अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेलेल्या 7 वर्षीय मुलासोबत नको ते, 30 वर्षीय विकृत तरुणाचं घाणेरडं कृत्य

मुंबई तक

Crime news : एक लहान मुलगा अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला असता, एका तरुणाने त्याच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाथरुमसाठी गेलेल्या मुलावर तरुणाने केले लैंगिक अत्याचार 

point

बाथरुममधून पीडित मुलगा रडत आला बाहेर...

Crime news : एक लहान मुलगा अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला असता, एका तरुणाने त्याच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मंगळवारी राजस्थानच्या जयपूरमधील महेशनगर भागात घडली आहे. तरुणाचे वय वर्षे 30 असून लैंगिक शोषण केलेल्या मुलाचं वय हे 7 वर्षे आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. माणुकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे ही वाचा : बायकोच्या पोटात वाढत होतं बाळ, पतीने तिला लाथ मारली, नंतर 'त्या' कारणावरून स्कार्फने गळा आवळत... धक्कादायक कांड

बाथरुमसाठी गेलेल्या मुलावर तरुणाने केले लैंगिक अत्याचार 

लहान मुलगा बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेला असता, तरुण देखील गेला आणि त्याने बाथरुमचे दार आतून बंद केले. तेव्हा आरडाओरड केल्याचा आवाज येऊ लागला होता. त्याचक्षणी परिसरातील लोक त्या ठिकाणी जमा झाले. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी जबरदस्ती दरवाजा उघडला आणि नंतर तो मुलगा रडत बाथरुममधून बाहेर आला. 

बाथरुममधून पीडित मुलगा रडत आला बाहेर...

बाथरूममधून रडत रडत बाहेर आलेल्या मुलाने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. नागरिकांनी हे सर्व ऐकून घेतलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्का देखील बसला. संतापलेल्या लोकांनी आरोपीला ताब्यात घेत बेदम मारहाण केली. 

संबंधित प्रकरणाची माहिती महेशनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जमाव पांगवला आणि आरोपीला सोडवले. त्यानंतर त्यांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतले. तेव्हा मुलाच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या जबाबाच्या आधारे, तात्काळ पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp