सलमान खानच्या याचिकेवर हायकोर्टात निर्णय; पत्रकाराला मारहाण केल्याचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

salman khans plea accused of assaulting a journalist
salman khans plea accused of assaulting a journalist
social share
google news

मुंबई : पत्रकाराला मारहाण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. अंधेरी मॅजिस्ट्रेटच्या समन्सविरोधात सलमानने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पत्रकाराने आरोप केला आहे की, सलमान खानच्या टीमने त्याचा फोन हिसकावला आणि त्याने गैरवर्तन आणि मारहाणीचा आरोपही केला आहे. (Decision today on Salman Khan’s plea; Accused of assaulting a journalist)

ADVERTISEMENT

अधिक वाचा – सलमान खान मला अजूनही मध्यरात्री फोन करतो, लारा दत्ताने सांगितलं गुपित

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवताना, लोकांना स्वतःची गोपनीयता असावी, असे म्हटले होते. मग तो अभिनेता असो, वकील असो किंवा न्यायाधीश असो. न्यायमूर्ती डांगरे पुढे म्हणाल्या तुमच्यापैकी कोणीही कायद्याच्या वर नाही. ना कोणता अभिनेता ना प्रेस. त्यांनाही कायद्याचे पालन करावे लागेल, असं त्या म्हणाल्या होत्या.

काय आहे सलमान खानवर आरोप?

मुंबईच्या रस्त्यावर अंगरक्षकांसह सायकलवरून जात असताना अभिनेता सलमान खानने एका पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. मीडियाने त्याचे फोटो क्लिक करायला सुरुवात केल्यावर ही घटना घडली. अभिनेत्याने पत्रकाराशी वाद घातला आणि धमकी दिली. सुनावणीदरम्यान न्यायालयात पत्रकाराचे म्हणणे बदलण्यावरही चर्चा झाली.

हे वाचलं का?

न्यायालयाला सांगण्यात आले की पत्रकार यापूर्वी पोलिसांकडे गेला होता आणि केवळ त्याचा फोन काढून घेतल्याचा आरोप केला होता. मात्र हल्ल्याबाबत काहीही सांगण्यात आले नाही. नंतर त्याने दंडाधिकार्‍यांसमोर तक्रार दाखल केली असता त्याने मारहाणीचाही कथित उल्लेख केला. याबाबत न्यायमूर्ती डांगरे यांनी विचारले की, दोन महिन्यांनंतर तुम्हाला मारामारी, हल्ला झाल्याचे कळले? तुम्ही ताबडतोब मारल्याबद्दल किंवा हल्ला झाल्याबद्दल सांगितले नाही, परंतु दोन महिन्यांनंतर तुम्ही म्हणता की तुमच्यावर हल्ला झाला आहे. पोलिसात दिलेली तुमची पहिली तक्रार पहा.

 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – प्रकरण बंद करायचं असेल तर; सलमान खानला घातपाताची पुन्हा धमकी!

‘झटापट करत फोन घेतला

पत्रकारातर्फे वकील फाजील शेख यांनी सांगितले की, पहिल्या तक्रारीतही याचा उल्लेख आहे. निवेदनात लिहिलं आहे की, बेदरकारपणे तो फोन घेऊन निघून गेला. बाचाबाची झाली, सलमान खानने बळाचा वापर केला. पत्रकाराने पोलीस नियंत्रणाला 100 डायल केला असता त्यांनी कॉल परत केला, असं वकील म्हणाले.

ADVERTISEMENT

‘कायदेशीर प्रक्रिया पाळली नाही?’

सलमान खानचे वकील आबाद पोंडा यांनी उच्च न्यायालयात सांगितले की, पत्रकाराच्या वक्तव्यात बदल झाला आहे. घटनेच्या दिवशी त्याने पोलिसांना जबाब दिला आणि काही महिन्यांनंतर त्याने अंधेरी कोर्टात तक्रार दाखल केली. न्यायमूर्ती डांगरे पुढे म्हणाले की, न्यायदंडाधिकारी यांनी ही प्रक्रिया करताना कायद्याची योग्य प्रक्रिया पाळली नाही.

अधिक वाचा – Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय?

सलमानच्या याचिकेवर आज कोर्टाचा निर्णय येणार

या प्रकरणी आयपीसीचे कलम 504 आणि 506 लावण्यात आले आहेत. जे जाणूनबुजून कोणत्याही व्यक्तीचा अपमान करण्यासाठी, हेतूने किंवा अशा प्रक्षोभामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होईल किंवा इतर कोणताही गुन्हा होईल हे जाणूनबुजून प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध कलम 504 लागू केले जाते. कलम 506 हे गुन्हेगारी धमकी देण्यासाठी आहे. न्यायमूर्ती डांगरे म्हणाल्या- धमक्यांच्या संदर्भात कलम 504, 506 आवश्यक आहे, तर तक्रारीत धमक्यांचा उल्लेख नाही.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT