Pushpa 2 Teaser: अल्लूचा अर्धनारी लुक दिसतोय खतरनाक! टीझर पाहूनच अंगावर येईल काटा!
Pushpa 2 The Rule Teaser : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) आज (8 एप्रिल) 42 वा वाढदिवस आहे. या खास दिवशी अल्लू अर्जुनने त्याच्याच चाहत्यांना एक खास सरप्राइज दिलं आहे. अल्लूचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2 : द रुल'चा टीझर आज त्याने रिलीज केला आहे.
ADVERTISEMENT
Pushpa 2 The Rule Teaser : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) आज (8 एप्रिल) 42 वा वाढदिवस आहे. या खास दिवशी अल्लू अर्जुनने त्याच्याच चाहत्यांना एक खास सरप्राइज दिलं आहे. अल्लूचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2 : द रुल'चा टीझर आज त्याने रिलीज केला आहे. चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट झाल्यानंतर चाहते पुष्पा 2 ची आतुरतेने वाट पाहत होते. (Pushpa 2 The Rule Teaser release on Birthday of Allu Arjun Fans are Excited to watch the movie)
ADVERTISEMENT
आता अखेर चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. पुष्पा पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा धमाकेदार टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांचा आनंदत गगनात मावेनेसा झाला आहे. ते चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
अल्लू अर्जुनचा जबराट लुक... अंगावर येईल काटा!
पुष्पा 2 चा टीझर पाहिल्यानंतर असं म्हणता येईल की अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पडद्यावर राज्य करून देशभरात गाजणार आहे. काही दिवसातच 'पुष्पा 2 : द रुल'चा ट्रेलरही रिलीज होईल. सध्या रिलीज झालेल्या टीझरमध्ये लाल चंदनाच्या तस्करीचा धंदा आणि पुष्पा राजचा अर्धनारी अवतार पाहायला मिळतोय. अल्लू अर्जुनने त्याच्या वाढदिवसानिमित्त हे त्याच्या चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिले आहे.
हे वाचलं का?
एकीकडे सर्व चाहते अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते, तर दुसरीकडे आता रिलीज झालेल्या टीझरचे कौतुक होत आहे. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा चित्रपटाला भरपूर दाद मिळाली. आता 'पुष्पा 2 : द रुल' मध्ये काय स्टोरी असणार आणि ती किती हीट होणार? हे पाहणं रंजक असणार आहे.
पुष्पा 2 ची रिलीज डेट काय?
पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुनचा हटके लुक दिसतोय. त्याने पायात घुंगरू, हातात बांगड्या, कानात झुमके आणि डोळ्यात काजळ घातलं आहे. ही स्टोरी नेमकी काय असेल हे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत. 'पुष्पा' चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. तर निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्सने केली आहे. पुष्पाच्या दुसऱ्या भागात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना आणि फहद हसील पुन्हा एकदा दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT