महिलेचे अनैतिक संबंध… रोमान्स पडला महागात, धाकट्या बहिणीने सांगितली A टू Z कहाणी

मुंबई तक

Crime news : एका विवाहित महिलेची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली आहे. ही घटना बाराहाट ठाणे परिसरातील तुरडकी गावात घडली आहे. रविवारी रात्री महिलेची धारदार हत्याराने गळा चिरून हत्या करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

Crime news
Crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

धाकट्या बहिणीने सांगितला घटनेचा थरार 

point

महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

point

घटनास्थळावरून 'या' वस्तू केल्या जप्त 

Crime news : बिहारमध्ये बांका जिल्ह्यात एका विवाहित महिलेची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली आहे. ही घटना बाराहाट ठाणे परिसरातील तुरडकी गावात घडली आहे. रविवारी रात्री महिलेची धारदार हत्याराने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. महिलेचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी बांका येथे पाठवण्यात आला होता. ही घटनेतील आरोपी छोटू कुमार मंडल हा घटनास्थळावरून कांड करून पळून गेला होता. आरोपीच्या घराला सध्या कुलूप लावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : डान्सबारमध्ये काम करणाऱ्या तरुणीसोबत त्याचा विवाह, पत्नीवर लक्ष ठेवायला घरात बसवले सीसीटीव्ही, पोलिसही चक्रावले

धाकट्या बहिणीने सांगितला घटनेचा थरार 

या प्रकरणात महिलेच्या धाकट्या बहिणीने सांगितलं की, आपली बहीण गेली चार वर्षांपासून आरोपीच्या प्रेमात होती. दोघांचेही प्रेमसंबंध सुरु होते. ज्या दिवसी ही घटना घडली त्याच घटनेच्या रात्री आरोपी छोटू कुमार मंडल हा बहि‍णीला भेटण्यासाठी आला होता. त्यानंतर त्या मुलीने सांगितलं की, बराच वेळ झाल्यानंतर मृत महिलेच्या बहिणीने आपल्या घराकडेची वाट धरली. रात्रीचे 3 वाजले तरीही महिला घरी परतलीच नाही. त्यानंतर तिला झोप येऊ लागल्याने ती झोपी गेली, सकाळ होता तिला आपल्या बहिणीचा खून झाल्याची माहिती समजताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. 

महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी ही हत्या करण्यात आली तिथे काही लोकांना धाव घेतली असता, महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात छिन्न विछिन्न पडला होता. शरीरावर धारदास शस्त्राने हल्ला केल्याचे व्रण होते. तिची आई रेखा देवी, तिचे वडील गुज्जर दास आणि तिचे सासरे शुक्र दास यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, बौसी पोलिस उपविभागीय अधिकारी इंद्रजित बैठा, बाराहाट पोलिस स्टेशनचे अधिकारी महेश गुप्ता आणि मोठा पोलिस दल घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळावरून 'या' वस्तू केल्या जप्त 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर सील करून एमएसएल पथकाला माहिती दिली. सुमारे दीड तासानंतर भागलपूर येथील एफएसएल पथक घटनास्थळी आले, त्यांनी मृतदेहाची आणि घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा घटनास्थळावरून दोन शाल, इतर वस्तू पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन घेतल्या. या प्रकरणात हत्येपूर्वी महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp