सावधान! शेअर मार्केटच्या ग्रुपमध्ये जॉइन केलं अन् ठाण्यातील वृद्धाला 6.44 कोटी रुपयांना गंडा... पोलिसांचं नागरिकांना आवाहन
एका 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीला ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून 6.44 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शेअर मार्केटच्या बनावट व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जॉइन केलं अन्...
ठाण्यातील वृद्धाला 6.44 कोटी रुपयांना गंडा...
नागरिकांना सावध राहण्याचं पोलिसांचं आवाहन
Thane Crime: ठाणे शहरातून सायबर फसवणूकीचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे, एका 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीला ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून 6.44 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं वृत्त आहे. संबंधित घटना ही सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान घडली. आता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोध घेतला जात आहे.
लोकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त
रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून पीडितांची फसवणूक करण्यात आली. या अद्विका शर्मा आणि राकेश जैन अशी आरोपींची ओळख समोर आली आहे. दोघांनी आधी पीडित वृद्धाला त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जॉइन केलं. हा ग्रुप शेअर मार्केटमध्ये हाय रिटर्न मिळवून देणाऱ्या कंपनीचा असल्याचा दावा करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये दररोज शेअर मार्केटमधील भरपूर नफा दाखवणारे स्क्रीनशॉट्स, यशस्वी झालेले बनावट फोटोज आणि मॅसेजेस तसेच, लोकांना यामध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणारे मॅजेसेज ग्रुपला पाठवले जात होते.
काही दिवसांतच, पीडित वृद्धाचा विश्वास संपादन करून आरोपी त्याला बनावट ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर घेऊन गेले आणि त्याचं वेगळं अकाउंट उघडून घेतलं. त्यामध्ये वृद्धाने इन्व्हेस्ट केलेले पैसे आणि त्यावर भरपूर नफा मिळाल्याचं खात्यात पीडित व्यक्तीला खात्यात दाखवण्यात आलं. त्यामुळे, हे ट्रेडिंग खरं असून यामुळे त्याला लाभ मिळत असल्याचं वृद्धाला वाटलं.
6.44 कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर...
मात्र, कालांतराने आरोपी राकेश जैनने पीडित वृद्धाच्या ट्रेडिंग अकाउंटचे अॅक्सेस काढून घेतले. त्यानंतर, 24 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान आरोपीने पीडित व्यक्तीच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण 6.44 कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर, वृद्ध माणसाला त्याच्या खात्यातील ट्रान्झेक्शनमध्ये गडबड जाणवली आणि त्याचे पैसे आपल्या बँक बॅलेन्समध्ये न दिसल्याने आपली मोठी फसवणूक झाल्याची त्याला जाणीव झाली.










