अभिनेत्री संचिताचा सिनेसृष्टीत मानसिक छळ? कोणी केले सनसनाटी आरोप?

मुंबई तक

Actress sanchita ugale suicide case : ‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगाले हिने आत्महत्या केल्यानंतर, तिच्या कुटुंबीयांनी सिनेसृष्टीत तिचा मानसिक छळ झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत. शिवाय या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

 Actress sanchita ugale suicide case
Actress sanchita ugale suicide case
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अभिनेत्री संचिताचा सिनेसृष्टीत मानसिक छळ?

point

कोणी केले सनसनाटी आरोप?

Actress sanchita ugale suicide case  : नालासोपारा येथील 22 वर्षीय टीव्ही अभिनेत्री संचिता उगाले हिच्या आत्महत्येने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. संचिताने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. 'दिलवाली दुल्हा ले जाएगी', 'कुमकुम भाग्य', 'वागले की दुनिया' यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि 'छावा' चित्रपटात अभिनय करणाऱ्या संचिताच्या अकाली मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, संचिताच्या निधनानंतर तिच्या मावशीने आणि वडिलांनी सिनेसृष्टीतील काही लोकांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे.

हेही वाचा : रक्ताने माखलेली बेडशीट अन् दारुच्या बाटल्या, होमस्टेमध्ये महिला IT कर्मचाऱ्यासोबत काय घडलं?

संचिताच्या मावशीचे सनसनाटी आरोप 

संचिताच्या मावशीने माध्यमांशी संवाद साधताना दावा केला की, गेल्या दोन-चार महिन्यांपासून संचिता अत्यंत चिंतेत होती. तिला इंडस्ट्रीतील काही लोकांकडून सतत मानसिक त्रास केला जायचा आणि टॉर्चर केले जात होते. जर तिने हा त्रास आधीच सांगितला असता, तर आम्ही वेळीच पाऊल उचलले असते, असे म्हणत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा : पवनराजे हत्याप्रकरणाचा निकाल पुढे ढकलला, आता ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया समोर