पैशांसाठी पुरुषांसोबत झोप.... नवऱ्याची बायकोकडे अजब मागणी, लेकासह पत्नीनं कट रचत...

मुंबई तक

Crime news : पत्नीने आपल्या मुलासह एका आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीने नेमकं असं का केलं असाव? या प्रश्नाचं उत्तर पुढील प्रमाणे नमूद केले आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीने केली पतीची हत्या

point

धक्कादायक कारण आलं समोर

Crime news : उत्तर प्रदेशातील बाराबांकीमध्ये 17 नोव्हेंबरच्या रात्री राजमल नावाचा तरुण त्याच्या मोठ्या भावाच्या घरातून पूजा करून घरी परतला होता. रामकमल घराबाहेर पडला असता, त्याच ठिकाणी त्याची पत्नी सियावती आणि त्यांना 17 वर्षांचा मुलगा होता. ते एका निर्जनस्थळी गेले आणि त्याच ठिकाणी राजमलला ढकलून दिले. मुलाने त्याच्या वडिलांचे हात धरले आणि पत्नीने त्याचा गळा दाबून हत्या केली, असा आरोप करण्यात आला. पत्नीने असं का केलं याचंही कारण आता समोर आलं आहे. राजमलने तिला परपुरुषांसोबत शरीरसंबंध ठेव आणि पैसे आणून देण्याची मागणी केल्याने पत्नीने असं कृत्य केलं. 

हे ही वाचा : जालन्यात 13 वर्षीय शाळकरी मुलीने उचललं टोकाचं पाऊल, शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

रस्त्याच्या कडेला रजमलाचा मृतदेह

हे प्रकरण फतेहपूर कोतवाली परिसरातील मीरपूर गावातील आहे. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी बद्दपूर रस्त्याच्या कडेला रजमलाचा मृतदेह आढळला. या हत्येमागेचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. अशातच पोलिसांनी तपास सुरु ठेवला असून डिजिटल तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

छळाला कंटाळून पत्नीने केली राजमलची हत्या 

पोलिसांनी केलेल्या तपासातून राजमल हा मद्यपान करणारा होता.  तो मद्यपान करून मुलांना मारहाण करायचा. त्याने पैशांसाठी आपल्या पत्नीला इतर पुरुषांसोबत झोपण्यास दबाव आणायचा. या छळाला कंटाळून, त्याची पत्नी आणि मुलाने त्याच्या हत्येचा कट रचला. 

राजमल आपल्या मोठ्या भावाच्या घरी ढोल-पूजेला आला आणि तिथून निघाला. त्यानंतर त्याला त्याच्या पत्नी आणि मुलाने एका निर्जनस्थळी नेले आणि त्याला खाली ढकलून दिले. त्याच्या मुलाने त्याचे हात धरून पत्नीने त्याचा गळा दाबत हत्या केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp