हर हर महादेव वाद : जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप, अभिजित देशपांडेंनी सांगितले पुस्तकाचं नाव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हर हर महादेव चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात शो पाडला. यावेळी धक्काबुक्की आणि मारहाण झाल्यानं गोंधळ उडाला होता. या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटाबद्दलचे आक्षेप नोंदवले. त्याला आता हर हर महादेव चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडेंनी उत्तर दिलंय.

ठाण्यात वाद झाल्यानंतर अभिजित देशपांडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.

अभिजित देशपांडे म्हणाले….

“सिनेमावर ज्या मुद्द्यांमुळे आक्षेप घेतला जातोय. तेच मुद्दे आम्हाला सेन्सॉर बोर्डाने विचारले होते. आम्ही ऐतिहासिक पुरावे, दस्ताऐवज सेन्सॉर बोर्डाकडे सुपूर्द केले. त्यानंतर आम्हाला प्रमाणपत्र दिलं गेलं. आम्हाला याबद्दल काही बोलायचं नाहीये”, असं अभिजित देशपांडे म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“काल लाच्छनांस्पद प्रकार घडला. काही लोकांनी चित्रपटगृहात घुसून मराठी माणसांना मारहाण केली. जे सिनेमा बघायला आले होते. त्यांचे कपडे फाडले. त्यामुळे मला असं वाटलं की, आमची भूमिका मांडावी”, असं म्हणत घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

“मी या प्रकाराची निंदा करतो. आपण जर स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त म्हणवतो. त्यांचे विचार समजून न घेता एकमेकांवर वार प्रतिवार करत राहिलो. शिवीगाळ करत राहिलो, तर आपण आपल्याला कुठे ठेवायचं.”

ADVERTISEMENT

“आम्ही आमच्या टीमच्या वतीने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करणार आहोत. त्यात सगळ्या आक्षेपांची उत्तर दिली जातील. ज्या गोष्टींबद्दल आक्षेप घेतले जात आहेत. त्या त्या गोष्टींचे पुरावे आणि दस्तावेज आम्ही सेन्सॉर बोर्डाला दिले आहेत. ते केंद्र सरकारचं मंडळ आहे. त्यात इतिहासतज्ज्ञही आहे. आम्हाला मिळालेलं सेन्सॉर प्रमाणपत्र याचं गोष्टीचं प्रमाण आहे की, सर्व मुद्दे आम्ही जसेच्या तसे मांडले आहेत. आम्ही जे पुरावे सादर केले होते.”

ADVERTISEMENT

बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांच्यातल्या लढाईच्या ‘सीन’वर देशपांडे काय म्हणाले?

“या सगळ्या गोष्टींबद्दल आमचं सविस्तर निवेदन येणार आहे. हाच प्रश्न आम्हाला सेन्सॉर बोर्डाने विचारला होता. आपलं होतं काय की, शाळेत शिकवला जातो. शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती आलाय, याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. आपल्याला तेव्हढाच इतिहास वाटतो, पण आपण जेव्हा बखरींचा अभ्यास करतो. इतिहासकारांशी बोलतो. असे इतिहासकार ज्यांनी आपलं आयुष्य वाहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत आणण्यासाठी. त्यातून आपल्याला काही संदर्भ मिळतात.”

“उदाहरण द्यायचं तर केळुस्कर. १९०५-०६ मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं. ज्यात या घटनेचा जसाच्या तसा उल्लेख आहे, जे आम्ही आमच्या सिनेमात दाखवलंय. त्यांना सत्यशोधक म्हणायचे. त्यांनी ज्योतिबा फुलेंवर जे पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकांवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेरणा घेतलीये. इतका त्या माणसाचा अभ्यास होता. पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला पुरावे मिळाले. हेच पुरावे आम्ही सेन्सॉर बोर्डाला दिलेत”, असं अभिजित देशपांडे यांनी सांगितलं.

“कोणता सीन पटला किंवा नाही पटला यावर वादविवाद होऊ शकतात. कुठली तथ्य पटली किंवा नाही पटली, तर त्यावरही चर्चा करा पण कोर्टात बोलू. पण चित्रपटगृहात जाऊन बोलणं चुकीचं आहे”, असं अभिजित देशपांडे म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT