पत्नीवर अॅसिड फेकलं अन् नंतर, छतावरून खाली ढकललं... पतीच्या जाचामुळे महिलेचा मृत्यू!
पतीच्या शारीरिक अत्याचार आणि जाचामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीवर अॅसिड फेकलं अन् नंतर, छतावरून खाली ढकललं...
पतीच्या जाचामुळे महिलेचा मृत्यू!
Crime News: हिमाचल प्रदेशमध्ये पतीच्या शारीरिक अत्याचार आणि जाचामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. 15 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास आरोपी पती नंद लालने पत्नीवर अॅसिड अटॅक केला आणि आणि नंतर तिला घराच्या छतावरून ढकलून दिलं होतं.
पतीच्या जाचाला वैतागली
संबंधित घटना हिमाचल प्रदेशातील मंडी येथे घडली. पीडित महिलेचं नाव ममता ठाकूर असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नंद लाल सतत ममताला मारहाण करायचा. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. दरम्यान, ममता खूप आजारी पडली. आपल्या पतीच्या वागण्याला कंटाळून पीडितेने सोशल मीडियावर एक पोस्टसुद्धा केली होती. यामध्ये, तिने तिच्या पतीवर गंभीर आरोप केले होते. याच कारणामुळे, नंद लाल पत्नीवर प्रचंड संतापला होता.
आधी अॅसिड अटॅक आणि नंतर, छतावरून खाली...
15 नोव्हेंबर रोजी नंद लाल आणि ममता यांच्यात मोठा वाद झाला. भांडण सुरू असताना नंद लालने रागाच्या भरात पत्नीवर अॅसिड फेकलं. इतकेच नव्हे तर, त्यानंतर आरोपी पतीने ममताला छतावरून खाली ढकललं. यामुळे पीडिता खाली कोसळली. घटनेनंतर, आरोपी घरातून फरार झाला. त्यावेळी, शेजाऱ्यांनी ममता रक्ताने माखलेल्या अवस्थेत पाहिलं आणि तिला मंडीच्या रुग्णालयात नेण्यात आलं.
हे ही वाचा: नांदेड हादरलं! 7 वर्षांच्या शाळकरी मुलीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात...
उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू
पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचं पाहून डॉक्टरांनी तिला तातडीने PGI चंदीगड येथे रेफर केलं. तिथे डॉक्टरांनी चार दिवस तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण अॅसिडमुळे जळजळ आणि गंभीर जखमांमुळे तिची प्रकृती खालावली आणि बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाला.










