ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांनी गुपचूप आटोपला साखरपुडा? नव्या फोटोमुळे चर्चांना उधाण
बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. गुरूवारी रात्री उशिरा तिचं आणि ललित मोदी यांचं लग्न झाल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर ललित मोदी यांनी स्पष्टीकरण देत आम्ही लग्न केलेलं नाही तर एकमेकांना डेट करत आहोत असं म्हटलं आहे. अशात आता ललित मोदी आणि सुश्मिता सेन या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला असावा अशाही बातम्या समोर […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. गुरूवारी रात्री उशिरा तिचं आणि ललित मोदी यांचं लग्न झाल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर ललित मोदी यांनी स्पष्टीकरण देत आम्ही लग्न केलेलं नाही तर एकमेकांना डेट करत आहोत असं म्हटलं आहे. अशात आता ललित मोदी आणि सुश्मिता सेन या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला असावा अशाही बातम्या समोर येत आहेत. सुश्मिता आणि ललित मोदी यांचा एक फोटो समोर आला आहे यामध्ये सुश्मिता हातातली रिंग दाखवते आहे. ही रिंग म्हणजे त्यांच्या साखरपुड्याचीच आहे अशी चर्चा आता रंगली आहे.
सुश्मिता (Sushmita Sen) आणि ललित मोदी (Lalit Modi) यांचा साखरपुडा झाला?
IPL चे माजी चेअरमन ललित मोदी यांचं सोशल मीडिया अकाऊंट सुश्मितासोबतच्या फोटोंनी खचाखच भरलं आहे. अशात ललित मोदी यांनी त्यांच्या ट्विटर एक डीपी ठेवला आहे. ज्यामध्येही सुश्मिता त्यांच्यासोबत आहे. सगळीकडे गुरूवारपासून ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांची चर्चा होते आहे. फोटो समोर आल्यानंतर अनेकांना हे वाटलं होतं की या दोघांनी लग्न केलं. मात्र तसं झालेलं नाही हे ललित मोदी यांनीच स्पष्ट केलं.
अभिनेत्री सुश्मिता सेनचा चाहत्यांना धक्का! ललित मोदींसोबत थाटणार संसार
या सगळ्या बातम्या येत असतानाच आता ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांचा एक फोटो समोर आला आहे या फोटोत सुश्मिता सेन अंगठी दाखवत आहे. ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये सुश्मिता आहे ती आपल्या बोटात असलेली अंगठी दाखवते आहे. त्यामुळे आता हा अंदाज लावला जातो आहे की या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे की जी अंगठी सुश्मिताच्या हातात दिसते आहे तशी साखरपुडा झाल्यावरच घातली जाते. अर्थात याबाबत नक्की माहिती सुश्मिता सेन किंवा ललित मोदीच देऊ शकतात.