मंदिरात घेऊन गेली आणि आईने पोटच्या मुलीवरच केला कुऱ्हाडीने हल्ला! नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

एका महिलेने मंदिरात आपल्याच पोटच्या मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

पोटच्या मुलीवरच केला कुऱ्हाडीने हल्ला!
पोटच्या मुलीवरच केला कुऱ्हाडीने हल्ला!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आईने पोटच्या मुलीवरच केला कुऱ्हाडीने हल्ला!

point

मंदिरात नेमकं काय घडलं?

Crime News: एका महिलेने मंदिरात आपल्याच पोटच्या मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकरण हे बंगळुरूतील असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी (19 नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास घडली. येथील, थानिसांद्रा मेन रोडवरील अग्रहारा लेआउटमध्ये असलेल्या हरिहरेश्वर मंदिरात सकाळची पूजा झाल्यानंतर एका 55 वर्षीय महिलेने तिच्या मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात, तरुणीच्या मानेवर गंभीर दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे. 

अचानक मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला... 

प्रकरणातील जखमी तरुणीला उपचारांसाठी एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 4:30 च्या सुमारास आरोपी महिला तिच्या मुलीसह मंदिरात गेली होती. त्यावेळी त्यांनी तिथे पूजा केली आणि नंतर थोडा वेळ मंदिरात बसल्या. दरम्यान, महिलेने तिच्या 25 वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून, रस्त्याने जाणारे लोक तिथे आले आणि आरोपी आईला मुलीवर हल्ला करण्यास थांबवलं. त्यानंतर, तिथल्या स्थानिकांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

हे ही वाचा: पकडणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस, कारनामे पाहून सिनेमा बनेल... चकवा देणाऱ्या प्रियांकाला पोलिसांनी कसं पकडलं?

सीसीटीव्ही फुटेजचा तपास 

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,  " मंदिरात एका 55 वर्षीय महिलेने तिच्या मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली. यामुळे, पीडित तरुणी गंभीररित्या जखमी झाली. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आता, आम्ही फुटेजचा तपास करत आहोत." घटनेतील जखमी तरुणी विवाहित असून ती तिच्या पतीसोबत राहते. तसेच, आरोपी महिला सुद्धा आपल्या पतीसोबत संपीगेहल्ली येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा: Personal Finance: 5 आर्थिक मंत्र ठेवा लक्षात, नवं वर्ष जाईल सोन्यासारखं!

पोलिसांचा तपास 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे तिच्या पतीसोबत बऱ्याचदा वाद व्हायचे आणि ती त्यामुळे ती सतत तिच्या आईला भेटायला जायची. संबंधित महिलेला तिच्या वैवाहिक समस्यांपासून सुटका मिळावी म्हणून तिने नुकतंच तिच्या आईसोबत एक विशेष पूजा करायला सुरूवात केली होती. यासाठी, आरोपी महिलेने एका ज्योतिषाचा सल्ला घेतल्याचं वृत्त आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ज्योतिष्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तसेच, जखमी महिलेची प्रकृती ठिक होण्याची वाट पाहत आहेत जेणेकरून पीडितेचा जबाब नोंदवला जाईल आणि नेमकं प्रकरण समोर येण्यासाठी मदत होईल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp