासारखी आहे. जो त्याच्या अस्तित्त्वासाठी चमकतो. असं म्हणत सुश्मिता सेनने टीकाकारांना खणखणीत उत्तर दिलं आहे.

सुश्मिता सेनने इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. तसंच या पोस्टला तिने समुद्रात उभा असलेला स्वतःचा पाठमोरा फोटोही पोस्ट केला आहे. तिच्या या पोस्टची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in