शेजारच्याने महिलेचे बनवले अश्लील व्हिडिओ, पैशांची मागणी करत व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी, तिच्या पतीलाही...
crime news : माणुसकीला काळिमा फासणारं धक्कादायक प्रकरण आता समोर आलं आहे. एका महिला घराच्या छतावर झोपली होती. तेव्हा तिच्याच शेजाऱ्याने तिचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची अनेकदा धमकी देखील दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
माणुसकीला काळिमा फासणारं धक्कादायक प्रकरण
तरुणाने शेजारील महिलेचे अश्लील व्हिडिओ बनवले
पतीने जाब विचारताच केली मारहाण
crime news : माणुसकीला काळिमा फासणारं धक्कादायक प्रकरण आता समोर आलं आहे. एका महिला घराच्या छतावर झोपली होती. तेव्हा तिच्याच शेजाऱ्याने तिचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची अनेकदा धमकी देखील दिली, नंतर 50 हजार रुपयांची मागणी देखील केली. पण, पीडितेनं कसलाही न विचार करता धाडसी वृत्ती दाखवली आणि पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील आहे.
हे ही वाचा : चंद्रपूर हादरलं! हॉस्टेलमध्ये मानसिक त्रास, अखेर 17 वर्षाच्या तरुणाने दोर आवळत संपवलं जीवन, 'त्या' चौघांचं नाव समोर
संपूर्ण प्रकरण काय?
मंझनपूर कोतवाली परिसरात राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली की, 18 नोव्हेंबर रोजी ती तिच्या टेरेसवर झोपली होती. त्याचक्षणी शेजारी सनी छतावर चढला आणि तिचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला. तेव्हा तरुणाने तिच्या पतीकडून तब्बल 50 हजार रुपयांची देखील मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरस करेन, अशी धमकी देखील दिली.
तरुणाला पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. जेव्हा महिलेच्या पतीने या प्रकरणाबाबत तरुणाला जाब विचारला असता, त्याने तिच्या पतीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि नंतर लाठीकाठीने मारहाण केली. तसेच जर तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
हे ही वाचा : पुण्यात वहिणीसोबत दीराचे अनैतिक संबंध, भाऊच उठला भावाच्या जीवावर, धारदार शस्त्राने वार करत संपवलं, मृतदेह पोत्यात भरून...
पोलिसांची कारवाई
या प्रकरणातील सीओ यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरु करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, आरोपीला अटक केली जाईल आणि या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.










