पतीने पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं, तितक्यात प्रियकर बेडखाली लपला, पण शेवटी व्हायचं तेच झालं

मुंबई तक

Jhansi Hotel Scandal : उत्तरप्रदेशातील झाशीमध्ये लव्ह ट्रँगलचे एक प्रकरण समोर आले आहे.आपल्या पत्नीच्या वागण्यावर संशय असलेला एक पती अनेक दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता. अखेर त्याचा संशय खरा निघाला. हॉटेलच्या एका रुममध्ये त्याने पत्नीला आणि तिच्या प्रियकराला रंगेहात पकडले. सोबत तो पोलिसांनाही घेऊनही आला होता. पोलिसांना पाहताच प्रियकर आपला जीव वाचवण्यासाठी बेडखाली लपला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उत्तरप्रदेशातील झाशीमध्ये लव्ह ट्रँगल

point

पत्नी आणि प्रियकराला पतीने रंगेहात पकडले

point

पोलिसांना पाहताच प्रियकर बेडखाली लपला

Jhansi Hotel Scandal : उत्तरप्रदेशातील झाशीमध्ये लव्ह ट्रँगलचे एक प्रकरण समोर आले आहे.आपल्या पत्नीच्या वागण्यावर संशय असलेला एक पती अनेक दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता. अखेर त्याचा संशय खरा निघाला. हॉटेलच्या एका रुममध्ये त्याने पत्नीला आणि तिच्या प्रियकराला रंगेहात पकडले. सोबत तो पोलिसांनाही घेऊनही आला होता. पोलिसांना पाहताच प्रियकर आपला जीव वाचवण्यासाठी बेडखाली लपला. अशाप्रकारे फिल्मी पद्धतीने या प्रकरणाचा उलगडा झाला.

हे ही वाचा : राज्य निवडणूक आयोगाची मार्करवरून पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'मार्करची शाई जाणं हा फेक नरेटीव्ह'

हॉटेलच्या खोलीत हाय व्होल्टेज ड्रामा

झाशीच्या नवाबाद पोलीस स्टेशन परिसरातील बस स्टँडजवळील कामा हॉटेलमध्ये ही घटना घडली. 11 जानेवारी रोजी एका तरुणाने त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला रंगेहात पकडल्याने गोंधळ उडाला. पतीने आधीच पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांना हॉटेलच्या खोलीत पाहून प्रियकराची भंबेरी उडाली आणि तो बेडखाली लपला. मात्र त्याचा लपण्याचा हा प्रयत्न काही यशस्वी ठरला नाही. पोलिसांनी अखेर त्याला बाहेर काढले. हे सगळं घडत असताना हॉटेलच्या कॉरिडोरपासून खोलीपर्यंत बराच वेळ गोंधळ सुरू होता.

'माझा नवरा माझ्यासाठी मेलाय'

हा सगळा गोंधळ सुरु असतानाच पत्नीने आपल्या पतीला दोष देण्यास सुरुवात केली. उपस्थित लोकांसमोर आणि पोलिसांसमोर ओरडून ती म्हणाली, 'मी दोन वर्षांपासून माझ्या पतीसोबत राहत नाही. तो माझ्यासाठी मेला आहे आणि मी त्याला घटस्फोट देण्यास तयार आहे.' पत्नीच्या या वागण्याने पोलिस अधिकारी आणि हॉटेल कर्मचारी अवाक झाले. दरम्यान, या दोघांचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये वाद सुरू झाले. 2023 मध्ये पत्नीने तिच्या पतीविरुद्ध खटला दाखल केला, पण हा खटला मिटवण्यात आला. पतीने सांगितले की, नातं टिकवून ठेवण्यासाठी तो त्याच्या पत्नीसोबत सिप्री बाजार येथील तिच्या मामाच्या घरी राहायला गेला. महिनाभर सगळं सुरळीत चाललं मात्र पुन्हा परिस्थिती बिघडू लागली आणि पत्नी तिच्या प्रियकराला गुप्तपणे भेटत राहिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp