महागुरू सचिन पिळगावकर यांनी घेतली कोरोना लस

मुंबई तक

सध्या देशभरात लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. देशात सध्या 60 वर्षांच्या वरील व्यक्तींना तसंच 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या इतर गंभीर व्याधी असलेल्या व्यक्तींना लस टोचण्यात येतेय. यामध्ये अनेक सेलिब्रिटींनीही लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. तर मराठी सिनेसृष्टीतील महागुरु सचिन पिळगावकर यांनीही लस घेतली आहे. View this post on Instagram A post shared by Sachin Pilgaonkar Official […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सध्या देशभरात लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. देशात सध्या 60 वर्षांच्या वरील व्यक्तींना तसंच 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या इतर गंभीर व्याधी असलेल्या व्यक्तींना लस टोचण्यात येतेय. यामध्ये अनेक सेलिब्रिटींनीही लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. तर मराठी सिनेसृष्टीतील महागुरु सचिन पिळगावकर यांनीही लस घेतली आहे.

नुकतंच सचिन पिळगावकर यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे. सचिन यांनी इन्स्टाग्रावर लस घेतानाचा फोटो शेअर केला आहे. फोटोवर सचिन लिहीतात, “बीकेसीच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये लसीकरण करून घेतलंय. यावेळी मी आईला देखील घेऊन गेलो होतो. त्या ठिकाणी असलेले वैद्यकीय अधिकारी तसंच डॉ. देरे यांनी फार सहकार्य केलं.”

तर यापूर्वीही बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी लसीकरण करून घेतलंय. यामध्ये अभिनेते कमल हसन यांनी चेन्नईमध्ये पहिल्या लसीचा डोस घेतला. अभिनेते सतीश शहा यांनीही कोरोनाची लस घेतली असून लसीकरणानंतर त्यांना आलेला अनुभव ट्विटरवरून शेअर केला होता. नुकतंच अभिनेता सैफ अली खानने देखील वांद्रेत जाऊन लसीकरण करून घेतलं होतं.

बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनीही कोरोनाची लस घेतली असून फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. राकेश रोशन यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोनाची लस घेतली असल्याचं सांगितलेलं. त्यांनी ट्विट करत ‘कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे’ असं राकेश यांनी म्हटलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp