‘द कश्मीर फाईल्स’वर टीका : ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’, नदाव लॅपिड यांच्यावर इस्त्रायलचे उच्चायुक्त भडकले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इफ्फीचे ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाबाबतच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. इस्रायलचे भारतातील राजदूत नूर गिलन यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. नाओर गिलन यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) ज्युरी प्रमुख नदव लॅपिड यांचे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे. नादव लॅपिड यांच्या वक्तव्याची आम्हाला लाज वाटत असल्याचे ते म्हणाले.

गोव्यात झालेल्या ५३ व्या चित्रपट महोत्सवाच्या समारोपाच्या वेळी इफ्फीचे ज्युरी प्रमुख नादव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स‘ हा अश्लील आणि प्रोपगंडा चालवणारा चित्रपट असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले, ‘अशा फिल्म फेस्टिव्हलमध्ये अशे चित्रपट पाहून मला आश्चर्य वाटते.’ इफ्फी ज्युरींच्या वक्तव्यावर चित्रपट स्टार अनुपम खेर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करून ईस्त्रायलच्या फिल्म मेकरवर निशाणा साधला, खोट्यांची उंची कितीही मोठी असली तरी. सत्याच्या तुलनेत ते नेहमीच लहान असते, असं ते म्हणाले. तर चित्रपट निर्माते अशोक पंडित म्हणाले हा काश्मिरच्या लोकांचा अपमान आहे.

इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनी काश्मीर फाइल्सवर केलेल्या टीकेवर IFFI ज्युरी प्रमुख नादव लॅपिड यांना एक खुले पत्र लिहिले आहे. ते भारतीयांना समजले पाहिजे, म्हणून मी ते हिब्रू भाषेत लिहित नाही, असे ते म्हणाले. ते नादव लॅपिडवर निशाणा साधत म्हणाले, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. भारतीय संस्कृतीत पाहुण्याला देव म्हणतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तुम्ही IFFI गोवा येथील ज्यूरीच्या पॅनेलचे अध्यक्ष म्हणून भारतीय आमंत्रणाचा तसेच त्यांचा विश्वास, आदर आणि अत्यंत वाईट मार्गाने स्वागताचा गैरवापर केला आहे. आमच्या भारतीय मित्रांनी आम्हाला भारतात इस्रायलबद्दल प्रेम दाखवण्यासाठी बोलावले. कदाचित म्हणूनच त्यांनी तुम्हाला इस्रायली म्हणून आणि मला इस्रायलचा राजदूत म्हणून आमंत्रित केले असेल. ते म्हणाले की, आम्ही मंचावरून दोन्ही देशांचे संबंध आणि समानतेबद्दल बोललो. भारतीय मंत्री आणि मी व्यासपीठावरून म्हणालो की दोन्ही देशांमध्ये समानता आहे की आपण एकाच शत्रूशी लढतो आणि आपले शेजारी वाईट आहेत.

‘सात लाख कश्मिरी पंडितांचा अपमान’

यावर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने नदव लॅपिड यांना इफ्फी ज्युरीचे प्रमुख बनवणे ही सर्वात मोठी चूक होती. त्यामुळेच मंत्रालयात या गुन्ह्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. पॅलेस्टाईनच्या सहानुभूतीदाराकडून काय अपेक्षा ठेवता येईल? अशोक पंडित यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, इस्रायली चित्रपट निर्माता नदाव लॅपिडने काश्मीर फाइल्सला अश्लील चित्रपट म्हणत दहशतवाद्यांविरोधातील भारताच्या लढ्याची खिल्ली उडवली आहे. त्यांनी 7 लाख काश्मिरी पंडितांचा अपमान केला आहे. IFFIGoa2022 च्या विश्वासार्हतेला हा मोठा धक्का आहे. किंबहुना, काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष आणि आघात यांची हृदयद्रावक कहाणी द काश्मीर फाइल्स या चित्रपटात सांगितली आहे. यासोबतच धर्म, राजकारण आणि मानवतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, असं ते म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT